Skip to main content

कश्मिरि चिकन करी......

लेखक पियुशा यांनी बुधवार, 09/03/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
कश्मीरी चिकन करी.... साहित्य ;- चिकन १ कि., २ टी स्पून बदाम काप,१/२ कप दही , कांद्याची पेस्ट दिड वाटी, ४-५ लवंगाची भुकटी ,४-५ हिरवी इलायची ,आल लसून पेस्ट २ चमचे, २ टमाटर बारीक कापलेले, गरम मसाला १/२ चमचा, ६-७ काश्मिरी लाल मिरच्यांची पेस्ट (नसेल तर आपली नेहमीची चालेल ),मीठ बस ........ गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि तळलेले काजू कृती :- चिकन स्वछ धुवून घ्या , (एरवी आपण चिकन करताना आधी ते शिजवून नंतर फोडणी करतो पण काश्मिरी चिकन मसाल्या मध्येच पूर्ण शिजवून घेतात ) (मी वेळ वाचविण्यासाठी एक शिट्टी देऊन घेतलीय ) कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद घालून फक्त एक शिट्टी घ्या पॅन मध्ये ३ मोठे चमचे तेल (बटर किन्वा घि पन घालु शकता)घाला , कांदा पेस्ट घालून परतावा , हलका सोनेरी होऊ द्या ,तेल सुटू लागले कि ,आल लसून पेस्ट घाला .टोमाटो घाला ,आता मिरची पेस्ट,लवंग भुकटी , आणि इलायची घाला मस्त परतून घ्या .आता गरम मसाला घाला. जबरा वास सुटेल आता चिकन पिसेस घालून मस्त हलवून घ्या , चवीनुसार मीठ घाला . चिकन शिजवताना जे पाणी वापरलय तेच पाणी करीसाठी वापरा , आता त्यात थोड - थोड दही घालून छान मिक्स करत रहा १५-२० मिनट छान शिजवून घ्या . थोडे पाणी आटल्याने मस्त ग्रेवी तय्य्यार होते कापलेली कोथिंबीर ,तळलेले काजू आणि बादामाचे काप घालून गार्निश करा . काश्मिरी चिकन करी वर्पायला तय्यार आहे :) (फोटू मोबाइलवर घेतले असल्याने क्लिअरिटि बद्दल शमस्व )

वाचने 6222
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

हे कळल नाही. म्हणजे नुसत्याच रिकाम्या कूकरची शिट्टी घ्यायची की काय? बाकी दिसायला मस्तच.

In reply to by गोगोल

कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद आनि चिकन घालून फक्त एक शिट्टी घ्या असे म्हनायचे होते मला,गड्बडित विसरले :) स्वारि ह !

In reply to by वेताळ

दुकानात मिळेलः) ह्या मसल्यात काश्मिरि मिरचि अस्ते आनि सोफ , दाल्चिनि,एलायचि (छोटी) ,लवन्ग्,आनि केसर वापर्तत रेडीमेड मिळ्तो ,घरिहि बन्वु शकता

प्रतिसाद संपादित. टारझन ह्या सदस्यास वैयक्तिक टिका टाळावी म्हणुन सक्त ताकिद देण्यात येत आहे. पुण्हा सांगण्यास लावु नये.

In reply to by टारझन

>>>पुण्हा सांगण्यास लावु नये. हा टार्‍या स्वतःच संपादितो की काय??????? @ सं मं- सॉरी शक्तिमान.

छान आणि क्षमस्व !! ही डिश कश्मीरी नाही , पण जे काही झालय ते मस्त दिसत आहे , त्यामुळे चवदार असणार हे मान्य ;)

In reply to by सुहास..

कोन म्हनत? हो मि अशिच रेसेपि वाचुनच काश्मिरि चिकन करि बनवलि आहे काश्मिरि मसल्यात मिर्चि बरोबर सोफ्.केसर्,दाल्चिनि,आनि हिरवि एलायचि ,लवन्ग भुकटि,वापर्तात आनि दहि घालुन हि रेसेपि शिजवलि जाते कित्ति वेळा सान्गु ? आनि ह्यातला मसाला नेह्मि प्रमाने नसुन वेगळा आहे हे रेसेपित नमुद केलेले आहे

In reply to by सुहास..

कोन म्हनत? हो मि सेम अशिच एक रेसेपि वाचुनच काश्मिरि चिकन करि बनवलि आहे काश्मिरि मसल्यात मिर्चि बरोबर सोफ्.केसर्,दाल्चिनि,आनि हिरवि एलायचि ,लवन्ग भुकटि,वापर्तात आनि दहि घालुन हि रेसेपि शिजवलि जाते कित्ति वेळा सान्गु ? आनि ह्यातला मसाला नेह्मि प्रमाने नसुन वेगळा आहे हे रेसेपित नमुद केलेले आहे

आम्ही शुद्ध शाकाहारी त्यामुळं जिवंत खेळणा-या बागडणा-या कोंबड्याच जास्त बघतो. तरी, ही पाक्रु छान असेलच, वर परा म्हणतात तसं बटाटे व प्लॉवर घालुन करुन पाहु. @ परा, तु आणि मी बटाटे व प्लॉवर आणु, आणि पियुषा रस्सा करुन आणेल चालेल का ? पियुषा, ही काश्मिरी का ? फक्त काश्मिरी मिर्ची टाकली म्हणुन की अजुन काही वेगळं कारण आहे.?

In reply to by ५० फक्त

ही काश्मिरी का ? फक्त काश्मिरी मिर्ची टाकली म्हणुन की अजुन काही वेगळं कारण आहे.?
ऑफकोर्स , परवाच मी बंगाली खारे शेंगदाणे खाल्ले ..विचारा कसे ? त्यात बंगालच्या उपसागरातलं मीठ होतं ना =)) लवकरंच एक मल्टिनॅशनल डिश टाकतो .. प्रत्येक देशातला एकेक पदार्थ घेउन यायचा ;)