रंग मंच

Image removed.

सुंदर प्रकाशचित्र :)

कुठे काढले हो हे चित्र?

अवांतर: भिंगाने पाहिल्यास त्या फुलांमध्ये यश राज फिल्मस् च्या एखाद्या सिनेमाचे नायक नायिका गाणे गाताना दिसतील असे वाटते ;)

फार सुंदर...
उत्तम फोटो..

चौकशी : हल्ली चांगल्या फोटोंमध्ये असे काही दिसले की विश्वास ठेववत नाही... फोटोशॉपमध्ये काही फेरफार तर नाहीत केलेले??' ....असे सतत वाटत राहते... कलियुग कलियुग ते हेच असावे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लै भारी साक्षी साहेब,

पण हाय कुठ ही जागा वाईच सांगा बरं... आपल्या इंडीया मध्येच हाय नव्हं... नाय आजकाल भारतात जाणं जरा वाईच कमी झालं हाय ;)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

नमस्कार मिपाकरहो,

१) ठिकाण आहे लुडविक टोक - महाबळेश्वर; मधल्या डोंगरात कोरलेली नागमोडी रेष म्हणजे पोलादपूरला उतरणारा घाट, पल्याड सह्याद्रीच्या रांगा. हे चित्र पावसळा संपता संपता अखेरच्या पावसाचा ओसरा व धुके या सुंदर वातावरणात टिपेले आहे. या भागातल्या दर्‍या खोर्‍यात पावसात रंगलेली हिरवी गवती जमीन नाजुकश्या ,जमिनीलगत फुललेल्या पिवळ्या फुलांनी बहरु लागली की समजावे, नवरात्र जवळ आले.
२) फोटोशॉप - भडकमकर मास्तरांनी ताडल्यानुसार फोटोशॉप वापरले आहे, मात्र रंग बदलणे वा चमत्कृति या अंगाने न वापरता किरकोळ फेरफार म्हणजे विरोधाभास, हरवलेले रंग थोडे हस्तगत करण्यासाठी वापरले आहे. डोंगर दर्‍या जर धुके निवळताना, प्रकाश योग्य रितीने वापरुन टिपले तर जांभळ्या निळ्या छटा टिपता येतात, एका विशिष्ठ अंगाने टिपल्यास आकाश गडद दिसु शकते वा अगदी फिकेही दिसु शकते - गाळण्या वा फोटोशॉप न वापरताही.
३) स्वाती२ वा अन्य कुणालाही हे चित्र आवडले असल्यास संगणकावर डकवण्याची पूर्ण मुभा! दाखविलेल्या सौजन्याचे कौतुक वाटले.

सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.