जे न देखे रवी...

लग्न

Primary tabs

त्याच्या लग्नाच्या
पन्चविसाव्या वाढदिवसाला
त्याला मी विचारले,
"लग्न म्हणजे कॉम्प्रमाइज..
हे खरय का ?"

माझी कीव करत तो
क्षणात उत्तरला,
"वेड्या, अशा भ्रमात राहू नको !
खरे तर ,
कॉम्प्रमाइज म्हणजेच लग्न ! "

मि.पा.वर स्वागत..:)
छान मजा आली विनोदी काव्य वाचून..
येऊ दे आणखी...

विवेकवि

मि.पा.वर स्वागत..

ऊत्तम......
विवेक वि.

सचिन

मनःपूर्वक धन्यवाद !
अशा प्रतिसादांमुळे निश्चितच हुरूप येतो !!

धनंजय

पण काही खोल अर्थ आहे असे वाटते, आणि तो समजला नाही.

लग्न हे एका दिवसात होऊन पुढे कॉम्प्रोमाईज (तडजोड) करावी लागते असा प्रश्न पहिल्या कडव्यात, आणि पंचवीस वर्षे केलेल्या लांबलचक तडजोडीला "लग्न" म्हणावे, हे उत्तर दुसर्‍या कडव्यात -- असा गर्भित अर्थ आहे काय?

सचिन

धनंजयराव,
यू हॅव हिट द नेल ऑन द हेड..!!