Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुरीच्या दाण्यांची कचोरी

B
Bhakti
Sun, 10/26/2025 - 09:09
"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते. ती चहा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत उत्तम लागते. दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे.एक तोडी केली तेव्हा आज कचोरी केली.पुढच्या तोडीला आमटी करणार आहे. १ २ आवश्यक साहित्य (भरणासाठी): तुरीचे हिरवे दाणे (सोललेले): १ वाटी +१/२ वाटी मटार ओले खोबर्‍याचे तुकडे: १ वाटी (बारीक कुट) हिरव्या मिरच्या,आलं: २-३ (बारीक चिरलेल्या) धनेपूड-३ टीस्पून जिरे+बडीशेप पूड : १ टीस्पून हळद: १/२ टीस्पून लाल तिखट: १ टीस्पून (चवीनुसार) मीठ: चवीनुसार कोथिंबीर+कसूरी मेथी : ३ टीस्पून (बारीक चिरलेली) तेल: १ टेबलस्पून (भरण परतण्यासाठी) आवश्यक साहित्य मैदा: २ वाट्या तूप किंवा तेल: ४ टेबलस्पून (मळण्यासाठी) मीठ: १ चिमूट गरम पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी) कृती- : तुरीचे दाणे +मटार दाणे स्वच्छ धुवून घ्या.कुकरमध्ये २ शिट्टींत वाफवून घ्या.वाफवून झाल्यावर मिक्सरमधून मध्यम आकारासाठी फिरवून घ्यायचे. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घालून परतवा. नंतर कुटलेले खोबर्‍याचे तुकडे, धने पावडर, हळद, लाल तिखट ,जिरे+बडीशेप पूड आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतवा. उकडलेले तुरीचे दाणे+मटार दाणे घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवावे, जेणेकरून दाणे मऊ होतात पण फुटत नाहीत. शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. हे सारण तयार आहे. पारीचे कणीक : एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घालून चांगले मळा. हळूहळू गरम पाणी घालत मऊ आणि लवचिक डोघ तयार करा (खस्ता डोघासाठी तूप चांगले मिसळा). डोघाला १० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा. कचोरी भरून आकार द्या: डोघाची लहान-लहान गोळ्या करा . प्रत्येक गोळी चपट्या करून भरणाचा थोडा भाग भरून बंद करा. हाताने हलकेच चपटे करा किंवा लाटा जेणेकरून भरण बाहेर येऊ नये. मध्यभागी थोडे जाड ठेवा. ३ या कचोऱ्यांना वरतून तेल लावून #airfryer मध्ये १८०°वर १० मिनिटे ठेवा.नंतर उलटून परत १८०°वर ५ मिनिटे ठेवा. किंवा तळा: कचोर्‍या मंद आचेवर सोनेरी व्हायपर्यंत तळा. ४ ही कचोरी चटणीसोबत (लिंबू-मिरची चटणी किंवा कोथिंबीर चटणी) सर्व्ह करा. ती २-३ दिवस टिकते, म्हणून स्टोअर करून ठेवता येते. पौष्टिकता: तुरीचे दाणे प्रोटीन आणि फायबरने युक्त असल्याने ही कचोरी आरोग्यदायी आहे.

प्रतिक्रिया द्या
3141 वाचन

💬 प्रतिसाद (15)
क
कंजूस Mon, 10/27/2025 - 02:03 नवीन
एक फोटो झाडाचाही हवा. >> दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे>> वा. कचोरी झकास लागणारच. दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 10/27/2025 - 03:01 नवीन
याची चव शेगाव कचोरीच्या जवळ जाणारी असेल असे वाटते.....पाककृती आवडली...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/27/2025 - 04:56 नवीन
तुरी-कचोरी आवडली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 10/27/2025 - 08:16 नवीन
भारीच 👍 "ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे." सुरुवातीला हे वाचल्यावर मलापण ही शेगाव कचोरीची रेसिपी असावी असेच वाटले होते... वर श्वेता२४ ह्यांनी चवीबद्दल जे म्हंटले आहे तीच शंका माझीही आहे, चव सेम असते की काही फरक आहे?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 10/27/2025 - 08:39 नवीन
Dough या शब्दातील "gh" च्या सायलेंटत्वाला नाकारून बनविलेला "डोघ" हा नवशब्द रोचक वाटला
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 10/27/2025 - 08:54 नवीन
डोघ...इति कृ.बु.भाऊंचा शब्द आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
B
Bhakti Mon, 10/27/2025 - 08:53 नवीन
सर्वांना धन्यवाद! चव शेगावच्या कचोऱ्यांसारखी नाही वाटली. पण असाच पदार्थ गोल गोल तुरीच्या दाण्यांची+मटार दाण्यांची गुजरातमध्ये लिलवानी कचोरी म्हणून प्रसिद्ध आहे.ही माहिती मला दुसऱ्या ग्रुप वरून समजली.लिलवाचा अर्थ म्हणजे बहुतेक तूर असावा. बाकी मी फक्त तूरीच्या दाण्यांचीच कचोरी करणार होते.पण म्हटलं चव फसली तर... म्हणून मटार दाणे पण वापरायचं ठरवलं.पण अशी कचोरी अलरेडी इन्व्हेंट झाली आहे हे पाहून कमालच वाटली.मी योगायोगांवर खुप विश्वास ठेवते.काय भारी योगायोग जुळून आला,गंमतच वाटली :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 10/28/2025 - 07:28 नवीन
गुजराती लिली एटले हिरवी. डुंगळी =कांदा लिली डुंगळी =पातीचा कांदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
क
कर्नलतपस्वी Mon, 10/27/2025 - 09:35 नवीन
तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या दाण्याने भरल्या, खुणावू लागल्या, जीभ ही चटोरी, लपलप करी केली मी कचोरी कुरकुरीत..... मस्त रेसीपी. उकडलेल्या तुरीच्या शेंगा भारी लागतात.
  • Log in or register to post comments
य
यश राज Mon, 10/27/2025 - 10:01 नवीन
भारी दिसतेय कचोरी, लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 10/29/2025 - 14:20 नवीन
छान!!!! आमटी केली कि नाही अजुन?
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 01/01/2026 - 16:30 नवीन
तुरीची आमटी केली बरं का.. https://www.misalpav.com/node/53399
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
स
संजय पाटिल Fri, 01/02/2026 - 10:39 नवीन
तिकडे वाचून थांकू म्हणायला इकडे आलो तवर इकडे आधीच टाकलेला निरोप मिळाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
म
मारवा Wed, 10/29/2025 - 21:27 नवीन
तुमच्या बऱ्या अर्ध्याची मज्जा आहे. एकूण प्रकरण चविष्ट दिसतंय. तुरीची तिखट आमटी फक्त माहिती होती. तुरीकचोरी नवी माहिती झाली.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर गुरुवार, 10/30/2025 - 10:18 नवीन
पाककृती आवडली .
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा