दोन फुल एक हाफ

या रविवारच्या लोकसत्ता मध्ये चतुरन्ग पुरवणीतील दोन फुल एक हाफ वाचला. लेख मराठी अस्मितेचे राजकारण करणारया राजकीय पक्षाविषयी असुन फारच मार्मीक आहे.

मिपा करासाठी त्याची URL येथे देत आहे. (http://www.loksatta.com/daily/20080217/lr05.htm)

जरूर आस्वाद घ्यावा व प्रतिक्रिया नोन्दवाव्यात.

आपला,

ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

लोकसत्ता इन्टर् नेट वर वाचण्याकरीता Dynamic Font ActiveX Control Install करावा लागतो. टो लोकसत्ता च्या साईट वरतीच मिळतो.

लेख मस्त.. मजा आली.. दुव्या बद्दल आभार
फक्त एक चुक खटकली

जी सेना बी.इ.एस्.टी. मधल्या बाँम्बेचासुद्धा मुंबईकरु शकली नाहि...

बी.इ.एस्.टी. मधला बी हा बाँम्बेसाठी नसून बृहन्मुंबईसाठी आहे

(मुंबईकर) ऋषिकेश

बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity .....
माझ्या बस पासावर तरी तसं (बृहन्मुंबई/bruhanmumbai) लिहिलं होतं बॉ!
कदाचित "बेस्ट" नावात बदल करावा लागु नये म्हणून केलेली युक्ती असावी. तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय?

ऋषिकेश

अ. आय ई मध्ये लोकसत्ता नीट दिसतो. विशेष काही करायची गरज नाही. अडचण असल्यास लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करून पहा.
ब. मॉझिला फायरफॉक्समध्ये पाहताना -
१. लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करा.
२. साइट पाहताना : व्यू > कॅरॅक्टर एन्कोडिंग > वेस्टर्न (आय एस् ओ - ८८५९ - १) सिलेक्ट करा.
साइट नीट दिसेल (दिसायला हवी)
(उपायसूचक)बेसनलाडू