गांधी जी
💬 प्रतिसाद
(70)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 07:53
नवीन
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही.
ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही?
- सर्किट
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 10/02/2007 - 08:12
नवीन
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला.
असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी"
विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही.
-----------------------------------------------------------
सबको सन्मती दे भगवान!
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 10/02/2007 - 17:43
नवीन
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही.
अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्या आपल्यास वाटणार्या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही...
"दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते.
अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 21:25
नवीन
विकासराव,
आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.)
गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर !
- सर्किट
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/03/2007 - 05:52
नवीन
मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्या आपल्यास वाटणार्या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही...
पुर्णपणे सहमत.
"Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते.
चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल.
(सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).
सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं.
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 10/02/2007 - 08:31
नवीन
शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? -
उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू.
( उतलेली शिळी कढी आवडणारा)
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 08:35
नवीन
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या.
असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो.
- सर्किट
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/03/2007 - 05:40
नवीन
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो.
गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो.
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 10/02/2007 - 13:19
नवीन
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :)
गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते!
बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 19:58
नवीन
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.
हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते:
By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own.
- सर्किट
- Log in or register to post comments
प
प्राजु
Tue, 10/02/2007 - 15:28
नवीन
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो.
हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला...
नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते.
हे माझे स्वतःचे मत आहे....
- प्राजु.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 10/02/2007 - 20:04
नवीन
प्राजुशी सहमत आहे...
तात्या.
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 21:34
नवीन
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते.
- सर्किट
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/03/2007 - 06:22
नवीन
नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते.
हे माझे स्वतःचे मत आहे....
ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली.
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
क
कोलबेर
Wed, 10/03/2007 - 06:46
नवीन
प्रतिसाद आवडला.. +१
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 10/03/2007 - 06:52
नवीन
सुंदर.
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 07:06
नवीन
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली.
वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय???
प्रतिसाद आवडला!
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 07:39
नवीन
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो.
जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो.
गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून.
- (वैचारिक) सर्किट
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 10/03/2007 - 07:44
नवीन
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 08:06
नवीन
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात.
नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ?
- सर्किट
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 10/03/2007 - 12:39
नवीन
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली.
याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...
- Log in or register to post comments
ल
लबाड बोका
Tue, 10/02/2007 - 15:37
नवीन
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही.
सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)
- Log in or register to post comments
त
तो
Wed, 10/03/2007 - 09:52
नवीन
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का?
काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)
- Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 20:05
नवीन
गांधी,
ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही.
ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 10/02/2007 - 20:38
नवीन
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!).
त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.)
http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg
- Log in or register to post comments
आ
आग्या वेताळ
Tue, 10/02/2007 - 21:12
नवीन
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं..
आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे?
तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं.
बोला महात्मा गांधी की जय
नाद करायचा न्हाई
---------------
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे.
-मिसळपाव पंचायत
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 10/02/2007 - 21:31
नवीन
आग्या वेताळ राव,
आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं..
अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...
- Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/02/2007 - 21:54
नवीन
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन.
तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे.
तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला.
तुमचे देखील स्वागत आहे.
..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा.
असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 02:45
नवीन
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ?
गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ?
ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ?
सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ?
असे सगळे छान लिहा.
- (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Wed, 10/03/2007 - 04:24
नवीन
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे.
-मिसळपाव पंचायत
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/03/2007 - 04:40
नवीन
शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते !
अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 07:42
नवीन
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा.
- सर्किट
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 10/03/2007 - 07:46
नवीन
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 10/03/2007 - 21:16
नवीन
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो.
वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो??
तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं!
'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही??
'+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!!
माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!!
असो..
तात्या.
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 08:38
नवीन
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे.
- (खजील) सर्किट
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/03/2007 - 15:23
नवीन
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे.
हेच म्हणतो !
(खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 13:39
नवीन
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी.
*प्रतिसाद पुन्हा लिहला आहे *
राजे
(*हेच राज जैन आहेत)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 10/03/2007 - 21:26
नवीन
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.
प्रमोदकाका,
मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना??
असो..
(पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/03/2007 - 05:34
नवीन
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे.
-मिसळपाव पंचायत
कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते.
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 07:08
नवीन
गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/03/2007 - 07:15
नवीन
गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं?
हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही.
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 23:31
नवीन
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल
"ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा"
बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे .
[ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}]
राजे
(*हेच राज जैन आहेत)
- Log in or register to post comments
च
चित्रा
Tue, 10/02/2007 - 21:54
नवीन
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते.
पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?).
ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 10/02/2007 - 23:59
नवीन
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 02:41
नवीन
स्वतःला न पटणार्या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते.
गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती.
माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे.
अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का?
- सर्किट
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 10/03/2007 - 03:25
नवीन
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती.
माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे.
मला देखील तेच वाटते.
कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 05:53
नवीन
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.
मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच!
शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात.
त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!
- Log in or register to post comments
क
कोलबेर
Wed, 10/03/2007 - 06:05
नवीन
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे.
- (लगे रहो फ्यान) कोलबेर
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/03/2007 - 07:46
नवीन
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!!
- सर्किट
- Log in or register to post comments
त
तो
Wed, 10/03/2007 - 10:16
नवीन
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे.
अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »