पाककृती
कारल्याची सळीभाजी
Primary tabs
लागणारे जिन्नस:
पाव किलो कारली (कारली स्वच्छा धुवुन ती उभी सळ्यांसारखी कापावी चित्रात दाखवल्याप्रमाणे).
४-५ लसुण पाकळ्या
कढीपत्ता
हिंग,
हळद,
जिर
मसाला
थोडा लिंबु रस
चविपुरते मिठ
१ चमचा साखर
२ चमचे शेंगदाणा कुट
क्रमवार पाककृती:
मिपावर बर्याचदा काहीजणांची शब्दांची लढाई चालू असते. म्हणून म्हटल जरा त्यांना शाद्बीक लढाईयुक्त रेसिपी देऊ.
सगळ्यात आधी कारली धुवुन घ्या मग त्यांची चिरफाड करुन त्याच्या सळ्या जश्या बटाट्याच्या बाजारात मिळतात त्याप्रमाणे साधारण तेवड्याच आकाराच्या सळ्या करा. आता गॅसवर भांड ठेवा आग लावुन भांड चांगल तापू द्या. भांडे आणि तेल तापले की जिर, हिंग, लसुण, कढीपत्ता, हळद हे फोडणीचे सैन्य तापलेल्या तेलावर सोडा. जर तेल चागले तापले असेल तर लढाई चांगली जुंपते आणि ह्याची प्रचिती आपल्याला खमंग सुटलेल्या वासातुन येतो. फोडणीचा खमंग वास घेत बसू नका नाहीतर लढाईत जिन्नसांचा कोळसा होईल. भराभर परतुन लगेच त्यात सळ्यांची हत्यारे सोडा अजुन भडकवण्यासाठी वरुन मसाला टाका. थोड परतवुन शिजत ठेवा. हो पण मधुन मधून ढवळत राहा नाहीतर सैन्य तळाला बसेल. आता कारल शिजत आल की त्यावर अजुन लिंबुरस व मिठ चोळा म्हणजे घाला हो नाहीतर हाताने चोळायला जाल आणि मग युद्धात तुम्हीच जखमी व्हाल. परत त्यांना थोडी ढवळून चालना द्या. आता सगळे सैन्य हत्यारे थकली असतील म्हणून आता ही लढाई संपवण्यसाठी त्यावर साखर आणि शेंगदाणा कुट पसरवा आणि थोडे परवतुन एक वाफ येउन गॅस बंद करा म्हणजे लढाई संपली आणि तुम्ही जिंकलात.
चु.भु.द्या.घ्या.
अधिक टिपा:
आवडत असल्यास थोडा गोड्या मसाल्याचा मारा करा.
जर डाएटचा विचार मनात येत नसेल तर थोडे जास्त तेल टाकुन ही भाजी कुरकुरीत करता येते.
हे आहे लढाईचे सैन्य
येतोय का फोडणीचा वास ?
ही रंगसंगती कशी वाटते ?
ही आहे मी जिंकलेली लढाई.

हाहा! शाब्दिक लढाई मस्तच! आम्हाला ब्वॉ कारल्याच्या काचर्या हा एकच प्रकार आवडतो आणि म्हणून तेवढा एकच प्रकार करता येतो! आजच ही लढाई करून पाहतो! मस्त वाटतेय!
शाब्दिक लढाई मस्तच! कारल्याच्या काचर्या आवडल्या!
जागुताई जरा हटके फारसा माहीत नसलेला असा काहीसा खाद्यप्रकार येउ द्या.
+१००
लढाई करून पहायला हवी.. :D
(आगलाव्या व लढाऊ)
छान जागुताई . पाकृ आणी तिचे वर्णन अगदी मिपाला साजेशे !
शॉल्लेट ग !
आमचा आवडता पदार्थ म्हणजे कारल्याचे कुरकुरीत काप ;)
बाकी ते मिठ जरा आधी टाकले तर कारली लवकर शिजतील असे वाटते.
मेघवेडा, सहज, प्राजक्ता, राजकुमारजी धन्यवाद.
राजकुमारजी मी कधी कधी फोडणी दिल्यानंतरही मिठ टाकते. आहो लिहीणारे त्यांच्या पद्धतीने लिहतच असतात. त्यात आपण थोडाफार बदल करायचा असतो. (ही माझी क्रिया झाली.)
करुन पहायलाच हव्यात कारल्याच्या काचर्या.
माझी आवडती भाजी... :)
सुरेख!
सळीभाजी म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर कंस्ट्रक्शनच्या सळ्या आल्या हो!
आणि नंतर लढाई वगैरे वाचून सटपटलोच होतो. चित्रे बघितल्यावर जीवात जीव आला.
जागुतै, तुम्ही तर माझा जीव टांगणीवरच लावला होता बुवा काही काळ. :)
हा हा काय छान लुटुपुटीची लढाई केलीये :)
भाजी रुचकर दिसतेय.
जागुतै, लढाई जिंकून जठराग्नि शमवून रसनेलाही आनंदित करून हा प्रतिसाद देत आहे! फक्त चिंच अंमळ जास्त पडल्याने भाजी काळपट झाली होती त्यामुळे इथं फोटो देण्याची इच्छा होत नाही आहे! उगाच आमच्या स्किल्सना नावं ठेवायला लोकांना आयतं आमंत्रण का द्या, नाही का? :P
लढाईचं प्रशिक्षण दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद!
छान!
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
मेघवेडा चिंच नाही टाकली तरी चालेल.
ज ब रा !! लिखाणाची शैली आणी बनविलेला पदार्थ आवडला
जर मिठ अगोदर टाकल तर् भा़जी लवकर शि़जते का?
ही ही ही ही.
जागु, तुझ्या पाकृ जास्त खमंग का लिखाण याचा आता विचार पडलाय!
लढाई झाली.. आता महायुद्ध कधी?
कडू कारले फोडणीच्या सैन्यात भरती केले तरी ते कडू ते कडूच..!!!
लढाई आवडली. :)
शुभांगी, आदिती, अरुण, प्राजू धन्यवाद.