Skip to main content

वाटले होते

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 25/08/2026 09:33 या दिवशी प्रकाशित केले.

 

सुखासाठी तुझ्या मी धडपडावे वाटले होते 

(कधी काळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते)

 

जरी तू चालली होतीस माझी साथ सोडूनी 

वळून एकदा मज तू बघावे वाटले होते 

 

तुला मी पाहिले जेव्हा, तुझ्याशी बोललो जेव्हा 

असे सुंदर कुणी अपुले असावे वाटले होते 

 

लबाडीने जरी ते खेळती जिंकावया सारे

तिच्यासाठी मला सारे हरावे वाटले होते

 

मला स्वीकार वा झिडकार तू मंजूर आहे पण

तुझ्यासाठी मला 'अनघड' सजावे वाटले होते 

 

                       ©️®️  नाहीद नालबंद 'अनघड'

 

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 54
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

लबाडीने जरी ते खेळती जिंकावया सारे

तिच्यासाठी मला सारे हरावे वाटले होते

हा शेर खास आवडला!

साधीशीच गझल, साधेच शेर, पण छान! 

बऱ्याच दिवसांनी गझल वाचायला मिळाली. आनंद झाला!