गोफ

हा एक खेळ समजा. यात प्रत्येक प्रतिसाद चारोळीच्या स्वरूपात असला पाहिजे अशी अट आहे :) असा खेळ ऑर्कुटसारख्या स्थळांवर फार लोकप्रिय आहे. म्हटलं इथे ह्या प्रयोगाला सुरवात करावी.
(कृपया प्रतिसादात वैयक्तिक टिपण्या करून विणल्या जात असलेल्या गोफात गुठळ्या आणू नयेत ही विनंती)

सुरुवात करतो प्रतिसाद चारोळीतच असला पाहिजे हे लक्षात असु द्या :)) आणि एकापाठोपाठ एक तोच सभासद चारोळी टाकू शकत नाही. (आधीच्या चारोळीवर एकतरी प्रतिसाद आवश्यक)

मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

(चारोळीप्रिय) ऋषिकेश

आम्हाला काव्यातली एक ओळही लिहिता येत नाही याचा खेद वाटतो नाहीतर आम्हालाही आमच्या परिने हा गोफ विणता आला असता! :)

असो, खेळ चालू द्या. आम्ही येथील चारोळ्या वाचू आणि आम्हाला उत्तम वाटलेल्या चारोळीला सव्वा अकरा रुपये बक्षिस देऊ! :)

तात्या.

काय तात्या ,
फक्त सव्वा अकराच?
बघा जरा बक्षिस वाढवता येते का? ... मी ही प्रयत्न करतो मग ;)

(कवितेतील ’वि’ न कळणारा पण बक्षिस लोभी) देवदत्त

तिच्या बापाला पाहता
सुरू होतात जुलाब
ती मात्र डोक्यामध्ये
माळते लाल गुलाब

(ही चारोळी उडवू नका प्लीज. ही आमची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे.)

प्रत्येक सादेला हवा तो प्रतिसाद..
यासाठी पूर्वपुण्याईच हवी
नाहितर आपण म्हणत बसतो श्लोक...
आणि समोरून ऐकु येते शिवी

गोफ विणता विणता
धागे मनाचे जुळतिल का?
मिसळ चाखता चाखता
वाद्-विवाद संपतिल का?

नक्की संपतील, मात्र पुन्हा सुरूही होऊ शकतील बरं! मात्र मनाचे धागे तसेच जुळलेले राहतील याची खात्री आहे!:)

तात्या.

कांदा, कोथिंबीर, रस्सा, फरसाण युक्त अशी
सगळ्यांनाच आवडते इथे पावाबरोबर मिसळ
दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं
स्वतःच्या डोळ्यातलं शोधावं लागतं मुसळ

जमली नाही बॉ

चोरोळ्यांची बरसात..
अशी काही बरसावी..
भांडणे सारी संपून..
मिसळपूरी'त रमावी..

(इथे मिसळ आणि पूरी असा अर्थ नव्हे.. कोल्हापूर सारखे मिसळपूर..)

तात्या.. सह्हि..

धागा धागा विणूनी असे
दृढ होत जावे नाते..
नव्या चारोळी सह भेटेन उद्या
सध्या आपला निरोप घेते...

- प्राजु.

नव्या चारोळी सह भेटेन उद्या
सध्या आपला निरोप घेते...

बाय बाय, टाटा!

उद्या तुला नवी भांडणे वाचायला मिळोत हीच शुभकामना! :))

तात्या.

नवे नाव अन नवे बहाणे
नवेनवेसेच सोंग घेणे
मिटवामिटवी कशाकशाची?
कशाकशाची लाज वाटणे?
(निर्लज्ज)बेसनलाडू

येथील कवींना आवाहन
चारोळी सारखा पाचोळी प्रकार यखांदा करुन पघा.
संकल्पना- पहिल्या चारा ओळी लिहुन यकदम हवेत न्यायच, आन पाचवी ओळ लिहून दानकन जमिनीवर आदळायच. त्यो अर्जुनाचा दशांगुळे चालणारा रथ कंच्या तरी कारनान यकदम जमिनिवर आला अगदी तस्सा.
आपला
(प्रायोगिक)
प्रकाश घाटपांडे