...मला आठवण आहे !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ......तुझी आठवण आहे !

...मला आठवण आहे !
.....................................
अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे
...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे !
मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे
मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे
सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे
दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे
भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे...
अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे
समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे !
थकलो आता ! माझा चालू ग्लास विसावा आहे !!
धूम्रनळीची ज्योत इथे ही कुणी लावली आहे
कशी दिसावी ? सांग मला मग कुठे बाटली आहे ?
* * *
...परतीचाही प्रवास आता कसा व्हायचा आहे
कळे न मजला, अधार आता कुणी द्यायचा आहे !
उंबऱ्यात हे पाऊल माझे उगीच अडते आहे
`खरेच` का हे! पाऊल माझे तिरके पडते आहे !
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे
अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे !
* * *
...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे !
* * *

- केशवसुमार
रचनाकाल ः ०५ ऑक्टोबर २००७

मस्त ! मस्त !
सिगरेटिची ज्योत, अंतरिच्या खळबळीची इकडे झालेली खिडकीशी झटापट वगैरे फार मस्त..मूळ कविता वाचून त्या कल्पनांचा इथला अविष्कार (नेहमी प्रमाणेच) थक्क करणारा.
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे
.. हे सर्वात आवडले.
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

..हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे !

वा ! वा !

हाच दिलासा, अपुला केश्या अजुनी फॉर्मात आहे !

- सर्किट

दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे
अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे !
* * *
...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे !

क्या बात है....

तात्या.

आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. पाहतो तो उत्खननातून काढलेली कविता!

कविता छानच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इतर संकेतस्थळांवरील कवितांचे विडंबनही मिपावर प्रकाशित करू नये. निषेध! निषेध!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जबराट..... केशवजी हम आपको मिस कररेला हुं..
(नविन विडंबनाच्या प्रतिक्षेत)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -