पाककृती

मस्त मस्त कुकिज

Primary tabs

Image removed. १ कप गव्हाचे पिठ 1/4 कप self raising फ्लोर 1/2 कप पिठि साखर 1/4 टिस्पुन मिठ 1/2 टिस्पुन इलायची 1/2 कप अनसॉल्टेड बटर 2 टेबल्स्पून्स दुध ओवेन 360 डिग्री फॅरनाइट वर प्री हिट करा. एका बोल मधे पीठ, साखर,मिठ,इलायची पाउडर मिक्स करा. आता वितल्लेले बटर,दूध घालुन निट मिक्स करा व ते वरिल बोल मधिल मिक्स मधे घाला. ह्याचा मळून मउ गोळा करा. आनी त्याचे छोटे छोटे गोळे करून चप्टे करा. आता हे गोळे बेकिंग ट्रे वर ठेवा. व १५ मिनिट साठि बेक करा. आता ह्या कुकिस तयार झाल्या. गरम गरम चहा बरोबर मस्त लागतात. हा फोटो कढुन मला जवळ जवळ एक वर्ष झाले उशिर होण्याचे कारण :-- टाइप करायाचा आळशि पणा आणखि काय.
चिरोटा

मस्तच्.इराणी बेकरीत अशा कुकीज मिळतात बहुतेक.
-----

मस्त कलंदर

छान दिसत आहेत कुरकुरीत कुकीज... मला पण इराण्याच्या हॉटेलातल्या बरण्यांची आठवण झाली!!! :)

Nile

सकाळचा चहा अन बिस्किटे, कुकी(मग त्या चितळेंच्या कणकेच्या का असेना ;-) ), खारी, टोस्ट, रसक म्हणजे दिवसाची सर्वोत्तम सुरुवात असे तर ब्वॉ आपले ठाम मत आहे.

अर्धवट

ठाम मतभेद.

आपला जीव 'चा - बटार' अथवा चा चपाती वर आहे.

असो कुकीज आवडल्या

Nile

चपातीचा विसर पडला हो, लै लै वर्षे झाली खाउन!

माझे म्हणणे, चहा (अन असेच सोबत काहीतरी खायला)म्हणजे दिवसाची...

गणपा

कडांना आलेला किंचीत लालसर रंगच सागतोय की नक्कीच कुरकुरीत झाल्या असणार कुकीज्.
:)

जासुश

आभारि आहे.सर्वान्च्या छान छान प्रति क्रियान्साठि..

मला नान खटाई जास्त आवडते. पन प्रॉपर रेसिपी कुठे मिळलि नाही.

चित्रा

छान. कुकीज खरोखरच मस्त दिसत आहेत.