ठकीचा संसार

सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना. करंदीकर यांचे "ठकीचा संसार" हे प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन मी लहानपणी दूरदर्शनवर पाहिले होते.यावेळी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. पूर्वीच्या काळातल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू त्यांच्या नावफलकासहित येथे मांडल्या होत्या.काहींचे working models(याला मराठी प्रतिशब्द काय हो)(उदा.ताक घुसळणारी बाई,जात्यावर दळणारी बाई,इ.)ही होते. सुट्टीत गावी गेल्यावर तेथे पाहिलेल्या वस्तूंच्या येथे छोट्या छोट्या प्रति़कृती पाहून खूप आनंद वाटत होता,मजा येत होती.काही वस्तू माहित नव्हत्या त्यांची माहिती आई-बाबांकडून मिळत होती.प्रदर्शन पाहण्यास आलेल्या आजी-आजोबांच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णणीय होता.लहान मुले उत्सुकतेने तिथेल्या वस्तूंची चौकशी करत होती आणि त्यांचे पालक मुलांच्या शंकांना उत्तरं देत होते.श्री. विलास ना. करंदीकरही वस्तूंची माहिती करून देत होते. एक आनंददायी,भावपूर्ण्,मनाच्या एका कोपर्‍यात साठवून ठेवावा असा हा एक अनुभव होता. तेथे काढलेली छायाचित्रे- http://picasaweb.google.com/prachikurkute/Bhatukali?locked=true#

Sorry मिपाकर,पहिल्यांदाच फोटो चढवले होते.
आता दिसत आहेत का फोटो?
महेंद्रजी,तो गुलाबरावमहाराजांनी तायार केलेला गंजिफाचा खेळ होता,फोटोमध्ये आहे.

गंजिफा नाही हो.. नक्कीच सापशिडीचा खेळ होता त्या प्रदर्शनात. मी नाशिकला पाहिलं होतं दोन वर्षापुर्वी. गुलाबराव महाराजांनी बनवलेला असु शकतो कदाचीत माझी चुक झाली असेल, ज्ञानेश्वर म. म्हणालो ते..

असे एक प्रदर्शन काही वर्षापूर्वी मी बालगंधर्व रंगमंदिरात पाहीले होते.

प्राची,
तुमचा अल्बम शेअर्ड दिसत नाहीये. म्हणून फोटो नाही पाहू शकलो.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

ठकीचा संसार दिसला. मस्तच आहे.
आपण त्यापैकी काही भांडी बघीतलीयेत तरी.
बरीच फक्त नावं ऐकलेली भांडीही बघायला मिळाली.
छान!

रेवती

छान भातुकली. ह्यातील बर्‍याचशा वस्तू प्रत्यक्षात वापरात असताना पाहिलेल्या आहेत. त्या पुन्हा पाहायला मिळाल्या आणि बालपणीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?