बोईटाची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर बोईट मोठे असतील तर त्याचा शेपटाकडील भाग , डोके आणि मधला भाग असे तिन भाग करावेत. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधला भाग तळण्यासाठी वापरावा. जर छोटे असतील तर दोन तुकडे किंवा अख्खेच ठेवावेत.
मोठ्या बोईटाला पिळसा म्हणतात.
लागणारे साहित्य:
बोईटाच्या कालवणाचे साहित्य :
बोईट ४-५
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
पाककृती :
बोईटाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर बोईटांचे तुकडे घालावेत. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
हेच बोईट हिंग, हळद, मसाला, मिठ लाउन तव्यावर शॅलोफ्राय करता येतात.
निलकांताला विनंती : जागुतैंसाठी माकृ नावाचा वेगळा विभाग मिपावर उघडून द्यावा.
नाही तर...
जागुतैंना विनंती: तुम्ही एक "माझ्या पाकृ" असा धागा काढून त्यात फक्त अश्या तुमच्या सगळ्या पाकृ धाग्यांच्या (लिंक) सुची वर्गिकरणासहित द्या.... आमच्या सारख्या शिकाऊ स्वयंपाक्याला फार मदत होइल.
:) परवाच आणुन ठेवल्यात फ्रिज मध्ये .
आज करणारे ;)
खल्लास!
निलकांताला विनंती : जागुतैंसाठी माकृ नावाचा वेगळा विभाग मिपावर उघडून द्यावा.
नाही तर...
जागुतैंना विनंती: तुम्ही एक "माझ्या पाकृ" असा धागा काढून त्यात फक्त अश्या तुमच्या सगळ्या पाकृ धाग्यांच्या (लिंक) सुची वर्गिकरणासहित द्या.... आमच्या सारख्या शिकाऊ स्वयंपाक्याला फार मदत होइल.
आंबोळी
जागुतैंना वर केलेली सुचना अपोआप गणपालाही लागु होते हे वे. सा. न.
आंबोळी
आईशप्पत! तब्बल २० वर्ष उलटली बोईटे खाल्ल्याला!
=P~ =P~ =P~ =P~
वा वा!
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it
"या वाक्यातील इंग्रजीच्या (अपघाती) मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा कोणासही अधिकार नाही" असे या(च) वाक्यातून अप्रत्यक्षपणे सुचवलेले आहे काय?
- पंडित गागाभट्ट.
आजचा बेत.
भात-भाकरी, बोय फ्राय आणि कालवण.
स्वाती २० वर्षे ? :T
गणपा ताट मस्तच दिसतय.
पंगा हा काय पंगा आहे ?
विसोबा वाक्य आवडल.
विविध प्रकारचे मासे व त्यांच्या पाकृ यांचे एक छान संकलन होते आहे.
सुनील यांनी त्यांचा संकल्प धागा अद्ययावत करावा अशी विनंती जेणे करुन देशी नावाचे मासे इंग्रजी भाषेत कोणत्या नावाने ओळखले जातात हे कळेल.