झानटामाटीक ब्रेड.

ब्रेडचे तुकडे करुन घ्यावे
कान्दा बारीक चिरुन घ्यावे ,टोमाटो बारीक चिरुन घ्यावे
प्रथम कडईत तेल गरम करुन त्यात जीरे घाला.नन्तर थोडि कोथिम्बीर व कडीपत्ता घाला.
कान्दा लालसर तला.मग टोमटो घाला ,चविप्रमाने तीखट व मिठ घाला.
सगल्यात शेवटि ब्रेड्चे तुकडे घाला.व ५ मिनिटे वाफवुन घ्या.

टी वी पहात हा नाश्ता खावुन पाहा.

आम्ही ह्याला पावाची भाजी किंवा फोडणीचा पाव असे म्हणतो...! :)

आपला,
(फोडणीप्रेमी) झानटामाटिक तात्या.

अवांतर - झानटामाटिक म्हण्जे काय देव जाणे! :)

"टी वी पहात हा नाश्ता खावुन पाहा." - हे आवडले.

यात थोडे शेंगदाणे, चुरलेला पापड, आणि तिखटाऐवजी मिरची घालून एक छान वेरिएशन करता येते. त्याला झांटामाटीक भेळ म्हणता येईल !

चकली
http://chakali.blogspot.com

झांटामाटीक म्हणजे काय हो? अफलातून नाव आहे!
आम्हीही याला फोडणीचा ब्रेड म्हणतो.. टोमॅटो न घालता..कोथिंबीर चिरून व लिंबू पिळून घातलं की मस्स्स्त चव येते!

आम्हीही याला फोडणीचा ब्रेड म्हणतो.. टोमॅटो न घालता..कोथिंबीर चिरून व लिंबू पिळून घातलं की मस्स्स्त चव येते!

करेक्ट! :)

झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक
फ़ार छान शब्द आहे म्हणायला...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सराव चालू आहे का? नाही, सगळीकडे असले झानटामाटिक शब्द शोधत पुन्हापुन्हा म्हणून बघताय म्हणून म्हणलं! ;)

(खुद के साथ बातां : रंग्या, बेताने बोल दात घशात घालतील. ते दाडॉ आहेत! ;)

चतुरंग

* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

का? पण देवानंदात काय वाईट आहे? :)

त्यानेही आपले अवघे आयुष्य हिंदी चित्रपटसृष्टीत कलेची सेवा करण्यातच घालवले आहे ना?

नाही, विवेकानंद हे वंदनीयच आहेत व त्यांचे मोठेपणाची आम्हास कल्पना आहेच, पण ते मोठे आहेत म्हणून देवानंद छोटा आहे आणि कुणी त्याच्यासारखे होऊच नये की काय?

शिवाय, केस वाढवले म्हणजे देवानंदाचे विचार वाढलेले नाहीत असे थोडेच आहे? :)

आपला,
(देवानंदप्रेमी) झानटामाटिक तात्या.

नाही हो तात्या! जालावर फिरताना सुविचार दिसला. अंमळ मजेशीर वाटला. देवआनंद हा तर माझा आवडता नट आहे.
पण फार दिवस झाले.. आता बदलायला हवा सुविचार!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

जाऊ द्या हो तात्या ...
हा टोला डायरेक्ट "आम्हालाच" आहे.
बाकी ते देवानंद आणि विवेकानंद फक्त निमित्तमात्र आहे, काय म्हणतात ना ते " तीर कई सारे है, निशाना सिर्फ हम है" ..

असो. खुप "झानटामाटिक" विषयांतर झाले नाही ...

अंमळ जास्तच केस वाढवणारा - झानटमाटिक छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....