Welcome to misalpav.com

शशक | तीर

लेखक: हणमंतअण्णा शंक… | प्रसिद्ध:
भावकीने मोठ्या भावाचा झोपेतच गळा घोटल्यावर बिथरलेला तो मृगजिनधारक साधूवेषात उत्तरेकडे पळत होता. ज्यांच्या वैभवासाठी त्याने आयुष्य दिले, तिसऱ्या पिढीतच ते परस्परांच्या उरावर उठलेले. एका नदीकाठी झाडाखाली थकून पहुडल्यावर त्याचा लगेचच डोळा लागला. जिवलग मित्रासोबत केलेले धमाल अग्निकांड स्वप्नात आले. गोमांस-घृताने परिपुष्ट हजारेक आर्यपुत्र घेऊन; अनार्य असंस्कृत मातृसत्ताक वनवास्यांना जिवंत जाळत केलेला धर्मसंस्थापनेचा थरार! सोळा संस्कार झुगारणाऱ्या, मनमर्जीने आवडीच्या पुरुषाशी रत होणाऱ्या नागस्त्रियांच्या, त्यांच्या कोवळ्या मुलींच्या जळताना किंकाळ्या!


जिरेटोप

लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:
"सर... ओळखलंत का मला?" आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्‍यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो. पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अ‍ॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा.


हरिश्चंद्र-शशक+

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
तू कुठे इकडे?कोण गेलं? थंडीत जळत्या सरणा समोर तो एकटाच बसला होता. जास्तच कुरेदल्यावर,तो आपली रामकथा सांगू लागला. "बाप कबाडी होता.रस्त्याच्या कडेला कबाडातच मेला. या जगात तो आणी मीच. जाणाऱ्या येणाऱ्यानां वाटत होते बेवडा आहे. दोन चार गाडीवाल्यांनी पाच दहा रूपायाच्या नोटा फेकल्या आणी पुढल्या जन्मासाठी पुण्य कमावलं.शेवटी तिथल्याच एका हातगाडीवर टाकला व मसणात विल्हेवाट लावली. छडा गिरधारी, ना लोटा ना थाली. सरकारी लोक देतात थोडेफार.


शशक | आवंढा

लेखक: हणमंतअण्णा शंक… | प्रसिद्ध:
माहूरगडाला निघालेल्या टूर-बसमध्ये काका सहप्रवाश्याला तावातावाने सांगत होते - 'कुणी सांगितलं आपल्याकडे स्त्रियांना किंमत नव्हती? अहो, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियां ऋषिंच्या तोडीस तोड. ते स्त्रीमुक्ती वगैरे कौतुक आम्हाला सांगू नका लेको.. म्हणजे आपल्याकडे शिक्षण, समानता वगैरे आहेच.. आपल्या महान संस्कृतीत..खक्क..' वचावचा बोलून घसा कोरडा पडल्याने काकांना ठसका लागला.