पाककृती
कोथिंबीरीच्या वड्या
Primary tabs
साहित्य :- चिरलेली कोथिंबीर एक मोठी वाटी, हरबर्याच्या डाळीचे पीठ १ मोठी वाटी, धने जिरे पुड १/१ मोठा चमचा,चवीप्रमाणे मीठ, फ़ोडणीचे साहित्य, आले मिरची पेस्ट १ चमचा, तेल.
From Recipee
कृती :- प्रथम कोथिंबीर धुवुन घेउन त्यात धने जिरे पावडर,मीठ, हळद, हिंग, आले मिरची पेस्ट, घालुन घ्यावे. त्यातच बसेल तसे डाळीचे पीठ घालावे. पीठ जास्त घालु नये.थोडे पाणी घालुन वरील मिश्रण चांगले मळुन घेउन त्याचे लांबट गोल असे उंडे करावेत.
From Recipee
ते मोदकाप्रमाणे वाफ़वुन घ्यावेत.
From Recipee
जरा गार झाल्यावर सुरीने तुकडे पाडुन घ्यावेत.
From Recipee
एका कढईत तेलावर राई, जिरे, हिंग, हळद घालुन या वड्या / तुकडे त्यावर घालुन चांगले परतुन घ्यावे आणि वरुन खोबरे घालुन खायला घ्यावे..
From Recipee
खुपच छान वड्या दिसताहेत.फोटो देखिल एकदम झक्कास आले आहेत.
मस्त आहे श्रावण मेनु...
आ हा हा... :)
मला फार आवडतात!
:-)
मलाही !!!
तोंडाला पाणी सुटलं
टोन्डाला* पाणी सुटलं...
(*आभार: वैदर्भिय)
जेव्हा जेव्हा टोण्डाला पाणी सुटेल तेव्हा तेव्हा दुवा देत चला! ;)
पाकृ बाकी मस्तच!
ह्या छानच. पण न तळता, नुसत्याच वाफलेल्यादेखिल चांगल्या लागतात (आळूवड्यांप्रमाणेच)
आवडीचा पदार्थ. आणि सध्या कोथीँबीर स्वस्त आणि मस्त मिळते.
एक सुचवु इच्छीतो.
ह्.डाळीचे पिठ पचायला जड असते. विषेशतः या दिवसात. म्हणजे पावसाळ्यात. तेंव्हा पिठा ऐवजी भाजणी वापरावी. भाजणी वापरल्यास पोषणमुल्येसुध्दा वाढतात आणि खुसखुशीत होतात.
जाता जाता- श्रध्दा, तयारीच्या यादीत खोबरे विसरली आहेस.
सुंदर.. :)
श्रद्धा मस्तच आहे रेसिपी.