सोल बांगडे

साहित्यः
बांगड्याचे ६ तुकडे (मध्यम आकाराचे)
लसूण पाकळ्या ६/७
धणे पावडर ३/४ चहाचा चमचा
हळद चिमूटभर
लाल मिरची पावडर १ चहाचा चमचा
कोकमचे तुकडे ३/४
तेल १ चचमचा
पाणी १/२ कप
मीठ चवीनुसार

पध्दतः
लसून ठेचून घ्या. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण १ मिनिट भाजून घ्या. नंतर धणे पावडर, मिरची पावडर, हळद घाला. १ मिनिटानंतर बांगड्याचे तुकडे घालून परता.आता १/२ कप पाणी घाला. कोकमचे तुकडे घालून मासे शिजवून घ्या. (बांगडे पारदर्शक रंग सोडून पांढरट दिसायला लागले की शिजले आहेत असे समजावे. ) डिशमध्ये काढून कोथंबिरीने सजवा,
गरमागरम सोल बांगडे तय्यार!

(टिप : कोकमचे तुकडे नसतील तर चिंच चालते, मात्र पदार्थाचे नाव "चिंच बांगडे" सांगावे :)

राजमुद्रा :)

वेगळीच पाककृती आहे. आतापर्यंत बांगडे खाल्ले ते फक्त तिरफळं घातलेल्या कालवणात किंवा भाजून. आता सोल बांगडे ट्राय करून पहायला हवेत :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

मी अजून बॉस्टन आणि स्पॅनिश कुठ्लेच मॅकरल (भारत कधीच न सोडल्यामुळे) खाणेच काय पण पाहिलेले सुध्दा नाहीत.
त्यामुळे मी याबाबत मार्गदशन करू शकत नाही.
तिरफळांचं विचाराल तर हरकत नाही. पण त्यामुळे नेहमीची (तिरफळे घातल्यामुळे येतो ती) चव भाजीला येण्याची शक्यता आहे.
पण रेसिपीमध्ये जेवढ्या कमी (किंवा योग्य त्या) वस्तू घातल्या तर पदार्थाची नैसर्गिक चव बिघडत नाही, याचे उदाहरण म्हणजे : कुठल्याही खेडेगावाला,कुठ्लीही भाजी किंवा आमटी छानच लागते. कारण- कमीत कमी जिन्नसांचा स्वयंपाकात वापर!
अर्थात हे माझे वैयक्तिक मत.

राजमुद्रा :)

बांगड्याचे आंबोटीक असेच करतात. त्यात फक्त साखरही घालतात. असो.

धणे पावडर ३/४ चहाचा चमचा - ३ ते ४ चमचे की तिन चतुर्थांश चहाचा चमचा?
कोकमचे तुकडे ३/४ - ३ ते ४ कोकमं की की तिन चतुर्थांश कोकम?
पाणी १/२ कप - १ ते २ कप पाणी की अर्धा कप पाणी?

धणे पावडर पाऊण चहाचा चमचा
कोकमचे तुकडे ३ ते ४
पाणी अर्धा कप

राजमुद्रा :)

धन्यवाद राजमुद्रा.
माझाही अंदाज तोच होता पण मुळचा खोडकरपणा (च्यायला) पाठ सोडत नाही.

माणसाने खोडकरपणा सोडला की माणूस म्हातारा झाला असे म्हणतात!
खर्‍या जगात मोठं झाल्यावर तो सोडावाच लागतो.
पण इथे मात्र हरकत नाही , असेच आयुष्यभर खोडकर राहा :)

राजमुद्रा :)

वेगळी चव म्हणून हरकत नाही.
फक्त लसूण भाजल्यावर कांद्याची पेस्ट चांगली लाल होईपर्यंत तेलात परतावी लागेल.

राजमुद्रा :)

नवीन पाककृती! पुढच्या आठवड्यात भारतात जातच आहे तेव्हा करून पहायला हवी. इथल्या चिनी दुकानातील मॅकरेलला भारतीय बांगड्याची चव नाही!

पण ही पाककृती "काथ्याकूट" मध्ये घालण्याचे कारण समजले नाही!

सरपंचांस विनंती - हल्ली मिसळपावावर बर्‍याच पाककृती येत आहेत. तेव्हा पाककृतींसाठी वेगळा विभाग सुरू केल्यास बरे होईल. "काथ्याकूट" मध्ये पाककृती बर्‍या वाटत नाहीत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लेखन करावे असा पर्याय कुठे आहे? इथे तर मला लेखन करा असा आदेश दिसतो आहे. त्यात पाककृती हा पर्याय नाही.

लेखन करावे असा पर्याय कुठे आहे? इथे तर मला लेखन करा असा आदेश दिसतो आहे.

हम्म्म! May be..! :)

त्यात पाककृती हा पर्याय नाही.

अजून काम सुरू आहे.. कृपया थोडी वाट पाहावी लागेल. गैरसोयीबद्दल दिलगीर आहे..

तात्या.

वा वा वा वा,

अप्रतिम पाककृती. अशाच अजून पाठवा. मत्स्याहार म्हणजे आमचा जीव की प्राण.

आपला,
(दर्यासारंग) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com