Welcome to misalpav.com

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
केस पांढरे तरी हा डाय लावतो हिरवा पाखरांनो सावधान घुमे टेचात पारवा केस पांढरे तरी हा डाय गुलाबी लावतो पाखरांनो उडलात तरी पिसे हा मोजतो केस पांढरे तरी हा काळा कलप लावतो पाखरांनो सावध हा दाणे दुरून टाकतो केस पांढरे तरी हा अंतर्यामी अतरंगी पाखरांनो नका भिऊ निर्विष याची हो नांगी (#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)


असं कुठं लिहिलंय?

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
पेरणा मागे वळून बघू नये, म्हातार्‍याने चळू नये, आठवणीत जळू नये, असं कुठं लिहिलंय? अवचिता परिमळू नये, शरदी मेघांनी पळू नये, अवकाळी झरू नये, असं कुठं लिहिलंय? कातरवेळी झुरू नये, कांचनसंध्यी उमलू नये, गजरा भाळी माळू नये, असं कुठं लिहिलंय? एकांताशी बोलू नये, भरल्या डोळी डोलू नये, ओल्या शब्दीं भिजू नये, असं कुठं लिहिलंय? उंबऱ्याशी थांबू नये, गवाक्षी झांकू नये, प्रेमागंधी गंधू नये, असं कुठं लिहिलंय? सावलीं मागे धावू नये, भूतकाळाशी भांडू नये, शब्द मागे फिरवू नये , असं कुठं लिहिलंय? हसू ओठी बांधू नये, आंसू कुणा


पाउली पैंजणांचा मला भार आहे

लेखक: गणेशा | प्रसिद्ध:
पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे.. शेजावरी स्वप्नकळ्यांचा मूक शृंगार आहे कुंकवाचा चंद्रमा त्यालाही डाग आहे... नजरेत भावनांचा भरला बाजार आहे.. आरसा मनाचा त्यालाही भेग आहे.. अंतरात श्वासांचा खोल वार आहे.. सावल्यांच्या मिठीत माझा संसार आहे... पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे.. -शब्दमेघ..एक मुक्त स्वैर स्वच्छंदी जीवन (१९ ऑगस्ट २०२५) (चार वर्षांनंतर पहिल्यांदा)