पाककृती

कडधान्यांचे धिरडे -------------

Primary tabs

साहित्य :--सर्व प्रकारची कडधान्ये (मूग, मटकी, चवळी, हुलगा, मसुर, हरबरे, प्रत्येकी दोनशे ग्रॆम,व तांदूळ एक पावशेर, उडीद डाळ अर्धा पावशेर, जिरे अर्धा वाटी, धने अर्धा वाटी... हे थोडेसे गरम करुन दळून आणावे.टॊमॆटो सॊस, साजूक तूप, तेल, मीठ-मिरची पावडर चवीप्रमाणॆ. कॄती :- दळून आणलेले पिठ दोन वाट्या,मिरची पावडर मिठ चवीप्रमाणे घालून पिठ सरसरीत भिजवावे, Image removed.From माधुर्य निर्लेप तव्यावर थोडेसेच तेल पसरवून धिरडे घालावे...कडेने थोडे तेल सोडावे. Image removed.From माधुर्य दोन-चार मिनिटांनी उलटावे Image removed.From माधुर्य चांगले भाजू द्यावे. Image removed.From माधुर्य गरम गरम धिरडे , साजूक तूप व सॊस बरोबर खायला द्यावे. ह्यात सर्व कडधान्ये असल्याने हे अतिशय रुचकर लागते.
पिंगू

निवेदिता ताई,

धिरडे खुपच पौष्टीक आहेत ह्यात शंकाच नाही... फक्त एक अवांतर प्रश्न की ह्यात टमाट्याचे तुकडे घातले तर चालतील का?

- पिंगू

चालेल, टोमॅटो चालेल, बारिक चिरुन कांदा, कोथिंबीर मिरची तुकडे घातलेत तरी चालेल.

शॉल्लेट !!

प्लिज मला कुणीतरी हे गोल आकाराचे (निदान गोल सारखे दिसणारे) धिरडे / डोसा तव्यावर कसा टाकायचा ह्याचा सोपा उपाय सांगेल का ?

सूड

उपायः
१) हे पीठ साधारण घट्ट भिजवून पेल्याने पॅनवर मध्यभागी ओतून त्या पेल्याच्या बुडाने बाहेरच्या दिशेने गोलाकार पसरवा.
२) पीठ पातळ भिजवा आणि पॅनवर ओतून पॅन अशा तर्‍हेने फिरवा की ते पॅनभर पसरेल.

रेवती

आता लग्न करायचे आहे म्हणून तर शिकतोय तो! ;)

बेसनलाडू

(जिज्ञासू)बेसनलाडू
धिरडी बाकी छान + पौष्टिक!
(तंदुरुस्त)बेसनलाडू

तो आयटी मधला नॉन आयटी आहे... पण खरा प्रश्न हा आहे की परा तु आय टी बायको करणारेस की नॉन आय-टी... :D

मितान

छान पाककृती :)

हुलगा म्हणजे काय ?

मनि२७

मस्तच ....

पण एक शंका....
पीठ भिजत घालण्या पेक्षा डाळी भिजवून मग दळून पण धिरडी करता येतात का?
माझी आजी मुगाचे धिरडे डाळ भिजून करते म्हणून विचारलं....

अनामिक

छान दिसताहेत धिरडे!

अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या)

अनामिक.........अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या)

तुच एक नवा निर्लेप तवा दे पाठ्वून.............हा हा हा .
लय भारी.

सुहास..

याक नंबर !! आमची या विकांताची खादाडी फिक्क्ष झाली ..

मेघवेडा

नीट करता आली असती तर असेच म्हणलो असतो! :D

चक्शु

खुप छान पाकक्रुती...... हे पीठ तयार करुन ठेवल्यास आयत्या वेळी धीरडे करता येतील.....कडधान्य भीजवुन करण्यासाठी पुर्वतयारी लागते...... पीठाचे धीरडे लगेच करता येतिल..... मस्त पाकक्रुती..... :)

गणेशा

आइ करायची ..
छान लागते ना खुप ..

धन्यवाद येथे सांगितल्या बद्दल

विलासराव

तर काय बनवता येत नाहीत.
पण कालच डब्यात आले होते मेसमधुन.
अगदी असेच होते अन चविलाही मस्त होते.