दिवेआगार - हरिहरेश्वर : एक नितांतसुंदर विकांत

काही दिवसांपुर्वी एका विकांताला दिवेआगार तसेच हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. निसर्गाच्या सान्निध्यात एक नितांतसुंदर विकांत घालवण्याचे सुख काही वेगळेच असते. जाण्यापुर्वी इथुनच फोन करुन बुकिंग करुन ठेवले होते. Image removed. केळकरांच्या वाडीनेच मुळात वेड लावले. नाना तर्‍हेची फुले, माडाची उत्तुंग झाडे .... Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. दुपारी चारच्या दरम्यान समुद्रकिनारा गाठला. मनसोक्त समुद्रस्नान , किंबहुना समुद्राच्या कुशीत घातलेला धांगडधिंगा आणि नंतर तो देखणा सुर्यास्त ! Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून हरिहरेश्वर गाठले. जगन्नियंत्याचे दर्शन घेवुन मग मोहरा वळवला हरिहरेश्वराच्या देखण्या सागराकडे.... Image removed. Image removed. Image removed. शेवटचा थांबा होता, हरिहरेश्वर येथील विख्यात शुक्लतिर्थ ! Image removed. Image removed. Image removed. पुणे तसेच मुंबईवरुन दिवे आगार जाण्यासाठी स्वतःचे वाहन असल्यास उत्तमच. नसेल तर हा पर्याय आहेच. Image removed. मग कधी जाणार दिवे आगार आणि हरिहरेश्वरला ? विशाल

तात्या, सहजराव धन्स...

आणखी थोडी माहीती राहण्याच्या सोयीबद्दल..

केळकर यांचे भोजन व निवासगृह
मु.पो. दिवेआगार, हायस्कुलसमोर, (एकच हायस्कुल आहे तिथे)
ता. श्रीवर्धन, जि. रायगड - ४०२ ४०४.
दुरध्वनी : (९५२१४७) २२४२७९
भ्रमणध्वनी : ९४२३२३४१२८
संपर्क : सौ. अपुर्वा प्र. केळकर

सुवर्ण गणेशमंदीरापासुन त्याच रोडवर सरळ पाच मिनीटे पुढे गेले की लागते. केळकरांची छोटीशी वाडी आहे. तिथेच त्यांचे राहते घर आहे. शेजारीच त्यांनी एकात दोन अशा तीन खोल्या बांधलेल्या आहेत. (एकुण सहा) एका खोलीचे भाडे ४०० किंवा ५०० रुपये. (दोन्हीचे मिळुन साधारण ८०० होतात) स्नान व इतर विधींची ;-) चांगली सोय आहे. जेवणही उत्तम मिळते. केळकरकाकुंचे हातात न मावणारे उकडीचे मोदक तर अफलातुनच असतात. मांसाहारी जेवणासाठी इतरत्र सोय होवू शकते.

From vishal" alt="" />

केळकरांची राहती जागा .. इथे अंगणात मस्त झोपाळा आहे, आराम करण्यासाठी.

From vishal" alt="" />

पाहुण्यांसाठी खोल्या ...

From vishal

खादाडीची जागा ...

From vishal" alt="" />

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

ज ह ब ह र्‍या मालक __/\__

एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

फोटो खासच आहेत. माहिती पण आवडली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

तुम्ही बरेच भटके आहात तर!
फोटू सुरेखच! आणि संपर्कमाहिती आवडली, धन्यवाद.
वर्णनही आणखी जास्त टाकत चला राव, प्रवास कसा घडला, काय काय बघितलं...
(खुद के साथ बातां : ह्म्म..आता समजलं ह्या विशालला सारख्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या भयकथा कशा सुचत असतील ते! :? )

(सूर्यास्तात हरवलेला)चतुरंग

खरचं राहण्याची खुप छान व्यवस्था असते केळकरांकडे.
आम्ही पण तिथेच राहीलो आहोत. आणी केळकरांकडचा शाही उकडीचा मोदक तर विसरुच शकत नाही एवढा सुरेख बनवला होता.
तुमचे सगळेच फोटो सुंदर आले आहेत.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

आजतागायत तीन खेपा झाल्या दिवे आगार आणी हरिहरेश्वरच्या... पण प्रत्येक वेळी तिथे जाउन आलं की मन आणी शरीर... दोन्ही हलकं होउन जातं... आणी मुख्य म्हणजे अजुन पर्यटनापासून untouched असल्यामुळे किनारे स्वच्छ आहेत... मी आणी माझे मित्र गमतीने या जागेला भारतातलं न्युझीलंड म्हणतो... बाकी सुर्यास्ताचा फोटो झकासच...