Skip to main content

पालक गोश्त

लेखक गणपा यांनी रविवार, 21/08/2011 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ मध्यम कांदे बारीक चिरलेले. २ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला. ५०० ग्रॅम. मटण. २ चमचे दही + १ मोठा चमचा आल-लसुण वाटण + १ लहान चमचा हळद + १ चमचा मसाला एकत्र करुन मटणाला लावुन १-२ तास मुरत ठेवाव. खडा मसाला : २-३ वेलच्या , ३-४ लवंगा, १०-१२ काळीमीरी, १ इंच दालचीनी, तमाल पत्र. १ चमचा आल-लसुण वाटण. १ मोठा चमचा लाल तिखट. १ मोठा चमचा गरम मसाला. १ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट. २ मोठे चमचे लिंबाचा रस. तेल, मीठ चवी नुसार. कृती : एका कढईत थोडं तेल तापवुन त्यात खडा मसाला परतुन घ्यावा. मग त्यात कांदा टाकुन तो पारदर्शक होई पर्यंत परतुन घ्यावा. त्यात आल-लसणाच वाटण टाकुन कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा. नंतर त्यात मुरवलेल मटण टाकुन मोठ्या आचेवर ५-१० मिनिटं झाकण न ठेवता परताव. मग त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकुन मटण चांगल एकत्र कराव. ५ मिनीटांनी त्यात टॉमेटोची पेस्ट टाकावी. त्यात चिरलेला पालक टाकुन, एकत्र करुन घ्याव. लिंबाचा रस टाकावा. १/२ कप पाणी टाकुन वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजत ठेवाव. अधुन मधुन ढवळावं. पाणी आटल्यास थोडं थोडं गरम पाणी टाकत जाव. मटण शिजले की चवी नुसार मीठ टाकुन, झाकण काढुन मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजवावे. नान, तुंदुरी रोटी, भाकरी, वा वाफाळत्या भाता सोबत हाणावे.

वाचने 15442
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

In reply to by सोत्रि

पालक घातलेले काहीही 'पचण्या'करिता बाह्य पाचकाची आवश्यकता असते, हे पटू शकत नाही. ('बहाना चाहिए' हेच खरे. ;))
(ड्राफ्ट बीयर प्रेमी )
असे सरळसरळ बोला ना! उगाच नसती स्पष्टीकरणे कशापायी? ;) (अवांतर: तयार पदार्थाची चित्रे क्षुधावर्धक.)

In reply to by Nile

एक तर श्रावणात नळ्या फोडून धर्म तर बुडवतच आहात आणि आता तर साक्षात देशद्रोह ! जमत नसेल तर आपण चक्री उपोषण करू. आता मटण खाल्लेत, पुढच्या आठवड्यात उपास करा तुम्ही, मी मटण खाईन. कसे ? ;) :P

निव्वळ तुम्ही केलीय म्हणुन ट्राय करेन, अदर्वाइज आपण मटण अन मासे भाज्यात नाही मिसळत. परवा आचारी केल होत. अजुन जमिनीवर यायच आहे, इतक सुंदर झाल होत.

सुंदर पाककृती आणि प्रेझेंटेशन. 'देव कुणाच्या बोटात काय ठेवतो बघा' - चितळे मास्तर. कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा. हे वाचून न शिजलेले, निबर मटण चावल्यासारखे वाटले. 'गळणे' हे मराठीतले क्रियापद आहे आणि त्याला एक वेगळा अर्थ आहे. 'शिजेपर्यंत' असे साधे लिहिणे तुम्हाला का सुचले नसावे, गणपाभाऊ? अवांतरः ही प्रतिक्रिया सुपूर्त करताना प्रतिक्रियेचे 'पुर्वदृष्य' हे पाहिले आणि मग तुम्हाला असे का लिहावेसे वाटले असावे हे कळाल्यासारखे वाटले.

मांसाहारी नसल्याने छान सुंदर असा प्रतिसाद देणे शक्य नाहि, पण विषय आवडत नसला तरि सर / बाई आवडतात तसं क्लासला हजेरी लावतात कालेजात म्हणुन हा प्रतिसाद. बाकि प्रेझेंटेशन आणि कढईतली वाफ लेन्सवर येउ न देता फोटो काढण्याचे कसब उपयुक्त आत्मसात केले पाहिजे.

गणपाभाऊ नेहेमीप्रमाणे पाकृ झक्कास ! मालक पालक ब्लान्च का काय म्हणतात ते केल तर डिश अजुन हिरवी दिसेल शिवाय लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्या घेतल्या तर ?

मस्तच गणपा भाउ!!! (मी पुन्हा शाकाहारी का झालो? ह्या गोष्टिची खुप दिवसांनि पुन्हा एकदा चिड्चीड झालि :( ) (अश्याच लज्जतदार शाकाहारि पाककृती येउ द्यात. वाट पहातोय!)

छ्ळतोस आहेस तु आम्हाला.श्रावणामुळे ला़ळ गाळण्या व्यतिरिक्त काही करु शकत नाहीरे आम्ही.

क्या बात है गणपाभौ. ...मस्तच. तरी शाकाहारी असल्याने मटनच्या ऐवजी पनीर घालून पाहीन म्हणतो. :) त्या नानची पाकृ आहे का मिपावर? असल्यास लिंक द्या ना त्याची.

In reply to by प्रचेतस

वल्ली पनीर ऐवजी सोयाबीन वापरुन पहा. :) स्वातीताईची नानची पाककृती इथे पहाता येईल.

In reply to by गणपा

सोयाबीन कसे वापरावेत? म्हणजे आतापर्यंत सोयाबीनचे पदार्थ घरी आणून कधीही केले नाहीत. म्हणजे विकत मिळतात तसेच वापरून मुरवावेत का भाजणे, तळणे, वाफवणे वगैरे काही संस्कार करावेत. बाकी नानच्या दुव्याबद्दल धन्यवाद. :)

श्रावण संपल्या-संपल्या पहिली केली जाणारी नॉन वेज डिश ही असेल :) - (घरात सक्तीचा श्रावण पाळणारा) सोकाजी अवांतर: भारतवारी कधी? पुण्यास येणॆ होणार आहे का? धम्यावर एक घरगुती कट्टा उधार आहे ;)

In reply to by सोत्रि

नुसतेच गप्पा करा तुम्ही लोक. समाजवादी कुठले! तो गणपा बसलाय आफ्रिकेच्या झाडांवर झोके घेत..गवि तिकडं मुंबईत बसून कोल्लापूरच्या कर्दळीच्या बागेसाठी गाणी लिहिणार... लेको, सगळे जमणार कधी? चला, ठरवा लवकर लवकर. त्या गणप्यालाही बोलवूया...अनायसे पालक-गोष्त ही होऊन जाईल. ;)

भर श्रावणात पालक-गोश्त! एकूण मित्रवर्य गणपा आमच्याच रांगेतले दिसतायत ;)

In reply to by संदीप चित्रे

मांसाहारी कंपूने मासांहाराचा प्रचार करण्यासाठी दिलेला प्रतिसाद वाचून डोळे पाणावले.

In reply to by रेवती

अग्ग्ग्ग्गगं... मधमाशीच्या पोळ्यावर दगड भिरकावू नये. आवंतर : मी रेवतीताईला कसलीही सुपारी दिलेली नाही. :)

माझ्या बायकोने ही रेसिपी वापरून केलेले 'पालक-गोश्त' खात साजरी केली रे मित्रा! रेसिपीप्रमाणे पदार्थ बेष्टच झाला होता हे वे सां न ल!

पालक गोश्त हा प्रकार खूप आवडीचा पण कधी करुन पाहिला नाही. आता ही पाककृती नक्कीच प्रयत्नुन बघेन. 'कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.' श्री सन्जोपरावांशी सहमत. मलाही ही शब्दयोजना रुचली नाही. असो.