पाककृती

मालवणी स्ताईल

Primary tabs

मला मालवणी स्ताईल मटण खाण्याची तीव्र इच्छा झालेली आहे तरी कोणास पाककृती अवगत असेल तर त्वरित कळवावे. जर जवळ रहात असाल तर ते खाण्यासाठी बोलवावे.
रेवती

या दिडओळीच्या घाग्याचा उद्देश स्पष्ट होत नाही. मालवणी स्टाईलचा कोणता पदार्थ्/कृती आपल्याला हवी आहे ते लिहावे.
असे धागे अप्रकाशित केले जाउ शकतात याची नोंद घ्यावी.

शुचि

@ रेवती - त्यांनी लिहीलय मटण
@ कळस - तुम्ही कुठे रहाता हे जगाला माहीत असेल का?

आमोद शिंदे

अहो पण तुम्ही कुठल्या कळसावर चढून बसला आहात ते तरी कळवा की. म्हणजे वाचकांना तुम्ही जवळ राहता की नाही ते कळेल आणि एकोळी धाग्यात एखादी ओळ वाढल्याने रेवती ह्यांना आक्षेपही राहणार नाही.

वेताळ

पण मालवणी स्टाईल ने मटण कसे खायचे हे मला माहित नाही. तसे मालवण भागात बरेचदा गेलो पण लोक सरळच जेवतात. मटण खाण्याची मालवणात विशेष अशी कोणती वेगळी पध्दत नाही. फक्त मटन बनवण्याची मालवणी वेगळी पाककला आहे.

पण मालवनी मटणा पेक्षा चिकन मालवणी ज्यादा प्रसिध्द आहे. मालवण म्हटले कि मासे व त्याचे विविध प्रकार आठवतात. पण आजकाल इथे म्हणजे भारतात मासे खुप महाग मिळतात,पण ते देखिल कधी मिळतील ह्याचा भरवसा नाही. तु राहतोस कुठे ते सांग म्हणजे चांगले हाटिल तुला सुचवता येईल.

पक्या

छान रेसिपी पेठकर काका, धन्यवाद.

@ रेवती - प्रश्न छोटा पण त्याचे उत्तर मोठे असू शकते. तसेच धाग्यातील लिखाण छोटे असले तरी प्रतिसाद मोठे येऊ शकतात, त्यावरील चर्चा मोठी असू शकते आणि एखाद्या विषयासंबंधात माहिती विचारायची असल्यास भरमसाठ असे काय लिहीणार?
प्रतिसादातून पेठकर काकांची मालवणी पदार्थाची कृती तरी समजली ना.
लगेच संपादनाच्या कात्र्या नका हो बाहेर काढत जाऊ?