मक्‍याचा खरवस

साहित्य - एक वाटी मक्‍याचे दाणे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, वेलचीपूड, केशर.

कृती - मक्‍याचे दाणे व दूध एकत्र मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. त्यात गूळ विरघळवून घ्यावा. वेलचीपूड व केशर घालावे. एरवी खरवसासाठी चीक उकडून घेतो त्याप्रमाणे शिटी न लावता कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. सध्या जवळजवळ वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध असल्याने झटपट करता येण्याजोगा हा पदार्थ आहे. लहान मुलांनाही आवडेल.

याला कॉर्न पूडींग असेही म्हणतात
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत