पाककृती
नासकवणी
Primary tabs
नासकवणी आठवते का? :) खूप मस्त लागते.
दूध नासवा ( पाव लिंबू पिळून); फार पिळू नका नाहीतर आंबट होईल.
दूध फाटलं की घट्ट भाग खाली बसेल आणि पांचट वर ऊरेल
तो घट्ट भाग वेगळा करा त्यात साखर घाला
गॅसवर ऊलूसं हलवा कारण साखरेचा पाक होतो तो जावा म्हणून
थंड किंवा गरम वाढा.
नासकवणी हाझीर है|
मस्तच लागते :)
माझी आई दुध नासल असेल तर करायची आणी मी आणी भाऊ तिला दुध नासव ना मुद्दाम अस मागे लागायचो.
किंचित उशीर झाला हा धागा काढायला! काल अचानक गॅस संपल्यामुळे दूध नासलं आणि कँपसच्या कुत्र्यांना मेजवानी मिळाली!
मला ही रेसिपी आज पहिल्यांदाच कळली.
मस्त लागतो हा प्रकार खुप! यालाच कलाकंद म्हणतात का? आम्ही होस्टेलवर असताना हा प्रकार करायचो(कारण दुध हमखास नासायचच)
याचा कलाकंद होण्यासाठी ह्यात साखर घालून भररपूर वेळ आटवावं लागतं... खाली बुडाला लागून थोडं लाल होईस्तोवर.
सहमत
अरे अनामिका, तु आयटीतला काय रे? ;-)
थोडा चुकलास... मी आयटीतला नसून मला बायको आयटीतली मिळाली आहे :)
आयटीतली बायको म्हंटल्यावर मलाच स्वैपाय यायला नको?
अगदी कालच आठवण आली होती मला , दुध नासलं की हमखास . आजकाल पनीर करतात पण लोकं
मी एकदम धाग्याचं नाव घासकडवी वाचलं. :)
असो. लिंबू फार पिळू नका असं लिहिलंय पण पाव लिंबू किती दुधासाठी ते लिहिलेले नाही.
टिप : फाटलेल्या दुधात आटवताना थोडा खायचा सोडा घातल्यास नासकवणीच्या (साबुदाण्यासारख्या) गोळ्या होत नाहीत.
काही थोर सही विडंबकांच्या लेखणीतून हे कसं सुटलं असा विचार करतो आहे.
नासकवणी - नावावरुन तर ही एक 'पाशवी' अपशब्द वाटतोय. बरेच प्रतिसाद वाचून तर चपखल आहे असे वाटतोय. पाकृच्या धाग्यात अवांतर प्रतिसादाचे जरा जास्तच लिंबू पिळलेय.
तुमच्या पाकृच्या धाग्यात इनो वापरू हो! :p
हो आठवते. छान लागते.
फटूशिवाय असलेल्या पाकृलाही प्रतिसाद देते आहे कारण माझ्या धाग्याला प्रतिसाद मिळावा म्हणून! ;)
रेवतीतै धागा कुठं आहे, लौकर टाका :)
रेवतीताई आगे बढो, हम तुम्हारें साथ है।
-- अदितीताई अवखळकर पाटील,
अध्यक्षा, बेरकेवाडी म्हैला मंडळ,
मु. बेरकेवाडी, पो. अवखळवाडी
'अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला" असे एक हिंदू महिला म्हणते यावर आपले मत काय?'
कसा वाट्टोय हा विषय? आँ?
कसा वाट्टोय हा विषय? आँ?
'अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला" असे एक हिंदू महिला म्हणते... ती पुढे म्हणते की दुसरा पर्याय आहे 'माझा देवावरचा विश्वास उडाला आहे, तेव्हा मुस्लीम धर्म स्वीकारून अल्लाला साकडं घालून बघते'
प्रतिसाद वाचून रेवतीताईने मला फटके मारू नयेत ही विशेष विनंती!
... दुसरा पर्याय आहे 'माझा देवावरचा आणि 'पाशवी'पणावरचा विश्वास उडाला आहे, तेव्हा 'अपाशवी बनून' मुस्लीम धर्म स्वीकारून अल्लाला साकडं घालून बघावं असं वाटतंय!'
'अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला" असे एक पुणेकर हिंदू महिला म्हणते...
प्रतिसादसंख्या एकदम डबल.
'अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला" असे एक पुणेकर, हिंदू महिला म्हणते... तिची मैत्रीण जी, आयटी बायको आहे, ती तिला सल्ला देते की दुसरा पर्याय आहे "माझा देवावरचा आणि 'पाशवी'पणावरचा विश्वास उडाला आहे, तेव्हा 'अपाशवी बनून' मुस्लीम धर्म स्वीकारून अल्लाला साकडं घालून पहा!'
प्रतिसादसंख्या (मूळच्या दुप्पटीच्या) सव्वापट!
अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला" असे एक पुणेकर, हिंदू महिला म्हणते... तिची मैत्रीण जी, आयटी बायको आहे, ती तिला सल्ला देते की दुसरा पर्याय आहे "माझा देवावरचा आणि 'पाशवी'पणावरचा विश्वास उडाला आहे, तेव्हा 'अपाशवी बनून' मुस्लीम धर्म स्वीकारून चिन मध्ये जावुन ,काश्मीर ताब्यात घेऊन ,कोसला वाचत सुशि खाऊन अल्लाला साकडं घालून पहा!
पाय कुठे आहेत हो तुमचे?
अल्लाऽऽऽ! वाचव मला!
हसून हसून बेजार झाले.
हिंदू महिलेच्याऐवजी 'समृद्ध अडगळ महिला' असे लिहिल्यास इंप्रेसिव्ह होइल काय?;)
नाही, नाही! अल्लाऽऽऽ जीव गेला* म्हण!
श्रेयः पुष्करिणी
अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला" असे एक पुणेकर, हिंदू महिला म्हणते... तिची मैत्रीण जी, आयटी बायको आहे, ती तिला सल्ला देते, एक पर्याय आहे की नाडी बघून घे आणि कुंडली तपासून घे. दुसरा पर्याय आहे "माझा देवावरचा आणि 'पाशवी'पणावरचा विश्वास उडाला आहे, तेव्हा 'अपाशवी बनून' मुस्लीम धर्म स्वीकारून चिन मध्ये जावुन ,काश्मीर ताब्यात घेऊन ,कोसला वाचत सुशि खाऊन अल्लाला साकडं घालून पहा!
अगदी!
पुणेकर, पाशवी, हिंदू, महिला हे शब्द वाक्यात आलेच पाहिजेत.
अजून तडका मारायचा असल्यास शाकाहारी, हरित देशवासी वगैरे विशेषणे आहेतच.;)
हा हा हा!!
अदिती, भन्नाट पाशवीपणा!;)
हिंदू महिलेनं जीव दिला हे ऐकून कंटाळा आलाय, जरा बदल म्हणून हिंदू महिलेकडून जीव घ्यायचा का कोणाचा तरी?
म्हण्जे अमूकतमूक पाकॄ खाउन अर्धा किलो वजन वाढल्यानं हिंदू महिलेनं पाकृ लेखिकेचा जीव घ्यावा का ( किंवा कसा घ्यावा ). त्यातही पाकृ लेखिकेचं धर्म, जात, गाव, अमुकतमुक रंगाचा माज, गांधी-नेहरू-चर्चिलं इं बद्दलची मतं अशी वर्गवारी केल्यास सोपेसु
अर्धा किलो वजन कमी होत नाही म्हणून "ही मी निघाले जीव द्यायला"
अरे बाप रे !!! मग मी काय करायचं ?? ( म्हणजे किती वेळा जीव द्यायचा)
त्यात मी हिंदू, पुणेकर आणि महिला (पाशवी असं लिहिवत नाही हो) सुद्धा आहे
अगं सध्या फक्त जाहिरातबाजी चाललिये.
एखादा सनसनाटी, जातियतेवर आधरलेला, स्त्री मुक्तीचा विषय हाताला लागला कि धागा टाकतेच! त्यावर सतत वाद विवाद करणं हे मात्र मिपाकरांचं काम! ;)
सगळ्या मराठींचा हा गुण आहे...
दूध नासलं की मी हे करतो पण याला नासकवणी म्हणतात हे माहित नव्हतं.
लिंबामुळे आंबटपणाची भीती वाटत असेल तर तुरटी कुटुन घाला. एक लिटर दुधासाठी चहाचा एक-दीड चमचा तुरटीची पूड पुरते. मी रसगुल्ल्यांसाठी पनीर काढताना असंच करतो. त्यामुळे पनीरला पिवळेपण आणि आंबट चव येत नाही. पण चिमुट चिमुट घालत दूध ढवळत रहा म्हणजे पनीर रवाळ येतं नाहीतर गोळा होतो.
@ देवरुखकर - धन्यवाद छान माहीती
@ थत्ते - धन्यवाद तुम्हालाही
@ आदिती - मी आमच्या कॉलनीत कुत्रीला पिल्लं झाली होती तेव्हा भर पावसात रात्री भरपूर नासलेल्या दूधाचं पनीर खायला घातलं होतं. बिच्चारी!! पण आमच्याकडे चोरून रात्री हे करावं लागायचं कारण सकाळी कोणी पाहीलं तर ओरडायचे की तुम्ही गावकुत्र्यांना खायला घालता म्हणून ते सोकावतात.
@रेवती - धागा काढ. वाट पाहतेय.
@कुसुमिता - कलाकंद याचाच भाऊ वाटतो
@समिधा, पुष्करिणी - धन्यवाद
लहान असताना दुध नासल्यावर ते फेकुन देण्यापेक्शा आई हेच करुन प्यायला द्यायची...
- पिंगू
माझी आई , दूध नासले कि नासकवणी करायची .. पण मुद्दाम दूध कधी नासवले नाही .
दूधात लिंबू पिळायच्या ऐवजी व्हाईट व्हिनेगर वापरले तर आंबट चव येत नाही .
ह्म्म्म,
नासकवणी म्हणतात काय याला,
मी तर ब्वॉ याला घरगुती कलाकंद म्हणतो :)
रेवती तै,
धागा काढाच आता..
पॉपकॉर्न, चणे-फुटाणे घेऊन आलोय.. ;)
धाग्यापेक्षा प्रतिसादांनीच नासकवणी कशी करायची ही कृती दिली
सहमत आहे.
आमच्याकडे यात गूळ घालायचे. त्याची चवपण मस्त लागते. इथले दूध कधी चुकून नासले तरी त्याची नासकवणी केली नाही आणि करवली देखील नाही...
माझ्या मुलीचे आवडते खाद्य ............पण मुद्दाम दुध कधी नासवत नाही.
माझी आवडती डीश !! खुप छान लागते !!!@!!!
हे नाव आहे होय याच?
आम्ही गरीब याला खवा म्हणत खातो ;)
(लहान असताना हळुच दुधात लिंबु पिळणारा) -गणा
=)) =))
हलकट आहेस! :D
आमच्याकडे नासलेल्या दुधात गुळ व ओल्या खोबर्याचा चव घालतात ते पण मस्त लागत एकदा करुन पहा व कळ्वा.
इथे (आय.आय.टी. खरगपुर) आमच्या मेसमध्ये कधिकधी याचेच रसगुल्ले करुन देत असावेत अशी मला दाट शंका आहे.
पण बाकी नासकवणीची चव अप्रतिमच...:)
मलाही हा प्रकार खुप आवडतो. पण ह्याला नासकवणी म्हणतात ते आज कळले.
मलाही हा प्रकार खुप आवडतो. पण ह्याला नासकवणी म्हणतात ते आज कळले.
शुचि, अश्या फाटलेल्या वा फाडलेल्या दुधात आम्ही साखरेऐवजी गूळ घालतो. मग ते थंड करायचे. चवीला मस्त लागते! :)
समाजाला एक वेगळीच दिशा दाखवणारे लेखन.
हो ना, नासकवणीला प्रबोधनाचा तडका! ;)
पाकृ उत्तम पण नवीन नाही...घरगुती टिप्स
=))
पाकृ उत्तम पण नवीन नाही...घरगुती टिप्स
=))
हे नासलेले दुध खाल्ले की बाधत नाही का ?