२०२२ हे एक रोडट्रीप special dream वर्षे होत , कारण एकाच वर्षात भारतातील २ अशी ठिकाणे , जे प्रत्येक पर्यटन प्रेमी च्या लिस्ट मदे टॉप ला असतात . पहिलं म्हणजे लडाख - भारताचं उत्तरेकडील टोक आणि दुसरा कन्याकुमारी - भारताचं दक्षिण टोक .
लेह लडाख -
भरपूर लोक बोलले फर्स्ट time मध्ये पुणे लडाख पुणे सोप्प नाय , अर्ध्यातूनच याल, गाड्या ट्रेन ला लोड करून दिल्ली पासून जा , पण नाही या वेळी पक्कं ठरवलेलं पुणे ते पुणे करायचंच.
जवळपास १५ दिवसांचा प्रवास , जातानाचा प्रवास : मुंबई - सुरत highway - वडोदरा - मोडासा - जयपूर - हरियाणा - अंबाला - पठाणकोट - श्रीनगर मार्गे लेह.