व्हॅलेंटाईन्स डे....

मंडळी,
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो.
या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा..
कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का?
एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत.

ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ. प्रसाद, सर्किट, विनायक, टिंगी.., चेंगट नाना, धोंडोपंत काका, प्रमोदकाका, तात्या.. तमाम मिपाकरांना.. ही विनंती की, आपण सगळ्यांनी याला हातभार लावावा.

(पुन्हा नव्या जोमाने उभी) प्राजु.

शब्द जोडताना माझ्या
हातून एक काव्य घडले..
कळलेच नाही मला मी
मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले...

- प्राजु

वा प्राजू, छान आहे उपक्रम!

चालू द्या..

(पुन्हा नव्या जोमाने उभी)

हे आवडले..:)
वेलकम ब्यॅक...

मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले...

तुझे मिपावरील प्रेम असेच कायम राहू दे, हीच संत व्हॅलेन्टाईनच्या चरणी संत तात्याबांची प्रार्थना.. :)

आपला,
संत तात्या.

अवांतर - आम्हाला पिरेम करण्याकरता १४ फेब्रुवारी हा एकच दिवस नव्हे तर कुठलाही दिवस चालतो! :)

अजून वारयावर गुंजतात
ज्याच्या प्रेमाच्या आरोळ्या
असा हा पिवळा डांबिस
कशाला करील चारोळ्या?
:))

तुझ्या आग्रहाखातर केलेली माझ्या आयुष्यातली ही पहिली चारोळी!
खराब निघाली तर प्राजुला धोपटा, रे!! :)))

क्या बात है.... एकापेक्षा एक

विसाव्याच्या शोधामधे
दूनियेत रणरण फिरलो,
फिरून पुन्हा आईच्या
कुशीत मी शिरलो.

'आई'.....आपल्या आयुष्यातले पहिले प्रेम.... या व्हेलेंटाईन डेला सर्वप्रथम तिला ही प्रेमळ भेट.
बाकी 'तात्यांच्या' म्हणण्याप्रमाणे प्रेमाकरीता आम्हालाही व्हॅलेंटाईन डेची गरज नाही.... आपला प्रत्येक क्षण 'व्हेलेंटाईन....

(प्रेमळ) -इनोबा

तू इथे नसलीस तरी
तुझे अस्तित्व प्रत्येक रंगात आहे
आपल्या प्रेमाची मदहोशी
अजूनही माझ्या अंगात आहे...
पुण्याचे पेशवे

पुन्हा उपक्रम चालू केल्याबद्दल आनंद झाला.
प्राजु, धनंजय, विनायक, ऋषिकेश. पिवळा डांबिस चालू राहू दे...
आम्हाला नविन नविन चारोळ्या वाचायला दिल्याबद्द्ल धन्यवाद.

प्रेम कर गरीबा सारखं
कोंड्याच्या भाकरीवर
प्रेम कर कुंभारासारखं..
मातीच्या खापरीवर (मांडे भाजण्यासाठी लागणा-या)

- प्राजू

वाचतो आहोत (नाहीतरी काव्याच्या बाबतीत आम्ही तेवढेच करू शकतो!).

चारोळ्या पुन्हा सुरू झाल्या हे चांगले झाले!

(रसिक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कॄष्णाची घेण्या फिरकि राधा झाली कान्हा
जाता सामोरी त्याला, अचंबित कान्हा दिसे..
म्हणे तिला"कृष्णाच्या नयनी दिसे राधा ..
पण तुझ्या तर नयनी कान्हाच वसे???"

- प्राजु

छ्या! कैच्या कैच केली आहेस हो ही चारोळी!

आपल्याला नाय आवडली!

प्रामाणिक मत, राग नसावा...

आपला,
('चारोळ्या पाडणे' या प्रकाराला भयंकर घाबरणारा!) तात्या.

कृष्णाची घेण्या फिरकी राधा झाली कान्हा
जाता सामोरी त्याला,अचंबित दिसे कान्हा
म्हणे राधेला, मम नयनात फक्त वसे राधा..
तव नयनात मात्र मजला दिसतसे कान्हा

ही चारोळी नसून ती नागपूरच्या एका कविंच्या कवितेच्या पहील्या चार ओळी आहेत. पण त्या फार सुंदर आहेत त्यामुळे इथे देण्याचा मोह आवरत नाही. जर कोणाला ती कविता आणि कवि माहीत असतील तर कृपया पूर्ण कविता प्रकाशित करावी.

वेदना पचविल्या ज्यानी
हसण्याचे मानकरी ते,
त्यानीच फुले वेचावी
काट्यांशी ज्यांचे नाते......
-अज्ञात कवि

-वेदना पचवणारा
डॅनी
पुण्याचे पेशवे

प्रेमाची लाली चढे मम गाली
अशी ही जादू केली तरी कुणी
लाज आली पाहूनी मजला
प्रतिबिंब माझे त्या दर्पणी..

- प्राजु

( कृष्ण -राधेची कल्पना शब्दांत नाही नीट मांडता आली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. प्रमोदकाकांनी ति उत्तम शब्दांत मांडली, धन्यवाद प्रमोद काका.)

आयुष्यात कधीहि लिहिल्या नाही
कवितेच्या दोन ओळी
तुझ्या प्रेमात प्राजुताई
ही पहीली चारोळी

छे फार कठीण आहे ग प्राजु...अशी लिहितेस तु इतक्या छान चारोळ्या.....

प्रेमात..

प्रेमात पडले कसे मी
कळले ना माझ्या मनी
उमजले सर्व काही
प्रतिबिंब पाहता मज तुझ्या नयनी

(पहिलीच चारोळी आहे. चारोळी एक्स्पर्ट प्राजू , जमलं का नाही सांग गं!!!)

प्रेमाची चारोळी | करायाचा ध्यास |
नाही तो अभ्यास | काव्यक्षेत्री ||
जमावी ती कशी | चारोळी मजला |
म्हणे 'चतुरंगा'| धाव आता!||

चतुरंग

वरदा, गौरी, चतुरंग.. अप्रतिम..
येऊद्यात अशाच आणखीहि...

प्रेमामध्ये असे | अशी काही जादू| |
हरवतो साधू | मेनकेत| |
कोण म्हणे प्रेम | सुखाचा निचरा |
नाही त्यास थारा| दुनियेत| |

- प्राजु

प्रेमाची ती हाक | असे किती मोठी |
दुसरी चारोळी | पहा झाली ||
प्रेमच ते मोठे | व्यापून उरले |
'मि.पा.'अवकाशा | दशांगुळे ||

चतुरंग

वा. चतुरंग.. सह्ह्ही बॉस

चारोळीत तुझ्या | प्रेम भरलेले|
भरून उरलेले| अंतरात| |
मि.पा.अवकाश| कृतकृत्य झाले|
धन्य ते पावले| आंतरजाली| |

-प्राजु

अरे सभासदा | श्लोक नाहि काही|
प्रेमाचीच असे| चारोळी ही| |
प्रेमाचीच गाथा| प्रेमिकांच्या ओठी |
कविता वा श्लोक| लिही तू ही | |

- प्राजु

प्राजूबाई तूम्ही|म्हणता म्हणून|
पामर हा काही|नाही काव्यासी लायक||
आम्ही खरडतो चार| ओळी काही बाही|
चारोळी म्हणती|जन आपसूक||

जमलं एकदाचं... हूश्श.....!

-संथ इनोबा(संदर्भः मिसळबोध)

च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ...

म्हणून आमच्या मनाच्या भावना दर्शवणार्‍या "संदिप आणि सलील" यांच्या ४ ओळी देत आहे ....

" दिसे जे कवीला , न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे ... ....
दिसे जे कवीला , न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे ... ....
मला तू न दिसशी, परंतु तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे ....

प्रिये ये निघेनी घनांच्या कडेने .....
मला एकटेसे आता वाटत आहे ..... "

विरहतेने व्याकूळ [ छोटा डॉन ]

च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ...

आम्हीही दिवसातून एकदा तरी अगदी हेच म्हणत असतो! :)

तात्या.

महाबळेश्वर वाई पाचगणी
कोयना भीमा कास बामणोली
ठोसेघर प्रतापगड सज्जनगड
सह्याद्री अजिंक्यतारा
आय लव माय(भू़मी) सातारा

- रविराज .

माफ कर प्रिये मला, तुला मी खोटं बोललो
तुझ्या आधी सुद्धा होतो मी प्रेमात पडलो
येते जेव्हा आठवण तिची, मनात खमंग वारा वादळी
ती होती माझ्या आजीच्या हातची पुरणपोळी

पुरणपोळीवर तुप जोडीला आमरस
प्रेम घट्ट झाले आमचे दिवसेंदिवस
कधी निमित्त सणाचे कधी वाढदिवसाचे
तर कधी आमच्या भेटीला निमित्त माझ्या रुसण्याचे

एकदा मात्र घात झाला
पुरणपोळीने धोका दिला
अचानक आजी निघुन गेली
प्रेयसीही माझी तिच्याबरोबर गेली

आता जेव्हा गावी जातो
चुली समोर आजीला पाहतो
तीच्या आठवणींच्या पुरणपोळ्या
मी पोटभर खातो

- रविराज.

पांधरा शुभ्र गोळा तरंगे
जशी सळसळे तरूणाई
मुखी येता.. तृप्त आत्मा
ती माझी रस्-मलाई.....

उम्म्म..... वा वा...

- (रसमलाईत गुंतलेली )प्राजु

भरपुर झाले 'राज'कारण
अन 'सपा'ची सत्तेची हाव
मिटवा वाद सगळे आता
वाढवु फक्त प्रेम अन् बंधुभाव

- (समस्त भैय्यांचा भाऊ) छोटी टिंगी

श्याम नभ जसे झाकोळे चंद्रमा
कृष्ण कूम्तल व्यापे तव मुख चंद्र्मा
नभातुन जसा चंद्र प्रकाश झळाळे
कुंतलातुन तव सौंदर्य प्रभा झळाळे ...

(प्रेमवीर) अव्यक्त!

अव्यक्तने व्यक्त केलेली भावना खरच मस्त आहे.....

आणि काय हे तात्या. कोण ही अनुष्का सांगा की ! काय झाले 'प्रेमळ' विषयांतर झाले तरी.

पुण्याचे पेशवे

तिने मोठ्या तोर्‍याने
माझे प्रेम झिडकारले
तेच फूल सुदैवाने
तिच्या मैत्रिणीने स्विकारले.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रेमे झाली, झाल्या आणाभाका
लग्ने झाली, झाली पोरे बाळे, बळे.
कुठ्ली प्रभा? कुठ्ला चन्द्रमा?
नभातुन कुठे तो चंद्र प्रकाश झळाळे
कुंतलातुन मम फक्त गुन्ता कोसळे

क्या बात है..

वास्तववादी चारोळी! नुसत्या छान छान, प्रेमळ प्रेमळ चारोळ्या वाचून कंटाळा आला होता!

तात्या.

का झालं असं?

कदाचित तुझं तुझ्या नवर्‍यावर जरा जास्तच प्रेम असावं म्हणून असं झालं! :)

एक पोस्ट उडवता येईल का प्लीज?

हो नक्कीच येईल. परंतु राहू दे! मिपाने तुला नवर्‍यावर दोनदोनदा प्रेम करायची परवानगी दिली आहे! :)

तात्या.

मी पाहीलच लगेच खालंचं पोस्ट लिहिलं..पोस्ट कसं उडवायचं? अहो प्राजु कडुन प्रेरणा घेऊन सुचेल ते लिहिते...तिला कसं सुचतं कोण जाणे म्हणुन म्हटंलं आपणही प्रयत्न करत रहावा......

कळ्ळं होतं मला ते..उत्तर लिहीते म्हट्लं आणि राहीलं...आता चारोळित उत्तर

प्रेम का मोजून करता येतं
ते कायमचं असतं...
ते दोन जणांच्या नुसत्या असण्यानं नाही
मनं गुंफल्यानं होतं...

प्राजु तू आता बास कर गं म्हणेपर्यंत लिहीणारे मी चारोळ्या....

प्रेमाचे हे लक्षण
असते खास
चोहीकडे होतो
आनंदाचा आभास

अजुन एक
जीवनदायीनी,वात्सल्य तु
तुच आहेस माया
प्रेमस्वरुप आई तु
देवाचीच काया

(जमली का हो चारोळी??,या प्राजुजीं काय सुंदर चारोळ्या करतात,कस जमत कोन जाणे
असतात चार ओळी पण निबध लिहीणे सोपे अस वाट्तय,चार ओळीतच वेड लागायची पाळी आली)

प्रेमाचे काय
तुझे माझे सेम आहे
तुझे त्याच्यावर आहे
माझे तुझ्यावर आहे......

मी कधीच लिहीत नाही
कवीता हा माझा प्रांत नाही
पण तुझ्यात व माझ्यात काही सेम असावे
ह्यातच ह्या चारोळीच्या जन्माची मेख आहे.....

जशी जमली तशी केली आहे चारोळी मी
आवडली तर बेस्ट आहे
नाही तर नेहमी प्रमाणे वेस्ट आहे
कोणी नाही तर वाचनारे गेस्ट (पाहूणे सदस्य) आहेत

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सौंदर्याचा अविष्कार
हा शब्दांचा आहे खेळ
कविता म्हणजे
मनातील भावनांचा सुंदर मेळ

(तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद वरदा,स्वाती,प्राजु)

सुर्व्या निघाला लाल होऊनी
वाटेला लागला परतीच्या
क्षितिजावरती चुंबुनी गेला
कोमल अधरा धरतीच्या....

- प्राजु
( सुर्व्या - म्हणजे सुर्य..)

ह्या सुर्याचे रोज नवे नाटक आहे
दिलावर रोज नवा दंश आहे
आज जगावे तुझ्यासाठी
तर मागे आपला वंश आहे...

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

वाटतो. ही ग्रंथि आम्हाला जन्मतः च नाही. फार फार मजा आली. आपल्या सर्वांचे कौतुक वाटते. प्राजू, हा आनंदमयी चैतन्याचा ओघ असाच राहू दे. सर्वांना धन्यवाद.