पाककृती

पेप्पर चिकन

Primary tabs

साहित्य: Image removed. १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. ८-१० लसुण पाकळ्या ठेचलेल्या/बारीक चिरलेल्या. ४-५ मिरच्या उभ्या चिरलेल्या. १/२ लिंबु. २-३ चमचे काळीमीरी पुड. (बारीक आणि भरड दोन्ही) कडिपत्ता. १ चमचा हळद. २ चमचे सोया सॉस. मीठ चवी नुसार. २ चमचे तेल आणि तुप. Image removed. १/२ ते ३/४ किलो चिकन मध्यम आकारचे तुकडे करुन आणि मीठ लावुन १०-१५ मिनिटे मुरत ठेवलेले. कृती: Image removed. लसुण तेला तुपावर २ मिनिटं परतुन घ्यावा. Image removed. मग त्यात कडिपत्ता, कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकुन परत २ मिनिटं मोठ्या आचेवर परतुन घ्यावे. Image removed. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिकन चे तुकडे टाकुन मध्यम आचेवर परतुन, झाकण लावुन १०-१२ मिनिटे शिजवत ठेवावं. Image removed. नंतर त्यात हळद, सोयासॉस,लिंबाचा रस आणि चवी नुसार मीठ टाकुन परत ५ मिनिटे झाकण लावुन शिजु द्यावं. Image removed. ५ मिनिटांनी झाकण काढुन, मोठ्या आचेवर पाणी आटे पर्यंत परतत रहावं. पाणी संपुर्ण आटल्यावर त्यात काळी मीरी पूड टाकुन मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतुन घावं. गरमागरम पेप्पर चिकन. Image removed.
यशोधरा

अतिशय दुष्ट माणूस! इतरांना छळण्यात काय आनंद मिळत असेल काय माहिती!

:) मस्त, मस्त, मस्त.

दिपक

तेरे हाथ मुझे दे दे गणपा !

:-)

सहज

काय लिलया बनवुन दाखवता हो तुम्ही. एखाद्याला वाटायचे स्वयंपाक इज नो बिग डील. :-)

गणपाजी तुम्ही एकदा कधीतरी फसलेली रेशीपी लेख पण टाका राव. :P

छोटा डॉन

साला गणपा म्हणजे जादुगर आहे, कसला क्लीन स्वयंपाक करतो रे भौ.
गणपाचे धागे खरेतर आम्ही त्याच्या पुर्वतयारी आणि मधल्या स्टेप्सचे फोटो पाहण्यासाठी बघतो.

>>एखाद्याला वाटायचे स्वयंपाक इज नो बिग डील.
+१, १००% सहमत ...

>>गणपाजी तुम्ही एकदा कधीतरी फसलेली रेशीपी लेख पण टाका राव.
हॅ हॅ हॅ.
ह्यावरुन आम्हाला एक आठवले.
एकदा काय की म्हणे गणपाने 'अंडी उकडायला' ठेवली होती गॅसवर. काही कारणाने गॅस बंद झाला व पाणी गरम न झाल्याने अंडी उकडलीच गेली नाहीत. हीच बहुतेक गणपाची फसलेली रेशिपी असावी ;)
( ही बाब खुद्द आम्हाला गणपानेच चॅटवर सांगितली असली तर आता ह्याचे 'पुरावे' देणे शक्य नाही ) ;)

------
( गणपाचा फॅन ) छोटा डॉन

जागु

गणपा मस्तच आहे रेसिपी. उद्याच करुन पाहते.

हम्म्म्म्म्म्म्म्म
साला आम्ही शाकाहारी असुनही ह्या गणपाचे 'अभक्ष' धागे त्याच्या सजावटीसाठी आणि हातोटीचे फोटो बघण्यासाठी उघडतो.

शाकाहारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मस्त कलंदर

साला आम्ही शाकाहारी असुनही ह्या गणपाचे 'अभक्ष' धागे त्याच्या सजावटीसाठी आणि हातोटीचे फोटो बघण्यासाठी उघडतो.

सहमत!!!

(शाकाहारी)मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

jaypal

आम्ही काय बोलणार. उद्याचा चखना मेनु फिक्स झाला.
chik

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

आशिष सुर्वे

..

डिक्श्णेरी काढून, छान, अप्रतिम, अजोड, उत्तम, सरस, खल्लास, इ., इ., सबुदांना समानार्थी सबुद शोधतोय..
त्याचे काय हाय, आम्च्या गण्याच्या पाकॄ ना दाद देता देता सालंत शिकंवलेले सगले सबुद संपले..

(फेटा उडवन्याची 'इस्मायली' म्या सोदलेय.. तीच देतो आता:

@

^
^
^
^
=
)
======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

क्या बात है...................गणपाशेठ
अपेयपान करताना आमची आवडती डिश. ईतकी सोपी असेल असं वाटलं नव्हतं.
करायलाच हवी.
लगे रहो.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.