अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१

Submitted by टर्मीनेटर on
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

दिवाळी अंक २०१५: आवाहन

Submitted by संपादक मंडळ on
नमस्कार मिपाकर हो, गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती.

संपादकीय

Submitted by पैसा on
नमस्कार मंडळी! मिपाचा तिसरा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना अर्थातच प्रचंड आनंद होतो आहे. गेल्या २ वर्षात चालू राहिलेली परंपरा अशीच पुढे चलू राहिली पाहिजे म्हणून या वर्षीही दिवाळी अंकाच्या कामाला सुरुवात केली, नेहमीपेक्षा जरा लौकरच! त्यातच छायाचित्रणकलेच्या १७५ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्रांची स्पर्धा सुरू केली तिलाही उदंड प्रतिसाद मिळाला! आतापर्यंत ३ स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केल्या त्यातल्या दुसर्‍या स्पर्धेतील विजेत्या चित्रांचा समावेश या दिवाळी अंकात केला आहे.

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

Submitted by संपादक मंडळ on
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

माझी दिवाळी

Submitted by संपादक मंडळ on
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

दिवाळी अंक २०१३

Submitted by संपादक मंडळ on
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे.

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

Submitted by संपादक मंडळ on
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते.