रवा डोसा
साहित्य---प्रत्येकी एक कप रवा,मैदा,तांदूळ पीठ,कांदा बारीक ,मीठ, जिरे, काजूकाप,तेल,डोसा तवा
क्रुती-वरील मिश्रणात पाणी घालून ते अगदी पात्तळ करावे.तवा तापवून घ्यावा.तयार मिश्रण साधारणपणे अर्धा कप तव्यावर ओतावे.बाजूने तेल सोडावे.मिश्रण पात्तळ असेल तरच जाळी पडेल.डोसा कोणत्याही चट्णीबरोबर खावा.
मस्त
आणि सोप्पी पा.क्रु. आहे...
अरे बापरे!
एक कप भरून मैदा?
आम्हाला नक्को रे बाबा तुमचा तो डोसा! :)
आपला,
(मैदा शक्यतो टाळणारा) तात्या.
तात्या
तात्या तुम्ही diet करत आहात का?
हा हा हा जोक ऑफ द यर..
तात्या तुम्ही diet करत आहात का?
काही तरी काय... तात्यांच्या आजूबाजूला सुद्धा भटकण्याची त्या डायट या शब्दाची हिम्मत नाही....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मग तात्या,
तुम्ही मैदा घालू नका...सोप्पंय.
नुसता रवा आणि तांदूळपीठ घालूनसुद्धा मस्त होईल हा डोसा. नाही का हो वैशालीकाकू?
मी..
मैदा नाही घालत...
मी दही / ताक घालते .. त्यामुळे आंबट चव छान येते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
तात्या,सगळे डोसे फ क्त तुमच्याकरीता नाहीत.आपल्याकरीता फ क्त एकच.तो ही सोसत नसेल तर त्यावर थोडा ओवा खावा म्हणजे मैद्याचा त्रास होणार नाही.धन्यवाद.