एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !

सखे........! आज आपले काय बिनसले प्रेमाला रंग चढेना,भांडण आपले रंगेना ! कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,वेदनेला अश्रुत जाळणार होतो.या शहरातून त्या शहरात,माणसाच्या विचारांच्या वणव्यात,त्या संस्थळावरुन या संस्थळावर,मराठी शब्दांच्या भावविश्वात.सखे ....! तु एकदा ये !आली तशी निघून जा,मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा !  

मस्त कविता!

----------------------------------------------------------------------------------------------------------------
काय बिरुटे सर आज चुकुन शर्ट वगैरे न घालताच बाहेर पडला नाहीत ना? 'प्रा.डॉ.दिलीप बिरुटे' हा उल्लेख नुसता 'दिलीप' असा केलेला पाहुन आम्हालातरि तसेच वाटले बॉ! ह.घ्या :-)

रंग काय, अन भांडण काय
सतत रुसणे, फूगणे काय
मुक्याच्या बडबडीला तर काही भाव नाय

आलो (/आले) काय किंवा गेलो (/गेले) काय
कोणाला फरक पडतो काय

इकडे पाहीलय तिकडे पाहीलय
काय चाललेय कळतच नाय

मूड आहे तोवर येणार हाय
आल्यावर मग जायचेच हाय
काम आले की सगळ्यांचेच पसार होतात पाय

लेखनाचा किडा जाळं म्हणून विणलाय
प्रतिसाद अडकायची वाट बघतोय

ह्या दोन्ही शिवाय खरे काही असतेच काय?

सहजराव,
आमच्या कवितेपेक्षा आपलीच कविता आम्हाला अधिक आवडली. अर्थात आपण आपल्या प्रतिभेमुळे कोणत्याही प्रांतात 'सहजपणे' प्रवेश करु शकता, हे काही आम्ही सांगण्याची गरज राहिलेली नाही ! आम्हाला यापुढे आपली कविताही वाचायला आवडेल .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचं थोड ते केशवसुमारांसारखे आहे, समोर काही असेल त्यावरून सुचते. त्यामुळे आमच्या कवितेसाठी तुम्हाला आधी लिहाव्या लागतील.

पण आमच सगळं सहज यशस्वी होत असतं. त्यामूळे कोणाची वाट बघा, हूरहूर, झूरणे, आठवण असे काव्य काही जमायचे सुख आम्हाला नाही. :-(त्याबाबतीत तुम्ही लकी!!!

कोणाला काही कोणाला काही. तुम्हास काव्य आम्हास "कवीता" :-)

क्या बात है.... मस्तच

"या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात."

सुंदर.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

> मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
> उभ्या उभ्या वाचून जा !

यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले.

यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले.

मस्त! :)

ट्ग्याराव !
'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी'
सही ! जमलं असतं राव, या दोन ओळी टाकल्या असत्या तर ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले.

=)) =))

हे सगळे भन्नाट आयडी कुठे गेले कुणी सांगेल का?

म्हणजे मुक्याने बोलणे आणि 'मुक्याने' बोलणेही !! वा प्रोफेसर वा!!

आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !

हाहाहा! हे भारी! ..

कल्पनाविलास
- तात्यांनी ही कविता लिहिली असती तर उभ्या उभ्या वाचून जा नंतर मगरूर-ए-मुहब्बत सारखे मस्तपैकी 'तिच्यायला' किंवा 'च्यामारी' टाकले असते, असे मला उगाच दिसले. सखी, मिसळ आणि ग्लेनफिडिच यांत ते प्रायॉरिटी क्यूइंग / ऑर्डरिंग कसे करत असावेत बॉ? तात्या हघ्याहेवेसांनल!

सखी, मिसळ आणि ग्लेनफिडिच यांत ते प्रायॉरिटी क्यूइंग / ऑर्डरिंग कसे करत असावेत बॉ?

हम्म प्रायॉरिटी लावणं कठीण आहे बॉ! :)

तात्या.

दिलीपराव,

लय भारी कविता हाय...
खास करुन हे मस्तच हाय
-----------------------------
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
-----------------------------
आन् येक सांगावेसे वाटते
तुमि म्हन्जे एक छुपे प्रतिभावान कलाकार आहात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अजून काय काय बिरुदे मिरवतात देवच जाणे
मला तर आत्त्तापर्यंत प्रा. आणि डॉ.हेच माहीत होते
त्यात क. आणि ले. ची भर :)
लय भारी
अशाच फाश्ट ट्रॅक कविता लिहीत जावा

(कधीकधी काव्य लिहीणारा) सागर

सर,

कालच म्हटलं तुम्हाला की कविता अजाबात कळत नाहीत पण ही कळली हो! मस्त आहे.

तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !

हे म्हणजे

रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ|
आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ|

सारखे.

एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !

हे म्हणजे

रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ|
आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ|

सारखे.

क्या बात है....:)

आपला,
(दिल दुखावलेला) तात्या.

कविता अजाबात कळत नाहीत पण ही कळली हो! मस्त आहे.

रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ|
आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ|

कविता कळत नाही म्हणायचं आणि जखमेवर बरोबर नमक झिडकायचं, लय भारी शेर बरं का ! :)
खरे तर तिने आता येऊच नये, हो ! एक गझलकार म्हणतो......

पावसात भिजण्याचे मौसम टळून गेले
मैफिलीत आसवांच्या आयुष्य जळून गेले.

ती देखणी तिला जडलाय छंद कत्तलीचा
अश्रुंच्या फुलांची आता काय खैर आहे ?

आपल्याला कविता आवडली, कळली , प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आपले आभार !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !

प्रा.डॉ. ना एकेरी हाक मारणारी ही कोण बरे?(प्रेयसी की पत्नी?)
दालमे कुछ काला है!
पण कुणासाठीही असेना का, कविता आवडली. लै झ्याक है!

दिलीपची कविता वाचून,
सखी मिसळीत रमली
लवकरच ती इथल्या
तर्रीची सप्लायर बनली !

- (नवशीघ्रकवी) सर्किट

नमस्कार,
आमच्या थातूर-मातुर शब्दाच्या रचनेतला भाव आपल्याला समजला आणि आपण सर्वांनी जी भरभरुन दाद दिली, त्यामुळे शीघ्र कवी भारावून गेला आहे. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो !
अंदाजच आला नाही, काय तिच्या मनात आहे.
पेटल्यावर कळाले मला, मी विरहाच्या वनात आहे.

पापण्यात साठवले , मी सारे तिचे सोहळे
तोच आकांत अजून, माझ्या कवितेत आहे.

धन्यवाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
...

असं कसं हो...

आली तशी बघून जा..
मिसळपाव सोबत 'दिलीप' आणखी काय खातो
उभ्या उभ्या तू ही खाऊन जा!

चालेल का हो?

- प्राजु.

आली तशी बघून जा..
मिसळपाव सोबत 'दिलीप' आणखी काय खातो
उभ्या उभ्या तू ही खाऊन जा!

हाहाहाहा :)))))))) चालेल चालेल.

अन आमचे बील भरुन जा ! अशीही ओळ टाकू तिथे ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कवितेला, तात्यांच्या भन्नाट प्रतिसादांनी अजुनच रंग चढलाय.!!

शेरो-शायरी जबरा

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

प्रा. डॉ. दिलीप बरुटे
परत एकदा म्हणावेसे वाटते, "रिकामी जागा भरून काढण्याकरता केलेले निव्वळ वर्तमानपत्री लिखाण"
तसेही आपण संपादन करता असे वाटते त्यामुळे आपनाच्या विरोधात काही बोलावे इतकी आमच्यात हिम्मत नाही. राग येऊ द्या हवे तर आपण बोलायला घाबरत नाही ब्वा!

=)) नाय हो मी संपादन करत नाही. बिनधास्त बोला तुम्ही मला अजिबात राग येत नै. मरतो मी आज. =))

-दिलीप बिरुटे

सदस्यकाळ
3 days 23 hours

३ दिवसांचा सदस्यकाळ आणि थेट हल्ला. जरा दमाने तरी घ्यायचे होते. =))

पण अगदी माझ्या मनातले लिहीलेत. प्रा. डॉ. दिलीप बिरुटेंना काय कविता बिविता लिहिता येत नाही.

बाकी काय म्हणता? इकडेच आहात की गेलात तिकडे परत?