छाया-चित्र

Image removed.

सु रे ख!!!
कृष्ण धवल करून पाहिले. पण तितकेसे रुचले नाही. आत्ताच्या छायाचित्रातील तांबूसतेकडे झुकणारी छटाच बरी वाटली, दोन्ही छायाचित्रे शेजारी-शेजारी ठेवल्यावर.

मला हा फोटो पाहून गोनीदांचा फोटोग्राफीचा शब्द इथे उसना वापरावासा वाटतो - "सावली-दिवलीचा" खेळ :)
बाकी स्वप्निलाची शंका रास्त आहे पण माझ्यामते इथे "डिजिटल झूम" वापरला असेल.
त्यात पुन्हा छायाचित्राचा ३/४ भाग अंधार/काळा असल्यामुळे केवळ उरलेल्या भागावर(जसे फांद्या) हे डीस्टॉर्शन उठुन दिसले असेल

रसिक मिपाकरहो,

धन्यवाद. हे चित्र संध्याकाळी व मळभ असताना प्रकाशाच्या विरुद्ध टिपले आहे व त्यामुळे केवळ बाह्याकृती साकारल्या आहेत. प्रकाशग्रहण हे पार्श्वभूमीला अनुकुल असे ठेवल्याने पुढील प्रतिमा एकप्रतलिय व काळी आली आहे व तीच्या बाह्याकृतीने परिणाम साधला आहे. हे झाड पाण्यातुन वर आलेले होते, पूर्णत: निष्पर्ण होते ; त्यावरील पक्षी श्री. धनंजय यांनी सांगीतल्याप्रमाणे कॉर्मोरंट आहेत. (कबिनी नदी - नागरहोळे अभयारण्य)

कॅमेरा निकॉन डी ६०, भिंगसंच सिग्मा ७०-३०० पूर्ण ३०० वर टिपले आहे (होडीतून टिपल्याने हात स्थिर ठेवायला फार कष्ट पडले)

सर्वसाक्षी, तुमचा तृतीय नेत्र एकदम पावरबाज आहे. अशा प्रकारचा फोटू काढता येऊ शकेल हे लक्षात येणे हीच माझ्या दृष्टीने जबरा गोष्ट आहे. फोटू तर अफलातूनच आलाय!! टोपी पडली!! :)

चतुरंग