पाककृती
उपवासाचे खमंग थालीपीठ...
Primary tabs
उपवासाचे खमंग थालीपीठ...
पुर्वतयारी :
राजगिरा,भगर,साबुदाणा समप्रमाणात घेउन भाजुन घ्या..
त्यात धणे,जिरे घालुन दळुन घ्या..
कृती :
भाजणीचे पीठ, तिखट, मीठ, दाण्याचे कुट, दही/लिंबु, कोथिंबिर मिसळुन गोळा बनवुन घ्या..
गरम झालेल्या तव्यावर थापुन खरपुस भाजेपर्यंत वाट पहा...
तयार थालीपीठ...सोबत खोबर्याची चटणी किंवा दही...
खाद्यलालसा..
येउद्या , तसाही तीन दिवस उपवास होताच.
विलासराव करुन पहा...अगदी कट्लेट सारखे लागते चवीला....
(अवांतर : जर उपवास नसेल तर टोमॅटो सॉस सोबत खायला कही हरकत नाही डिट्टो कट्लेट... )
प्रकाटाआ
अग लालसा , रंग पिवळा का दिस्तोय्...हळद घातलिस कि काय्...वाजलेच ३-१३ मग उपासाचे ;)
रंग पिवळा हळ्दीमुळे नाही तर बॅकग्राउंड मुळे दिसत असेल कदाचित..आणि छायाचित्र घेताना पण जरा लाईट कमी होता....आणि पनेमतै मी लालसा(कारण लहान आहे..{मेल}) आहे फक्त..अगं नाहीये..
वारलो !!!
फोटो जबरदस्त जीवघेणा आहे.
एकदम खल्लास !!!
मात्र तुम्ही पाकृ फारच शॉर्ट लिहली आहे.
सविस्तर पाककृतीसाठी कृपया "उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला हा लेख वाचवा.
- ( पाकृचे थालिपीठवाला ) छोटा डॉन
वारलो?????????????
तुम्हाला छोटा हे नाव कोणी बहाल केलं हो..
धन्य्वाद
मस्त मस्त
पियुशातै धन्यु..
चालत नाहीत ना?
चालतात बहुतेक..कारण कोथिंबिर चालते ना..