माउंट रेनियर . .

माउंट रेनियर : भौगोलिक स्थान: वाशिंग्टन राज्य, उत्तर अमेरिका. अधिक माहीतीसाठी इथे टिचकी मारा. मागे बर्‍याच दिवसापुर्वी माझ्या घरापासुन जवळच असलेल्या या निद्रीस्त ज्वालामुखी ला भेट द्यायचा योग आला. वर्षाचा बहुतेक काळ हा ढगांच्या चादरीखाली झाकलेला असतो. कधीकधीच तो असा दर्शन देतो. परेडाइस : Image removed. Image removed. थोडा अजुन जवळुनः Image removed. निसर्ग कधी कधी आपल्या कलेची मुक्तहस्ते उधळण करतो की त्या कलाकाराला दाद द्यावी वाटते. माउंट रेनियर च्या पायथ्याला फुललेली रानफुले Image removed. इथे झर्‍याचे पाणीही कड्यावरुन झोकुन देताना रंगांची उधळण करुन जाते . . Image removed. तळ्यात पडलेले प्रतीबिंब. . . Image removed. कधी कधी अनाहुत पाहुणे आपल्याबरोबर भोजन करायला येतात. Image removed. Image removed. बरेच दिवस मिपा वर काहीतरी भर घालीन म्हणत होतो. लिखाण तर काही करता येत नाही म्हणुन जे येतं ते :-) टीपः हे सर्व फोटो मी स्वतः काढलेले आहेत. कॅमेरा: कॅनन एस ३ आय एस.

छान फोटो...
जागेचे भौगोलिक स्थान वगैरे कळाले तर बरे होईल..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

परेडाईज ,पाण्यातील प्रतीबिंब, रानफुले आणी अनाहुत पाहुणे ...

सारेच फोटो छान आलेत...

येउ देत अजुनही फोटोग्राफी......:-)

(अनाहुत पाहुणा) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

असेच म्हणतो
सर्व छायाचित्रे अ प्र ती म !!

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सर्वच फोटो सुंदर आहेत्...प्रतिबिंब वाला फोटो फार आवडला...त्याच्या वरच्या फोटोतील इंद्रधनुष्य पण सुंदर दिसते आहे.:)

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.

सुंदर फोटोज. मी जाऊन आलेलो आहे तिथे.
नारद धबधब्याबद्दल (Narada falls) नाही लिहीलेत?
खूप सुंदर आहे हा धबधबा. पांढरे शुभ्र खळाळते पाणी. आपल्या नारद मुनींच्या नावावरूनच धबधब्याला हे नाव दिले आहे. अशी पाटी पण आहे तिथे. ह्याचे पाणी नारदमुनींप्रमाणेच शुध्द आहे म्हणून ते नाव दिले आहे असे काहिसे वाचलेले आठवते.

नारदमुनींप्रमाणेच शुध्द
हा काय प्रकार?
नारद आणि शुद्ध?
कळलाव्या कोण मग ?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

>>नारद आणि शुद्ध?
>>कळलाव्या कोण मग ?
हो ना. पण तिथे तसेच लिहीले आहे. त्याला मी काय करणार? मागे फोटो काढले होते..सापडला तर डकवतो.
तूर्तास इथे वाचा http://wotan.liu.edu/~gtoell/naradafalls.html

ओके..
हा नारद शब्दाचा अर्थ असावा इतकेच..
मला मुनीविषयी काही असेलसे वाटत नाही...
_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नारद धबधबा हा माउंट रेनियर मधला सगळ्यात जास्त गर्दी खेचनारा धबधबा आहे. हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतू मधे बघण्यासारखा असतो. उन्हाळ्या खळ्खळणारा झरा हिवाळ्यात गोठुन जातो तेव्हा खुप मोठे असे हिमस्तंभ (icicles) तयार होतात. नारद मुनींच्या नावाचा उल्लेख वाचल्याचे आठवते. हिंदु पुराणात नारद म्हणजे पवित्र / शुद्ध असाही उल्लेख आहे.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.