पाककृती

शाही शेवया

Primary tabs

Image removed.साहित्य- साजुक तूप्-पाव वाटी शेवया-पाउण वाटी साखर्-अर्धी वाटी दूध-२ ते अडीच वाटी केशर काड्या-७-८ सुका मेवा-आवडीनुसार व उपलब्धतेनुसार क्रुती- १)प्रथम एका कढईत तूप गरम करावे ,तूप गरम झाले कि त्यात शेवया लालसर रंगावर परतुन घ्याव्या.जास्त लाल होउ देउ नये. २)शेवया लालसर झाल्या कि त्यात अडीच वाटी गरम दूध घालावे व ढवळुन घ्यावे व लगेच त्यात साखर घालुन परतावे. ३)आता लगेच यात केशर घालावे म्हणजे केशरचा रंग त्यात उतरेल. ४)१०-१५ मिनीट शिजु द्यावे ,शेवया जास्त्त घट्ट वाट्ल्यास आणखी थोडे गरम दूध घालावे. ५)काजु,बदाम पिस्त्याचे काप घालुन सजवावे. Image removed.
तर्री

शाही शेवया आवडल्या.
फोटो जरा फोकसात गडबडलेत का ?

शेवया खिर करताना त्यात थोडी पारले जी. बिस्कीटे घालावित , चव छान येते.

मराठमोळा

शेवयांची खीर. . :) माझी आवडती खीर.

दुसरा फोटु जरा गडबडला आहे खरा पण अशी खीर समोर असताना ती न खाता केवळ फोटु घेत बसणे अवघडच आहे.
गणेश शेवई उत्तम या खीरीसाठी. :)