पाककृती

पाकृ हवी आहे... आंब्याची डाळ

Primary tabs

आंब्याच्या डाळीची पाकृ मिळेल कां? आणि ही डाळ वाटल्यानंतर कच्चीच खायची असते कां? दिपाली :)
शिल्पा ब

चना डाळ ३-४ तास आधी भिजत घाला, कैरी किसून घ्या, आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या.
डाळ, ३/४ कैरी अन मिरच्या वाटून घ्या. मीठ घाला...आवडीनुसार साखर घाला.

फोडणीसाठी : नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलात मोहरी, जिरे, हिंग,हळद आणि काढीपत्ता घालून फोडणी करा. थंड झाल्यावर वरील वाटणात घालून mix करा.
खा.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

धन्यू रेवतीताई,मी हाच लेख शोधत होते....पण रेवतीताई,ही डाळ कच्ची खाताना उग्रट नाही लागत कां?

दिपाली :)

जागु

दिपाली फोडणी चांगली कडकडीत द्यायची वाणी कैरीमुळेही डाळिला चव येते.

पण जागु , फोडणी तर थंड करुन घालतात की कडकडीत...तसं रेवतीताईंच्या पाकृतीत थंड फोडणी घातलीय... त्याचं काही कारण आहे कां?

दिपाली :)

अवलिया

>>>आंब्याच्या डाळीची पाकृ मिळेल कां?
रेवती तैंनी दिली आहे.

>>>आणि ही डाळ वाटल्यानंतर कच्चीच खायची असते कां?

अहो वाटल्यानंतर उरेल कशी? ज्यांना वाटली तेच खाउन टाकणार.

--अवलिया

:P .....इथे दुबईत मला मस्त कैर्‍या मिळाल्या आज सकाळी
...डाळ पण भिजत घातली आहे..
.....आज संध्याकाळी बनवून मस्त्....मस्त खाणार...
....आई ने पन्ह्याचा अर्क बनवून दिलाच आहे....
......डाळ्कैरी + पन्हं.....
..आहाहाहा :P

स्पंदना

कोल्हापुर भागात थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतात ही डाळ.
सारी कृती तीच पण मिरची वाटताना त्याबरोबर थोडेसे जीरे ही वाटले जातात.

बघ एकदा करुन .

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते