मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेखन करा

सरपंच · · Basic page

तुमच्या लिखाणासाठी योग्य विभाग निवडा. खालील सहा प्रकारांपैकी हवा तो प्रकार निवडून पुढे जा.

पाककृती

सर्व खवय्यांचे आणि बल्लवाचार्यांचे आणि अन्नपूर्णा गृहिणींचे हे मंदिर आहे. आपल्याला माहिती असलेल्या निरनिराळ्या प्रांतातल्या, निरनिराळ्या पद्धतीच्या पाककृती या सदराद्वारा इतरांनाही माहीत करून द्या आणि खाण्याचा आनंद शतगुणित करा! अहो शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासांकरताच तर आहेत! मग ते दोन घास खमंग आणि चवदारच असले पाहिजेत! :)

काथ्याकूट

चर्चा हा प्रकार समाजातील चालु घडामोडी आणि अन्य विषयांवर चर्चा करण्याकरीता आहे. येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे.

मिपा कलादालन

हा विभाग वेगवेगळ्या कलाप्रकारासाठी आहे. येथे तुमची रेखाटने, चित्रे, फोटो आणि इतर कलेचा नमुना देता येईल. फक्त कलाकृती देण्यासाठी या विभागाचा वापर करावा.

जे न देखे रवी...

कवी, गझलकार, विडंबनकार, चारोळ्याकार, मुक्तककार इत्यादी मंडळींचे हे सन्माननीय स्थान आहे. साक्षात भास्कर महाराज जे पाहू शकत नाहीत ते पाहाण्याची नजर असलेल्या सर्व मंडळींचे येथे मनापासून स्वागत आहे!

जनातलं, मनातलं

ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती!

भटकंती

येथे पर्यटन विषयक लेखन प्रकाशित करावे. या प्रकारात प्रवास वर्णन तर अपेक्षीत आहेच सोबतच जावं कसं? रहावं कुठे ? खावं काय? आणि काय आवर्जून बघावं हे सुध्दा यावं म्हणजे अन्य सदस्यांना सोईचं होईल.


वाचन 18 वाचनखूण प्रतिक्रिया 0