Skip to main content

कोर्न पालक राइस

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 10/05/2014 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी तांदुळ २ वाट्या पालक पेस्ट १ वाटी मक्याचे दाणे १ चमचा धनेजिरे पूड २ हिरव्या मिरच्या(आवडीप्रमाणे कमीजास्त) २ लवंगा,३-४ काळे मिरे,१ तुकडा दालचिनी १ तमालपत्र १ चमचा साजूक तूप मीठ चवीप्रमाणे तेल कृती: पालक धुवुन पाण्यात ५-७ मिनिटे उकळवून घ्यावा.या पालकाची हिरवीमिरची घालून पेस्ट करुन घ्यावी. तेल गरम करुन मोहरी,जिरे,हळदीची फोडणी करावी.त्यात लवंगा,मिरे,तमालपत्र घालून परतावे. या फोडणीत धुतलेला तांदुळ घालून परतावा.पालक पेस्ट्,धनेजिरे पूड्,मक्याचे दाणे,मीठ घालून परत एकदा परतून घ्यावे. वरून चमचाभर साजूक तूप घालावे. जरूरी प्रमाणे उकळते पाणी घालून भात शिजवून घ्यावा. हा भात नूसताच,रायत्याबरोबर कसाही खाउ शकता. hjgj

वाचने 8816
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

आजकाल आमचे जीवन भाउ कुठे गायब झालेत, कुणास ठावूक? मग म्हटले, सुदैवाने आमच्या प्रवेशाच्या वेळांतच लेख प्रसिद्ध झाला आहे. तर टाकावा पहिला प्रतिसाद....

In reply to by आत्मशून्य

धन्यवाद.... तुम्ही असेच आम्हाला सल्ले देत जा. तुमचे सल्ले मानलेच पाहिजेत असे थोडीच आहे?

In reply to by मुक्त विहारि

सल्ला ? मी तर आपलं फक्त निरीक्षण नोंदवले आहे. फरक कलेल तो सुदीन म्हणायचा काय ?

In reply to by आत्मशून्य

अशा नक्की किती पोस्ट वर मी "मी पहिला." अशी प्रतिक्रिया दिली आहे? नाही म्हटले, तुम्ही निरीक्षण नोंदवता. मग जरा संख्या दिलीत तर उत्तम.

In reply to by आत्मशून्य

ते तुम्हाला कळलेले नाही, ह्यात तर बरेच काही आहे...

In reply to by आत्मशून्य

"मी पहिला" असे लिहीणारे बरेच आहेत. अर्थात आपल्यासारख्या थोर आणि उच्च व्यक्तीला आम्हीच दिसलो, ह्यातच सगळे आले.

आणि पाकृहि उत्तम. मला फार आवडतो असा कॉर्न-पालक राईस. ह्याच्या बरोबर काकडि-कांद्याचं दह्यातलं रायतं छान लागतं.

ग्रीन कलर राईस. अस रंगीत संगीत खाण्याचे प्रकार पाहून तोंडाला पाणी सुटत हो. अन मग वजन वाढते ते वेगळेच!!

सर्व प्रतिसादकर्त्यांचे 'कुहूप' धन्यवाद! @यशोधरा रेसेपी लगेच करुन बघितलीस आणि पोच दिलीस त्याबद्दल डबल धन्यवाद.