पेन्सिल रेखाटन

RAFFINE 2B Graphite pencil, Kneaded eraser, regular eraser वापरुन केलेलं रेखाटन. हिमाचल प्रदेशमधल्या एका मुलीच्या फोटोवरुन केलंय ..मला त्या मुलीचे टपोरे डोळे फार आवडले होते...

चित्र एकदमच छान काढलंय तुम्ही.
मला त्या मुलीचे टपोरे डोळे फार आवडले होते
खरोखरच डोळे फारच सुंदर आहेत / काढल्येत.

डोळे खरोखर खूप छान आलेत. :)
बाकीचा चेहेरा आणखी उठावदार आला असता तर काय बहार आली असती!
हे रेखाटन जुने आहे का?
(रेखाटनांचा चाहता)मुमुक्षु

नाही अलिकडेच काढलंय. मी बहुतेक वेळेस चारकोल वापरते पण यावेळेस फक्त ग्रॅफाईट पेन्सिल वापरली त्यामुळे फिकट वाटतंय
पण खरंय, अजून गडद चाललं असतं. असो.
सर्वांना धन्यवाद.

माझ्या मते या काळात (मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काळात) रेखाचित्र मिपावर प्रकाशित करण्याची ही वेळ नव्हे.
वेळ काळाचे तारतम्य बाळगायला हवं.

पक्या महाराज , मुंबैत हल्ले झाले म्हणून चांगले जेवण खाणे सोडणार काय ? असेल असे तर आशा करतो तुम्ही रोज आळन-भाकरी खात असाल . चित्र प्रसिद्ध केलं तर काहीही वाईट केलं असं वाटत नाही.
वर्षा तै , चित्र भारी आहे, पण ते पुसट आल्याने मला मला ते काँन्फिडंट स्ट्रोक्स नाही जाणवले.
बाकी हे चारकोल-कॅन्व्हास वर ज्या शेडींग्ज येतात ते आपल्या पेन्सिलने कागदावर येत नाहीत.

- टारझन