राम राम मंडळी,
आपल्यापैकी अनेक मंडळी ही सध्या अमेरिकेत राहतात. त्या सर्व मंडळींना माझी एक विनंती! मला अमेरिकन नटी आणि मॉडेल सिंडी क्रॉफर्डचा घरचा आणि मोबाईल नंबर हवा होता! :)
आपल्यापैकी कुणी जर तो मला शोधून दिला तर त्या व्यक्तिचा मी आभारी राहीन. गेले बरेच दिवस मी हे आपल्याला विचारीन विचारीन म्हणत होतो, आज सवड मिळाली! त्याचप्रमाणे सिंडीबद्दल इतरही काही खाजगी माहिती कुणाला द्याविशी वाटली तर तीही इथे अवश्य द्यावी. कृपया तिच्याबद्दल सर्वांना माहिती असलेली माहिती (उदा तिची वेबसाईट, विकी इत्यादी) इथे देऊ नये ही विनंती, कारण गुगलवर सिंडीचं नांव टाकल्यावर २५,२०,००० पानं उघडतात! :)
मी गेली अनेक वर्ष या बयेचा जबरदस्त चाहता आहे. च्यामारी आयुष्यात एकदा तरी या बयेशी, 'ठाण्याहून तात्या बोलतोय गं गधडे सिंडे, कशी आहेस?' असं बोलावसं वाटतं! :)
मला खात्री आहे की ही बया कोण कुठल्या तात्याशी कशाला झक मारायला बोलेल? तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे म्हणतो मी! :)
काय असेल ते असो, काही माणसं जिवंतपणीच एक दंतकथा बनतात. आमची सिंडीदेखील त्यापैकीच एक. आपण साला मरतो या बयेवर!
आयुष्यात एकदातरी सिंडीसोबत बसून जरा निवांतपणे मिसळ खायची इच्छा आहे. बघू कसं जमतं ते! :)
आपला,
(सिंडीप्रेमी) तात्या.


कामाला लागा पाहू सगळे!
माझे सगळे अमेरिकानिवासी मित्रमैत्रिणी,
बेसनलाडू, विकास, धन्या, कोलबेर, टग्या, प्रियाली, चित्रा, प्राजू, आणि सर्कीट!
चला कामाला लागा पाहू सगळे!, आणि लवकरात लवकर सिंडीचा मोबाईल नंबर, घरचा पत्ता मला कळवा!
आमच्या सर्कीटचे संकेतस्थळांवरचे पराक्रम पाहता, त्याला तर सिंडीचा आय पी पत्ता देखील शोधून काढणे अवघड नाही! :))
ती लॉस एंजेलिसला राहते असं विकीत म्हटलंय!
आपला,
(सध्या सिंडीच्या हात धुऊन मागे लागलेला!) तात्या.
प्रयत्न केला आहे
मिळालेल्या माहितीवरून घरचा पत्ता, फोन नंबर आणि जन्मदिन समाविष्ट असलेली व्यक्तीची पार्श्वभूमी अहवाल स्वरूपात हवी असल्यास $४० ($ ३९.९५)शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कळते. मिसळपावच्या खजिन्यातून माझ्या ब्यांक खात्यात ऍडवान्स जमा होणार असला तर पुढील कामास लागतो :)
(संपर्कशील)बेसनलाडू
लाडवा,
$४० ($ ३९.९५)शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कळते. मिसळपावच्या खजिन्यातून माझ्या ब्यांक खात्यात ऍडवान्स जमा होणार असला तर पुढील कामास लागतो :)
अरे हे पैशे फार होतात रे! फुकटात काय जमत असेल तर बघ बुवा...:)
आपला,
(गरीब!) तात्या.
$ ची घसरण
अरे हे पैशे फार होतात रे! फुकटात काय जमत असेल तर बघ बुवा...:)
आपला,
(गरीब!) तात्या.
$ घसरतोय तसा या कडे (आणि त्यायोगे सिंडीकडेही!!) दीर्घ मुदतीची गुंतवणूक म्हणून बघा तरी तात्या ;)))
(अर्थशास्त्री)बेसनलाडू
विचार करतो..
$ घसरतोय तसा या कडे (आणि त्यायोगे सिंडीकडेही!!) दीर्घ मुदतीची गुंतवणूक म्हणून बघा तरी तात्या ;)))
बरं! विचार करतो..
सिंडे, अगं गधडे तुझ्याकरता एवढे पैशे आणू कुठून? :) (...स्वगत!)
तात्या.
अरे अरे!
तात्या,
शकिरा, कॅथरीन झीटा जोन्स, लिव टायलर, नाओमी वॅट्स, निकोल किडमन सोडून तुम्हाला ही आवडावी याचे वाईट वाटले.
(दु:खी) आजानुकर्ण
जावु द्या नका मनावर घेउ
बोका
:)
खरं आहे, आमच्या कर्णाने जरा जास्तच मनावर घेतलं आहे..:)
कर्णा,
शकिरा, कॅथरीन झीटा जोन्स, लिव टायलर, नाओमी वॅट्स, निकोल किडमन सोडून तुम्हाला ही आवडावी याचे वाईट वाटले.
कर्णा,
सिंडी सोडून तुला वरील सर्व आवडाव्या याचे वाईट वाटले! :)
असो, पसंद अपनी अपनी...
तात्या क्रॉफर्ड.
सिंडी
सिंडी सोडून तुला वरील सर्व आवडाव्या याचे वाईट वाटले! :)
मस्त तात्या..
असो, पसंद अपनी अपनी...
बरोबर... मला तर अंजेलीना जोली आवडत होती... आता खास कोणी नाही...
तात्यातुम
स्कार्लेट
कर्णा, लिस्ट मधे स्कार्लेट जोहान्सन राहुन गेली आहे. ;) असो. तात्यांची पसंद सुद्धा लय भारी.
- सूर्य
ही बया तर लय भारी !
तात्याची पसंद भारीच आहे, पर सुर्ये देवा आपली पसंद काय कमी नाय !:)

सुर्ये देवा,
जोहान्सनचा मोबाईल नंबर आसन तर आम्हाला देऊन ठेवा, आम्हीबी बोलून घेऊ एखाद्या दिवशी ! :)
महर्षी विश्वमित्र प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिंडीचा पत्ता
वा! वा! तात्या तुमची आवड लई जबरा बरं का! सिंडी आहेच मस्त. इलियॉनॉइच्या शेतावर वाढलेली ही कन्या अगदी मस्त दणकट. इतर मॉडेल्ससारखी पाप्याचं पितर नाही. आणि तो ओठांवरचा तीळ पहा, येकदम वरिजिनल बरं का! आमच्या रेखाताईंचा तीळ खरा का खोटा असा अजून प्रश्न पडतो मला पण सिंडीबद्दल नाही पडत.
आता तिचा पत्ता शोधायची सोपी कॢप्ती सांगते. तिचा पत्ता शिल्पा शेट्टीला विचारा. ती तो रिचर्ड गेरला विचारेल. सिंडी त्याची पूर्वाश्रमीची बायको. दुसरं काही नाहीतरी पत्ता नक्की मिळेल त्याच्याकडे.
खरं आहे..
वा! वा! तात्या तुमची आवड लई जबरा बरं का! सिंडी आहेच मस्त. इलियॉनॉइच्या शेतावर वाढलेली ही कन्या अगदी मस्त दणकट. इतर मॉडेल्ससारखी पाप्याचं पितर नाही. आणि तो ओठांवरचा तीळ पहा, येकदम वरिजिनल बरं का!
खरं आहे. तिचा तो तीळ बाकी खासच आहे. ह्या व्हिडियोत सिंडी काय छान दिसते पाहा! क्या बात है...
तिचा पत्ता शिल्पा शेट्टीला विचारा. ती तो रिचर्ड गेरला विचारेल. सिंडी त्याची पूर्वाश्रमीची बायको. दुसरं काही नाहीतरी पत्ता नक्की मिळेल त्याच्याकडे.
अगं शिल्पाचं आणि माझं हल्ली तेवढं बरं नाही, त्यामुळे आम्ही हल्ली एकमेकांशी बोलत नाही...:)
असो, खास सिंडीला भेटण्याकरता तरी एकदा मला अमेरिकेत यावंच लागेल! :)
आपला,
(सिंडीप्रेमी) तात्या.
असे शोधा!
www.contactvip.com नावाची वेबसाईट मिळाली. त्यात तुमच्या "व्हर्च्युअल" मैत्रीणीचे नाव दिल्यावर खालील माहीती आली:
Nr Celebrity Type Reported success Last 3 months
1 Cindy Crawford Actor, Model 4 members received a reply from Cindy Crawford 1 in the last 3 months
आता पुढे तुमचे तुम्ही पहा!
धन्यवाद,
विकासराव! परंतु मला तिला मेल वगैरे पाठवायचे नाहीये!
मला तिचा मोबाईल किंवा तिच्या घरचा फोन नंबर हवा होता म्हणजे डायरेक्ट तिच्याशीच बोललो असतो...:)
असो,
तात्या.
क्रॉफर्ड मार्केट मधला सिंधी
मपल्याला अदुगर वाटल कि क्रॉफर्ड मार्केट मधल्या यखांद्या सिंध्याने घोळ केला कि काय? चित्र पहितल्यावर
मंग कळाल कि ह त्येंच्या मनातलि सिंदी वायली हाये. त्येंच्या मनातलेच विच्छा हायेत. बंटा मारला कि असे भास व्हतात बरं का? बम भोलेनाथ म्हन्ल कि डायरेक शंकराला भेटता येतय. तिथ तुमच्या शिंदिच काय घेउन बसलात? ती काय शंकरापेक्षा भारी लागून गेली कि काय? बंटा मारला कि येशीखालून चालनारा मानूस बी टकुर्याला लागनं म्हनून वाकू वाकू चाल्तोय. पावसाच्या पान्याच्या डबक्यात बुडनं म्हणुन वाकु वाकु ठाव घेतुय. यष्टी लई लांब असली तरी अंगाव येईन म्हनून अदुगरच पळत सुटतोय. यकदा रामराम दुसर्यान घेतला तरी धा धा यळंला रामराम करतुयं. मंग मान्स बी वळ्खून जात्यात. यकदन सस्त व मस्त उपाय हाय. अव यकदाच काय धा धा टायमाला बसन तुमच्या सोबत मिसळपाव खायला.
ह घ्या सां न ल
प्रकाश घाटपांडे
:)
मपल्याला अदुगर वाटल कि क्रॉफर्ड मार्केट मधल्या यखांद्या सिंध्याने घोळ केला कि काय? चित्र पहितल्यावर
मंग कळाल कि ह त्येंच्या मनातलि सिंदी वायली हाये.
हा हा हा! :)
वा प्रकाशभावजी, आपण मारलेले चौकार षटकार आमास्नी नेहमीच आवडतात..:)
आपला,
तात्या क्रॉफर्ड.
इंग्रजी नट्या आणि नावांचे माझे वावडे
त्यांच्या नावाचे आणि रूपाचे माझ्या मनात काय वावडे आहे, कोणास ठाऊक. त्यामुळे सिंडी नक्की कोण ते बघायला चार-चार चकरा टाकल्या इकडे. व्यापाराच्या खेळात क्रॉफोर्ड मार्केट पिवळ्या तिकिटाचे होते हे लक्षात राहायला मुळीच कठिण जात नाही. आणि आमच्या ऑफिसमधल्या सिंडीचा चेहरा चांगलाच लक्षात आहे.
मी ज्या बारमध्ये ठाण मांडून असतो, तिथे व्हिडियोवर सारखी मॅडोनाची गाणी दाखवत असतात. माझ्या मित्रमंडळीने हसे करून ("ही कोण?" विचारून, माझ्या भांबावल्या तोंडाकडे हसून) आता मला ती ओळखू येते. पुढचा स्टॉप मराया कॅरी, नेली फुर्तादो. शकीरा आवाजावरून आधीच ओळखू येते.
नशीब की माझे मित्र मला जूडी गार्लंड, बार्ब्रा स्ट्रायसँड वगैरे प्रथितयश पुरंध्रींची ओळख करवून मला त्रास देत नाहीत. या विषयात मी नापास होणार हे विधिलिखित आताशा स्पष्ट दिसू लागले आहे.
केअर ऑफ
तात्या,
सिंडीच्या एजण्टचा पत्ता हा आहे:
Creative Artists Agency
9830 Wilshire Boulevard
Beverly Hills, California 90212-1825
USA
आणि फोन नंबर :
424.288.2000
तुम्हाला ल्युकेमिया च्या रोगींसाठी भारतात चॅरिटी शो करायचा असल्याने सिंडीची मदत हवी असल्यास सिंडी नक्कीच तुमच्याशी बोलेल. तेवढेच तुमच्या हातून पुण्यकर्मही होईल.
- सर्किट
तात्या, झाल
तात्या,
झाला का संपर्क सिंडी काकूंशी?
शिंदेबाईंना
अमेरिकेत मंदिबाई मुळे हळूहळू हालीउड ला घरघर लागली आहे.. तव्हा ईरंगूळा म्हणून
सिंडीबाईंना (शिंदेबाईंना?) देशांतर / सहलीसाठी ईमंत्रण (ईमेल द्वारे दिलेले निमंत्रण) द्यावे का ?
२० फेबूरवारीला झकास कार्यक्रम ठेवता येईल कस ? वाडदिवसाच्या शुबेछा देता येईल .तिला अता ४३ व वरिस लागेल
२०
२० फेबूरवारीला झकास कार्यक्रम ठेवता येईल कस ? वाडदिवसाच्या शुबेछा देता येईल .तिला अता ४३ व वरिस लागेल
१४ फेब पण चांगला मुहुर्त आहे.
अवांतरः यंदा बहुतेक १४ नोव्हेंबर ला सुट्टी घ्यावी लागते आहे. ;)
जगदंब जगदंब
चालू द्या भो ...
बाकी सिंडी आंटींचा पत्ता काढता काढता कोणाला पामेला आंड्रेसन आणि सलमा हयक यांचे पत्ते/लंबरं भेटले तर द्यावेत भौ ..
- टारझन आंड्रेसन
सलमा हायेक
भौ... सलमा हायेकच्या लायनीत मी पण आहे रे...
बिपिन कार्यकर्ते
रंग्या, शितल, मुक्तसुनीत... तात्या विसरला रे !
तर मंडळी सिंडी क्रॉफर्ड प्रकरणी अमेरिकास्थित मित्रांमधे तात्या आपल्याला विसरलाय रे !!! (निषेध) * ३ !!
-----
अवांतरः तात्या -- सिंडी मलाही खूप आवडते. फक्त तिच्यासाठी 'फेअर गेम' हा तद्दन मसाला सिनेमा पाहिल्याचे आठवतंय :)
शंकरराव,
शंकरराव, टारझन, संदीप,
सिंडीबाईचा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद! :)
तात्या क्रॉफर्ड.
क्षमता
बरे आहे तात्या. क्षमता भरपुर वाढलेली दिसते.
काय हो
काय हो मास्तर, नेमकी सिंडीच्याच धाग्यात तुम्हाला बरी क्षमता आठवली?! ;)
स्वगत : आयला हा विनायकमास्तर अंमळ वाह्यातच आहे! :)
तात्या क्रॉफर्ड.
सिंडीचा पत्ता ...
सिंडीचे खरे नाव सिंथिया क्रॉफर्ड आहे
इथे माहिती मिळेल : http://www.mooviees.com/44730-Cindy-Crawford/celebrity
हे घ्या २ पत्ते : इथे मिळाले : http://www.whitepages.com/10583/search/FindPerson?search_id=72101422104…
पहिला पत्ता:
Cynthia Crawford
1653 W 38th Pl
Los Angeles, CA 90062-1000
(323) 643-2269
दुसरा पत्त्ता
Cynthia Crawford
1413 L Ron Hubbard Way
Los Angeles, CA 90027-5903
phone number unavailable
(तुमच्यासारखाच सिंडी भक्त) सागर
अवांतरः सिंडीत आणि माझ्यात एक साम्य आहे. ती २० फेब ची मी ०२ फेब चा :)
धन्यवाद रे
धन्यवाद रे सागर..
थांब आता करतोच तिला फोन!
पण जळ्ळं तिच्याशी बोलू काय नी कसं? साला, आपण पडलो ठार मराठी! आपल्याला तर फाडफाड विंग्लिशही बोल्ता येत नाय! :)
"काय गधडे सिंडे कशी आहेस? तात्या बोलतोय गं ठाण्याहून..!"
असं म्हटलं तर तिला शाटमारी काय कळणार नाय अन् ती फोन ठेऊन देईल!
छ्या..! :)
आपला,
मराठी क्रॉफर्ड.
काँकॉल घ्या
तात्या दुभाषा वापरा .... तुमचं काम ही होईल आणि दुभाषाचंही ... कसं ?
-(बहुभाषिक) टारझन
तात्या,
तात्या, तुम्ही फोन लावा.
बाकीचे बोलतील
;)
गटण्या डब्
गटण्या
डब्बा खाल्लास का?
तात्यानु
आगे बढो
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
तात्या आगे बढो.... सिंडी शी बोलो....
तात्या
तुम्ही लावा फोन... मी दुभाष्याचे काम करीन :)
म्या पन इंग्लिश बोलु शक्तो
इथे हापिसात त्य्येच फाड फाड फाडतो - हा हा हा :)
सागर
फकस्त
फकस्त फाड्फाड बोलच बे
बाकी काही उद्योग नको करु
नाय तर तात्याचा डप्लिकेट बनशील तर वांदा होईल तात्याचा ;)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
असले लाईफ काय रोज रोज मिलते व्हय?
आवं अवलिया,
तात्यांसारखं मस्त आयुष्य नाही जगलं तर लाईफ साला वेस्ट नाय का होणार? असले लाईफ काय रोज रोज मिलते व्हय?
तेव्हा गुमान आपलं मांजरासारखे डोले मिटायचे आनि आप्ली बॅटरी चार्ज ठेवायची
आणि म्या राजरोस गुन उधळले तर माजी बायको माला जिताच ठेवनार नाय....
तेव्हा मौनम् सर्वार्थम् साधनम् :)
(तात्यांसारखाच अस्सल सौंदर्याची कदर करणारा) - सागर
फोन लागल तर..
शिंडीबाईना तात्यान फोन केला हो... ऍन मध्यरात्री फोन आल्यामूळे शिंडेबाई झोपेतच बोलल्या ...
शिंडीबाईची विंग्रजी लई फाष्ट .. तव्हा बाईंचे बोल्ण कानामंधी साठ्वून ठेउन तात्या अर्थ लावन्याचा प्रयत्न करित आहे... बाईंना फूड्ल्या वेळी फोनवर उत्तर देणे आहे. .. आता बोला ....
लई भारी...तात्या
लई भारी...तात्या
एक झक्कास पैकी लेख येऊ द्यात सिंडीबाईंच्या संभाषणाचा....
- सागर
तात्यानू
तात्यानू बरेच मिपाकर लेखाच्या प्रतिक्षेत आहेत..
रोज च्या रोज फोना फोनी चालू आहे ... सिंडीबाईंशी काय बोलण झाल ......
रोज च्या
रोज च्या रोज फोना फोनी चालू आहे ... सिंडीबाईंशी काय बोलण झाल ......
ते आमचं शिक्रेट आहे! प्लीज आम्हाला डिस्ट्र्ब करू नका. तूर्तास आम्ही एकमेकांच्या प्रेमात पार गुरफरलेले आहोत.. :)
असो,
तात्या.
म्हणजे ...
>>प्लीज आम्हाला डिस्ट्र्ब करू नका. तूर्तास आम्ही एकमेकांच्या प्रेमात पार गुरफरलेले आहोत..
लगे रहो. अभिनंदन ...!
पण तात्या त्यामुळे "अनुष्का" हा आयडी फ्री होतो ....
आम्हाला तो घ्यायची परवानगी आहे काय ?
का अजुनसुद्धा राखीव आहे ???
( ह. घ्या. आणि अवांतर वाटल्यास उडवा हे सांगायला नको )
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
सिड क्रॉफर्ड ?
विसोबातात्या,
इथं काहीतरी भलतंच आहे (दुवा स्वत:च्या जबाबदारीवर उघडणे) : https://www.youtube.com/watch?v=S3YIsUVLO_0
आ.न.,
-गा.पै.
+१ ५५५ ७४६२ ८३९ घ्या बोला आता
+१ ५५५ ७४६२ ८३९
घ्या बोला आता