२५० ग्राम बोनलेस चिकन बारीक़ बारीक़ तूकडे करून घ्यावे.
त्यात दोन चमचे तान्दुळ पीठ, एक चमचा डाळीचे पीठ, चमचाभर तिखट, चवीपुरते मीठ, कोथिम्बिर, ओवा आणि लिम्बू पिळावा.
कढीपत्याची १५/२० पाने कुरकुरीत तळून घ्यावीत.
ही तळलेली पानं बारीक़ कुस्करून चिकन मधे टाकावीत.
सर्वात शेवटी एक अंडे फेटून टाकावे.
सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अर्धा तास ठेवा.
कढईत तेल गरम करायला ठेवून चिकनचा एक एक तुकडा हळू हळू तेलात सोडा व मंद आचेवर लालसर तळा.
मंद आचेवर तळल्याने चिकन छान शिजते.
मि.पा.वर स्वागत..
गितांजली मि.पा.वर स्वागत!!!!!!!!!!
तु दिलेली रेसिपी छान आहे..
अशाच आणखी तुझ्या रेसिपी शेअर कर..यातून आम्हालाही नविन शिकायला मिळेल.:))))
हेच,
तु दिलेली रेसिपी छान आहे..
अशाच आणखी तुझ्या रेसिपी शेअर कर..यातून आम्हालाही नविन शिकायला मिळेल.:))))
हेच म्हणतो!
गीता, तुझं मिपावर स्वागत आहे गं!
साक्षात मिपाच्या अन्नपूर्णेने तुझं स्वागत केलं आहे! मीही करतो..!
तात्या.
व्हेज ६५
चिकन ऐवजी फ्लॉवर / गाजर / पालकाची पाने
अंड्या ऐवजी जाडसर भिजवलेले बेसन्पीठ वापरले तर व्हेज ६५ होईल.....
बाय द वे याला ६५ का म्हणतात
खादाड विजुभाऊ
विजुभाऊ खालील लिन्क पाहा..
http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/07/10/stories/20020710003104…
धन्यवाद...
धन्यवाद स्वाती राजेश.
मलाही हा प्रश्न गेली कित्येक वर्ष (चिकन ६५ प्रथम खाल्ल्यापासून) भेडसावत होता. अर्थात, तुम्ही दिलेल्या लिंकवरील लेखकाचाच ह्या स्पष्टीकरणावर १००% विश्वास दिसत नाही, पण अगदीच काही माहित नसण्यापेक्षा दिलेले स्पष्टीकरण तर्कशुद्ध तरी वाटते आहे.
हम्म्म्म्म्......
आज काय चिकन डे वाटतं......
असो, बाकी पाकृ जबरा दिसतेय्....आयला उगीच हाटेलात १०० रुपये देउन खात होतो....
आता सबकुछ घरच्या घरी बनवेंगे.....
आपला,
टिंग्या ६५ ;)