पाककृती
झटपट बटरवडॆ.......

From
साहित्य:- एक लिटर गोड दही, चार पाच हि. मिरच्या, एक छोटा आले तुकडा, लसूण पाकळ्या आठ-दहा, कोथिंबीर, जिरा बटर दोन पॅकेट, चवीनुसार मिठ, साखर, फ़ोडणीचे साहित्य.
कॄती :- प्रथम आले, लसुण, मिरची पेस्ट काढा, दही पाणी न घालता घुसळून घ्या,

From
त्याला मोहरी,जिरे, हिग, किचिंत हळद घालुन फ़ोडणी बनवा, यात आले, लसुण, मिरची पेस्ट परतून घ्या,

From
ती फ़ोडणी दह्यात घाला,
चवीनुसार मिठ, साखर घाला. कोथींबीर घाला व दहीवड्याला तयार करतो तसे दही तयार करुन घ्या.

From
आता थोडॆ पाणी कोमट करुन घ्या. त्यात बटर टाका व लगेच बाहेर काढा. व त्यातील पाणी कादून टाका.
ते एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर तयार केलेले दही घालून सर्व्ह करा.

From
वरील साहित्यात चार जणांना पुरेल एवढे वडे तयार होतात.
दिसले एकदाचे !!!!!!!!!!!
हुश्श, दिसले बाई............बरे झाले.
निवेदिता ताईने माझ्या सकाळच्या न्याहारीचा बंदोबस्त केला.
- पिंगू