झटपट घावन

साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ.
कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे.
तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते.

टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.

ह्यात तुम्ही मोड आलेले धान्य (भिजाणं) घालु शकता.
अजुन पौष्टीक होईल.
:)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

तुझ्या बाबांच्या हातचा एकदा उपमा खाल्ला आहे! खूप छान करायचे! :)

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व!