असा गाफिल होऊन चालू नकोस
हे बघ, फक्त रंग बदलतायेत
माहितीये झाडांचे कसे पारे उडालेत
वाटतं पार कायापालट झालाय
असलं हे नेहमीचंच बरं-का
चांगलं हिरवं भरलं रान असतांना
रुसून सन्यासाची करायची सोंगं
मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे
मग बर्फांचे फवारे लागले
थंडीनी चांगली जरब आणली
की येईल जरा डोकं ठिकाणावर
हळूच चढेल पुन्हा खराखुरा रंग
अरे सोंगं कधी टिकत नाहीत
मी कधीच फसलो नाही, सांगतो
तू ही जास्तं भाव देऊ नकोस
त्याचं हे असं नेहमीचंच आहे...
अंशुमानराव,
आपली कविता फारशी समजली नाही..
असो, मिसळपाववर मनापासून स्वागत...
आपला,
तात्या पाडगावकर.
पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना
ही आगळी कल्पना आवडली.
त्रिदंडी संन्यास घेतलेला कितीतरी वेळा दिसतो. आतापासून त्याच्यासाठी हेसुद्धा शब्दचित्र डोळ्यासमोर येईल.
सहमत
धनंजय यांच्याशी सहमत. नवीन कल्पना. आवडली.
हेच म्हणतो
आगळी कल्पना........ आवडली.
फारच सुंदर कल्पना !
असलं हे नेहमीचंच बरं-का
चांगलं हिरवं भरलं रान असतांना
रुसून सन्यासाची करायची सोंगं
मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे
वा ! फार सुंदर कल्पना !
झाडांचा मिडलाईफ क्रायसिस म्हणजे फॉल !
क्या बात है !
- सर्किट
सहमत आहे
(सहमत)बेसनलाडू