चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
💬 प्रतिसाद
(228)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/16/2025 - 10:04
नवीन
सहमत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sat, 10/18/2025 - 12:12
नवीन
तोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. सर्वात स्वतंत्र विचारांची मुख्यमंत्र्याची पत्नी महाराष्ट्राच्या मामी आहे. केरळमध्ये अनेक भागात मुलींना शाळेत पडद्याच्या मागे बसावे लागते. मुस्लिम स्त्रियांवर अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या कायद्याला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी समर्थन दिले होते हा इतिहास आहे. बाकी भाजप गेल्यावर अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात शरिया कायदा निश्चित लागू होणार.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 10/16/2025 - 08:50
नवीन
पत्रकारपरिषदेनंतर भांडूपचा भोंगा बंद पडला असे काल ऐकण्यात आले.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 10/16/2025 - 15:43
नवीन
कच्छ रणोत्सव ( नोव्हेंबर ते फेब्रुवारी ) भूज येथे सर्व पाट्या इंग्रजीतच असतात. गुजराथीत नाहीत.
याचे कारण काय असेल?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/16/2025 - 16:17
नवीन
गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात सर्व पत्ता गुजराती नी इंग्रजीतच आहेत, हिंदीला त्यांनी लाथाडले आहे. काय कारण असेल?
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
गुरुवार, 10/16/2025 - 18:38
नवीन
तिथे महाराष्ट्रातल्यासारखे कोणी हिंदी (राष्ट्रभाषा!) समर्थक दिसत नाहीत, फडणवीसांसारखे? खरं तर या बाबतीत देशभर एकच धोरण हवं.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/17/2025 - 05:57
नवीन
+१
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/17/2025 - 09:53
नवीन
अफगाणीस्तानकडची अण्वस्त्रे पाहून पाक सैन्य घाबरले असावे आणि त्यानी प्यान्टी सोडून पळ काढला असावा अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/17/2025 - 10:15
नवीन
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 10/17/2025 - 10:35
नवीन
जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता एकत्र येऊन काहीही करत असेल तर त्यावर बंदी घाणे चुकीचे वाटले.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/19/2025 - 07:02
नवीन
शांतते पत्रयात्रा, संचलन, सकाळच्या वेळी मोकळ्या मैदानात व्यायामाचे धडे असे असेल तर बंदी कोणी घालणार नाही, असे वाटते. संघ दक्ष-आरम, वाले इतके सरळ असतील आणि आहेत असे वाटते का ? तसे ते नाहीत. संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते पूर्वी घरोघरी जाऊन तरुणांना भेटून सकाळी मैदानावर व्यायामासाठी एकत्र करायचे, मग बौद्धिकं वगैरेचं हळुहळु निमंत्रण द्यायचे. संघटन आणि धर्माभिमान उभा करता करता कट्टरवादी विचारांच्या गोळ्या देऊन त्याची बुद्धी भ्रष्ट करुन आपल्या गोटात कायम राहील इतकी ती तजवीज असायची.
आता माध्यमांमु़ळे लोक घरीच व्यायाम करतात. मैदानावरही आपलं स्वतंत्र फिरणे आणि व्यायाम करतांना अनेक तरुण दिसतात. आता तरूणांना गोळा करुन सकाळी मैदानावर आनण्याचा स्कोप दिसेना, तेव्हा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाबाहेर यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. 'ज्वॉइन अस' च्या पाट्या घेऊन हे शाळा-महाविद्यालयाच्या बाहेर हे 'दक्ष' दिसू लागले आहेत. तरुणांना गळाला लावायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज हे येतील उद्या आणखी कोणीतरी येतील. संघटन करण्याच्या नावाखाली ही द्वेषाची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न आहे, म्हणून अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 10/19/2025 - 07:32
नवीन
तो आळा कसा घालणार हा प्रश्न आहे. त्यासाठी काय करणार? मिपावर सातत्याने याबाबत लिहील्याने संघ कमी होताना दिसत नाहीये. नवीन काही उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेले कार्यकर्ते तयार करायला पाहिजेत. तसं काहीच होताना दिसत नाहीये.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sun, 10/19/2025 - 08:42
नवीन
ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि राजकीय हितसंबंधांवर उभा आहे, तिला शतकभरानंतरही गांधीच्या विचारांचा नाश करणे शक्य झालेले नाही — हे त्यांचे सर्वात मोठे अपयशच आहे. इतिहासाने दाखवले की हिंसा तात्पुरती यशस्वी वाटू शकते, परंतु अहिंसेच्या नैतिकतेसमोर तिचा पराभव होतो. धर्माच्या नावाखाली केलेले राजकारण लोकांमध्ये तणाव निर्माण करू शकते, समाजकारणाचे खरे काम, समतेवर आणि न्यायावर आधारित असते, हे संघाच्या धोरणांत सापडत नाही. त्यामुळे जातीय विभाजनच संघाला आतून संपवेल.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 10/19/2025 - 09:26
नवीन
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे.
हा विचार तरी पूर्णत्वास जाताना दिसतोय बॉ. ;)
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sun, 10/19/2025 - 09:54
नवीन
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे.
तेच तर म्हणतोय मी. गांधीजींचे विचार नष्ट करत नाहीत, उलट त्याचे पालनच करत आहेत. गांधीजींना मारले नसते तर गांधीजींनीच काँग्रेस विसर्जित केली असती. एकतर हत्येचे पातक माथी घेतले , आणि काँग्रेस संपवण्याचे उद्दिष्ट साधण्यात ऊर्जा घालवत बसले. गांधीजींचे विचार कसे नष्ट होणार ह्याचीच आयुष्यभर चिंता.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 10/19/2025 - 10:37
नवीन
हे तुमचे विचार घट्ट धरून ठेवा. मीझी मनापासून हीच इच्छा आहे.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sun, 10/19/2025 - 11:46
नवीन
एखाद्याला नष्ट करून त्याच्याच विचारांचे पालन करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी. संघाच्या विचारांनी काहीही नवनिर्मिती केली नाही हा इतिहास आहे. संघ स्थापनेचा उद्देश हा राजकीय नव्हता तर कशाला एखाद्या राजकीय पक्षाचे निर्मूलन करण्याचा उद्योग करायचा? विचारात काही सुस्पष्टता?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 10/19/2025 - 11:51
नवीन
तुमचे विचार मांडत रहा. त्याने संघ नामशेष होईल यावर श्रध्दा ठेवा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 10/19/2025 - 14:19
नवीन
छान विचार,
आपणही १० टक्के कमी तेलाच्या वापरासह स्वदेशी आणि योगसाधनेचा अंगिकार करत रहा.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 10/19/2025 - 14:38
नवीन
हे काही कळलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 10/19/2025 - 15:49
नवीन
अरे,
तुम्हाला वेगळे मेल येते की काय?
आम्हाला आले मेल एका मोठ्ठ्या दिव्याच्या फोटो बरोबर.
त्यात हा निरोप आलाय वरून.
.
तुम्हाला काय आला मेल?
घरातील मुला नातवंडांना , लहानांना आवर्जून संघ शाखांत पाठवा. संघाला गरज आहे.....
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/19/2025 - 16:06
नवीन
दीपावलीच्या शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
( संघ दक्ष मित्र मंडळ )
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 10/19/2025 - 17:05
नवीन
:)
संघाला आमची गरज आहे? काहीही.
आम्हाला संघाची गरज आहे.
२०१४ पासून छान चाललंय. यश मिळत राहिले आहे त्यामुळे निवडलेला रस्ता बरोबर आहे याची खात्री पटलीय. २०२४ ला थोडे अपयश आले. त्याबरोबर कोणावर दोषारोप न करता चुका सुधारल्या. परत यश मिळायला लागलंय. तुम्हीपण तुमची लढायची पध्दत बदललेली नसल्याने बिहार निवडणूकांत यश मिळणार हे नक्की आहे.
तुमची विचार करण्याची व संघाला विरोध करण्याची पध्दत न बदलल्याबद्दल धन्यवाद. असंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधे लढा. म्हणजे तिथेही भाजपाचा विजय नक्की.
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Sat, 10/25/2025 - 18:06
नवीन
या वस्तुस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विरोधकांचेच नुकसान होत आहे. याउलट संघपरिवारातील विविध पातळ्यांवरील घटक बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत सतत जागरूक आणि कार्यरत आहेत.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 10/25/2025 - 20:33
नवीन
वस्तुस्थितीचे सध्या सोडा वस्तूंवर पण एक सांगा प्लिज.
काही जन्मापूर्वी तुम्ही संजय हस्तिनापूरकर होतात का हो?
.
नाही, म्हणजे दोन्ही साइड चे सर्व दृश्य अगदी रणनीती, खलबते सर्व काही स्पष्ट दिसते, कळते..
सलाम तुमच्या दूरदृष्टीला. तुमच्या हस्तिनापूर नरेसाना पण नमस्ते केलाय म्हणून सांगा.
- Log in or register to post comments
ट
टीपीके
Fri, 10/17/2025 - 11:23
नवीन
चला या गोबर युगात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे, या साठी कर्नाटक सरकार चे अभिनंदनच केले पाहिजे. फक्त काँग्रेसच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करू शकते, १९५१, १९७५, असे अनेक दाखले आहेत त्या साठी. चला आपण त्यांचे हात अधिक बळकट करूया.
- Log in or register to post comments
N
NiluMP
Fri, 10/17/2025 - 17:10
नवीन
स्वतःचे सैन्य, संविधान असताना ही काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून का पाळावे लागले. खड्यात घाला अशी वोटेबँक लोकशाही जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर तेव्हा आणि आताही अशी हिम्मत कोणी करू शकेल का ?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 10/17/2025 - 18:59
नवीन
मग काय करावे म्हणता? महाराजांना बोलावतांय परत?
व्होटबँक खड्ड्यात घालायची म्हणजे काय करायचे?
आणि घातलीच तर त्यानंतर काय करायचे?
- Log in or register to post comments
N
NiluMP
Tue, 10/21/2025 - 09:45
नवीन
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे तोपर्यंत झोपडपट्या, घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार, धार्मिक, जातीनिहाय आरक्षण, अनुदान यातून आपली सुटका नाही आणि लोकशाही हे जिहादी मानसिकता वाल्यांसाठी नवीन शस्त्र झाले आहे (उदा. लंडन) आपल्या देशात प्रयोग सुरु झाले आहेत पण हिंदू व नेते जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यन्त झोपलेला (एक्स-मुस्लिम त्यांना जागे करण्याचा थोडा प्रयन्त करत आहे ) आहे म्हणून मलातरी RSS आवडते.
अब्रामाहिक धर्मवाल्याचं लक्ष एकच आहे संपूर्ण धरती त्याची व्हावी (चीन आणि नॉर्थ कोरिया त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. :-) दोन्ही देशांत लोकशाही नाही.)
मी माझा वार्डातल्या वार्ड आणि पोलीस ऑफिसरला निवडून देत नाही मग नेत्यांना का निवडून द्यावे. निवडणूक सोडून इतर पद्धत शोधून काढावी आणि देश एकाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे चालवावा परफॉर्म वर पेरिश. आम्ही पाच वर्ष काहीही करू शकत नाही. ज्या नेत्यांना कोणत्या वार्डात, सोसाटीत आपले मतदार आहेत याची माहिती असते त्यांना तेथे कोणते काळे धंदे चालतात याची माहित नसते असं मलातरी वाटत नाही. ज्या वार्डात नवीन झोपडट्टी बनेल तर त्या वार्डातील नगरसेवक, वार्ड, पोलीस ऑफिसर बरखास्त करावे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 10/18/2025 - 04:51
नवीन
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासून मुस्लीम व्होट बँकेची ऐशी की तैशी व्हायला सुरवात झालीच आहे हो.
२०२४ ला या व्होट बँकेने पूर्ण ताकदीने उसळी मारली होती. भाजपा गाफिल व संघ उदासीन राहूनही मोदींना काही हटवता आले नव्हते. भाजपाला हरविण्याचा एक मार्ग सापडल्याच्या आनंदात सर्व भाजप विरोधक होते. पण बांगला देशातील सत्तांतर व तेथे हिंदूवर झालेले अत्याचार यामुळे विरोधकांना सापडलेला मार्ग पूर्णपणे खिळखिळा झालाय.
आता मुस्लीम व्होट बँकेत मुस्लिमांच्या सहाय्यानेच खिंडार पडायला सुरवात झाली आहे. सोबतीला समान नागरी कायदा व एनआरसी आहेच.
मुख्य म्हणजे भारतीय मुस्लिमांत ७५ टक्के मुस्लिमांना या ना त्याकारणाने पाकिस्तानचे प्रेम असते. पण पाकिस्तानचे जसे तुकडे पडायला लागतील तसतसं हे प्रेम ओसरत जाईल.
तेंव्हां २०२९ पर्यंत मोदी व संघ विरोधक गाफील असलेले बरे. संघ बदलला नसल्याचे त्यांना वाटत राहाणे हेच फायद्याचे आहे. म्हणजे ते द्वेषमूलक टिका करण्यातच धन्यता मानत राहून संघविरोधात प्रत्यक्ष कार्य करायचे विसरून जातील.:)
सध्यातरी मोदींना पर्याय म्हणून राहूल, ममता, अखिलेष, शरद पवार वगैरेंना जनता निवडेल असं वाटत नाहीये.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 10/18/2025 - 10:28
नवीन
नक्कीच.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sat, 10/18/2025 - 12:18
नवीन
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत नियम न्यायालयात टिकणार नाही. सार्वजनिक जागेत बिना ध्वज लावता शाखा लागेल. फुटबॉल खेळायला बंदी लागू होत नाही. 1975 च्या इमर्जन्सी मध्येही शाखा अशाच लागत होत्या.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 10/18/2025 - 10:30
नवीन
.... चला या गोबर युगात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे, .....
नक्कीच.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Sat, 10/18/2025 - 12:28
नवीन
फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारताने बऱ्याच देशांबरोबरचे संबंध तोडायला पाहिजे.
अमेरिका : इराक, सिरिया इत्यादी देश उध्वस्थ केले. हिशोबच केला तर कमीत कमी लाखो जीव तरी घेतले असतील ह्या देशाने. अफगाणिस्तान सोडता सोडता केवळ संशयामुळे एका कुटुंबावर बॉम्ब फेक केली होती.
इंग्लंड : अमेरिकेच्या प्रत्येक पापात सहभागी असणारा देश.
रशीया : भारताला मदत केली म्हणून कांय झालं. ना लोकशाही ना इतर देशांच्या सिमेचा सन्मान.
सौदी : ह्या देशात महिलांचा सन्मान कमी होतो.
चीन : जागतिक कायदे हा देश मनात नाही. वरून गलवान वगैरे भागात खोड्या आतातच.
अशी बरीच यादी करता येईल. भारताने geopolitics का कांय त्या भानगडीत न पडता एकेका देशानंबरोबकरचे संबंध तोडायला पाहिजे. इस्राएल ने आपल्याला बऱ्याच कठीण प्रसंगात मदत जरी केली असली तरी त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. जवळ जवळ पासष्ट हजार लोकांची कत्तल केली.
सर्व गुण संपन्न देश शोधायला पाहिजे आणि मगच वकिलात इत्यादी गोष्टी केल्या पाहिजे. पृथ्वी वर असा कोणता देश मिळाला तर ठीक नाही तर पर ग्राहवार शोध घेतला पाहिजे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 10/21/2025 - 11:16
नवीन
आलू से सोना बनाने की मशीन - राहुल गांधी.
ही काय भानगड आहे?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/21/2025 - 13:31
नवीन
कंजूस काका, भाजपच्या आयटी सेलने सात वर्षापूर्वी राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे जे काही असत्याचे प्रयोग केले त्यातलाच तो एक भाग होता.
बघा हा व्हीडीयो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/21/2025 - 13:45
नवीन
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा परत नीट ऐकून घ्या!
जे बिल रा गा मोदींना चिकटवणार होता ते त्यालाच चिकटलं!
हा माणूस बेताल बडबड करत असल्यामुळे लोकांना हे तो बोलू शकतो हे सहज पटलं सुद्धा!
शेवटी पप्पू तो पप्पू च राहणार!
त्याच्यात काही लोकांना देशाचं भविष्य दिसतं त्यांच्या अकलेची कीव करावी का त्यांच्या मूर्खपणा ला हसावं हे कळत नाही!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/21/2025 - 14:34
नवीन
वाढदिवसाच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 10/21/2025 - 15:04
नवीन
पाहिला विडिओ.
राहुलला असं म्हणायचं असेल की आलू की फसल लेने वाले किसान सोना कमा सकते हैंl
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Tue, 10/21/2025 - 23:29
नवीन
नाशिकच्या आयटीआय मध्ये पौरोहित्याचा कोर्स सुरू होत आहे. कुंभमेळा येऊ घातलाय तेंव्हा पुरोहितांची कमतरता भासणार म्हणून शासनाने आधीच तयारी सुरू केली आहे असे भाजपाचे प्रवक्ते म्हणत आहेत. पण तिथले महंत मात्र या गोष्टीला विरोध करत आहेत. त्यांनी दोन रोचक मते मांडली आहेतः
१. त्यांना व सध्याची पुरोहित संघटना, धर्मातील ज्ञानी लोक वगैरे आहेत त्यांना न विचारता हे केले जात आहे.
२. सर्व समाजातील लोक फक्त ब्राम्हणाला सहज दक्षिणा देतात. इतर समाजाचा पुरोहित असेल तर त्याला यात अडचण येईल.
आता शासन कसा मार्ग काढेल ते पहायला लागेल.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Tue, 10/21/2025 - 23:34
नवीन
आयटीआयमध्ये धर्मशास्त्रांचे धडे, पुरोहितांना का वावडे?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 10/24/2025 - 05:48
नवीन
याबाबत अतृप्त आत्मा नावाचे मिपाकर काय म्हणतात हे विचारले पाहिजे.
आमच्याकडे प्रामाणिकपणाची वानवा आहे. शिवाय कुणाला, कोणत्या संस्थेला मुख्य म्हणायचं. शिवाजी महाराजांनाही राज्याभिषेकांत अनंत अडचणी आल्या. ज्ञानेश्वर आणि बंधुंनाही त्रास झाला. सारस्वत ब्राह्मणांनीही चिडून शेवटी आपले पुरोहित तयार केले. पंचांगांत ही वाद झाला आणि आहेच. राष्ट्रीय पंचांग थोपलेच. ज्याचा काहीही उपयोग नाही.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/24/2025 - 05:30
नवीन
कर्नाटकमधील विधानसभा २०२३च्या निवडणुकीदरम्यान अळंद या मतदारसंघात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न झाला होता आणि यशस्वीरित्या हटविलेल्या प्रत्येक मतासाठी ८० रुपये दिले जात होते, असे कथित मतचोरीप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 10/25/2025 - 15:44
नवीन
भारतीय उद्योगपती आणि एचसीएल चे संस्थापक शिव नाडर यांच्या पत्नी किरण नाडर (ज्या किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट च्या संस्थापक आणि चित्र संग्राहक आहेत) यांनी भारतीय वंशाचे (अमिरातीचे नागरिक) प्रसिध्द चित्रकार मकबूल फिदा हुसेन ह्यांचे 'ग्रामयात्रा' नामक अनटायटल्ड चित्र (चित्रसमूह) तब्बल ११८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
हा लिलाव मार्च महिन्यातच ख्रिस्टीज न्यूयॉर्क ने केलेला होता पण खरेदीदार म्हणून नाडर ह्यांचे नाव आता प्रसिध्द झाले आहे. त्यांचे एक म्युझियम दोहा, कतार येथेही सुरु होणार आहे.
भारतीय वंशाच्या चित्रकारांना त्यांच्या चित्रासाठी मिळालेली ही आत्तापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/26/2025 - 05:15
नवीन
आपण गोबरयुगात अनेक धक्कादायक गोष्टी ऐकत असतो आता त्याचं नवलही वाटत नाही. एखादा देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर, काय करायला पाहिजे तर, त्याचं साधं उत्तर असतं की, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, आणि रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, भ्रष्टाचार कमी करणे आणि देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देणे वगैरे. आपल्याकडे आपल्या देशाच्या सरकारचे धोरण पाहिले की, आता लाज वाटायला लागते. तरुणांना आपण कुठे घेऊन जात आहोत.
बिहारच्या निवडणूकीत आपले लाडके पंतप्रधान म्हणाले ' इंटरनेट डेटा सस्ता कर दिया जिस वजह बिहार के नौजवान रील बना कर कमाई कर रहा है'' रील्समुळे रोजगार मिळतो अशी येडपट कल्पना कोणाला सुचू शकते. युवकांनी शिक्षण घेतले पाहिजे, आपल्या शिक्षणाला अनुरुप असा रोजगार मिळाला पाहिजे. पण, पंतप्रधान म्हणतात, एक चहाच्या कपाच्या किमतीत एक जीबी डेटा मिळतो, आणि त्यावर रील्स बनवतो. कमाई करतो. रील्स आणि इन्ष्टाग्राम हे रोजगाराचे साधन असू शकते ? म्हणजे युवकांनी शिक्षण घेऊन, वडे तळणे, रील्स करणे, हा शिक्षणाचा हेतू असू शकतो ?.
आपणास अजून एक माहिती असेल की, डिजीटल इंडियाच्या जाहिरातीसाठी सरकारने ''रील्सची स्पर्धा'' आयोजित केली होती. आणि सरकार त्यास वेगवेगळी बक्षीसं देणार होती. अर्थात, वाढत्या मोबाईल व्यसनाने युवापिढी बरबाद होत चालली आहे, अशा वेळी गोबरयुगात अशा मूर्खपणाच्या गोष्टी येतच राहतील.
१. रील्सचं सविस्तर वृत्तांकन २. रील्सस्पर्धा (डीजीटल इंडिया )
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Sun, 10/26/2025 - 12:41
नवीन
सर, आपण सध्याच्या नेतृत्वाबाबत व्हीजन नसलेलं नेतृत्व असे म्हटले आहे पण त्यांचा व्हिजन अगदी स्पष्ट दिसतो:
- संपूर्ण सुशिक्षित मध्यमवर्गीयांची विचार करण्याची शक्ती संपुष्टात आणून त्यांच्या धर्मश्रध्देचा वापर करून आपले शोषण करणार्यांप्रतीच पूर्ण भक्तीभाव निर्माण करणे.
- सर्व लोकांची प्रश्न विचारण्याची क्षमता संपवणे.
- अशा प्रकारे निरूपद्रवीकरण झालेल्या जनतेस किरकोळ रोख पैसे व रेशन देऊन देशाची बहुमूल्य साधनसंपत्ती काही विशिष्ट लोकांकडे जमा करणे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/27/2025 - 09:55
नवीन
नव्या व्हीजनशी सहमती आहेच.
बाकी ते, एल आय सी ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला. संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या धोरणांनुसार आणि पुरेशा विचारमंथनानंतरच ही गुंतवणूक करण्यात आली.
कृपया कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. =))
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 10/27/2025 - 11:27
नवीन
अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे आपल्याला मान्य आहे तर... हे ही नसे थोडके 😀
आता एक(च) प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरीत राहिलाय त्याचेही उत्तर आपल्याकडून मिळाले तर माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक झाले असे मी समजेन...
एल.आय.सी. ने स्वतंत्रपणे घेतलेल्या ह्या निर्णयाचा तिच्या (ULIP पॉलिसीज मध्ये) गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसी धारकांच्या गुंतवणूकीवर सकारात्मक परिणाम झाला की नकारात्मक परिणाम झाला?
म्हणजे त्यांनी निवडलेल्या फंडांच्या NAV (Net Asset Value) मध्ये वृद्धी झाली की घट झाली?
जर वृद्धी झाली असेल तर हा निर्णय योग्य होता आणि जर घट झाली असेल तर हा निर्णय चुकीचा होता असे मानण्यास आपलीही काही हरकत नसावी अशी भाबडी अपेक्षा आहे 😀
काय आहे की माझ्या (मंद)बुद्धीच्या आकलना पलीकडचे हे विषय असल्याने बुद्धिमंतांकडूनच अशा गहन प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा बाळगावी लागते! वो कहते हैं ना..."नाईलाज को क्या इलाज?" 😂
(चोख) उत्तराच्या प्रतीक्षेत असलेला
टर्मीनेटर
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/27/2025 - 11:59
नवीन
आपल्या आकलनावर मला शंका घ्यायची नाही. पॉलिसीधारकांचा फायदा झाला किंवा झाला नाही हा प्रश्न नाही. सध्या जी राळ उडालेली ती अशी आहे की,
अमेरिकी सरकारी संस्थांकडून लाचखोरी आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गेल्या वर्षी अदानी उद्योग समूहाला अनेक प्रमुख अमेरिकी आणि युरोपीय बँका कर्ज देण्यास उत्सुक नव्हत्या. या परिस्थितीत या समूहामध्ये केंद्र सरकारच्या पुढाकाराने आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) निधी गुंतवणुकीच्या माध्यमातून वळवण्यात आला, असे वृत्त 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने प्रसिद्ध केले.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), तसेच निती आयोगाने याविषयी एलआयसीला गुंतवणुकीचा आग्रही सल्ला दिला, असेही या वृत्तात नमूद केले होत. अदानीच्या कर्जफेडीसाठी ही गुंतवणूक करायला लावली, असा मुख्य आरोप आहे.
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट )
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 11/07/2025 - 03:14
नवीन
इतिहासही हेच सांगतो.
हिंदुस्थानला मुसलमान करण्याचे व्हिजन ठेवून आलेले नेतृत्व होते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »