बीन सॅलेड

ही पा. क्रु. तुम्ही वाचलीच आहे आधी मी इथे फक्त नंतर सापडावी म्हणून टाकतेय
बीन सॅलेड
१०-१५ फरसबीच्या शेंगा
२ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने
१/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट)
१/४ कप रेड व्हिनेगर
१ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उकडलेला)
तेवढेच छोले (उकडलेले)
पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून
त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी
सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो..

चु. भु. द्या. घ्या.

वरदा,तुझं बीन्स सॅलड आवडलं ग..करून पाहतेच.
अवांतर-रोज कॅलरी न वाढवणारं काय मिळेल ते शोधत असते....म्हणून हे उद्योग
म्हणून तर म्हटलं,करून पाहतेच..

तुला सगळे बीन्स मिळतील शॉप राईट मधे..पण ते कॅन मधले बिन्स आणलेस ना तर चक्क चाळणीत टाकून धुवुन घे कारण ते जरा चिकट असतात...

पण व्हाईट व्हिनेगार सुद्धा छान लागतं सगळ्या सॅलेड मधे..त्याच्या टेस्ट मधे कींचित आंबटपणा असतो तो रेड व्हीनेगार मधे नसतो.
ह्या सॅलेड मधे कैरी, टॉमेटो असल्याने आंबट चवीची गरज नाही लागत म्हणून रेड घालत असतील...
जनरली चायनीज मधे वगैरे व्हाईट टाकतात...साधं सॅलेड किंवा सब्ज बनवायचे असतील तर सुधा तेच छान लागतं..

बाकी एक्सपर्ट सांगतीलच

कुठलंही व्हीनेगार हाताला लागेल ते टाकून पहायचं हे मला बापडीला माहित..सायन्सची विद्यार्थिनी ..त्यामुळे काहीही दिसलं तरी 'आपण प्रयोग करुन पाहु' हेच चालु असतं.......