पाककृती
मिक्स फ्रुट रायते
Primary tabs
साहित्यः केळी, सफरचन्द, डाळिम्बाचे दाणे, गोड दही, मीठ, साखर
क्रुती: प्रथम केळी आणि सफरचन्दाच्या लहान, लहान फोडी करुन एका बाउल मधे घेणे. त्यात डाळिम्बाचे दाणे घालणे. त्यानन्तर थोडे दही एका बाउल मधे घेउन फेटून घेणे. मग हे फेटलेले दही आणि चवीपुरती मिठ व साखर आधि चिरुन घेतलेल्या फळान्च्या फोडीन्मधे मिक्स करावे. सोपे, चवदार आणि सुन्दर दिसणारे रायते तयार.
फोटु टाका पहीला.. मग करुन बघू..
- पिंगू
मी हापिसात, रायते घरात आणि डिजिकॅम खराब झाला असल्याने नो फोटो available.
Will add pic next time with next recipe.
दही आणि फळं हे कांबिनेशन आम्हाला नेहमीच ऑड वाटत आलेले आहे !
तरीही हापिसातून घरी जाताच शिल्लक असलेल्या रायत्याचा, शेजारुन कॅमेरा घेऊन, फोटो काढून इथे दाखवावा !
दही आणि फळं हे कांबिनेशन आम्हाला नेहमीच आवडत आलेले आहे !
तेव्हा हापिसातून घरी जाताच शिल्लक असलेल्या रायत्याचा, शेजारुन कॅमेरा घेऊन, फोटो काढून इथे दाखवावा !
दही आणि फळ हे काँबिनेशन अथवा एकेकटं कसही आम्हाला (आम्हाला म्हणवत नाही. सेल्फ एस्टीम चे क्लासेस लावायची वेळ आलीये) अतिशय आवडतं तेव्हा फोटो टाकाच झणकरी.
जर आयते मिळाले तर अजुनच छान लागते.