पाककृती

मुगाचे लाडू.

Primary tabs

जागु

वा मुग-गुळाचे लाडू छान आहेत. वेलची, जायफळ किंवा इसेन्स वगैरे नाही का घालत ?

वेलची, जायफळ किंवा इसेन्स वगैरे नाही घालत कारण मुगाचा खमंग वासच छान येतो.

हो पाव किलो........पण आमचे इकडचे भागात एक पाव द्या... असेच म्हणतात.

बेकरीतला पाव वाटला काय तुला................हा हा हा

मनीषा

छान दिसताहेत लाडू...

पाककृती सुद्धा सोपी आहे .. करून बघीन .

माझ्या मुलाच्या " काही गोड आहे का ? " या प्रश्नाला हे चांगले उत्तर आहे .

पॉशच !

एकदा सोमवरी मुगाचा लाडु खाल्ला म्हणुन आमची आजी वसकन ओरडली होती हे अजुन आठवते.

साला मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर मजा आली असती.

कुंदन

>>साला मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर मजा आली असती.

मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर , लाडु बरोबरच तुला ईनो घेणेही अपरिहार्य झाले असते.

अर्चु

सुंदर दिसताहेत लाडू.... नक्की करून बघेन.

बेकरीतला पाव नाही वाटला.... मुम्बइत अर्धा पाव भाजी मागतात तस काही असावे असे वाटले...

हो हे लाडू खूप पोष्टीक असतात...आजारी, लहान मुले, आणी इतर सगळ्यांसाठी सुद्धा हे हेल्दी आहेत

गवि

आम्हास फक्त बेसनाचे लाडू आवडत होते आत्तापर्यंत..

रवा लाडू वगैरे अजिबात नाही आवडत्..ती तर ऐनवेळी आलेल्या पाहुण्याची बोळवण (वाटीत दे गं एक लाडू त्याला..)
.. मुगाची कल्पनाही आतापर्यंत पटत नव्हती. (विकतचे खाल्लेत..)

पण ही पोस्ट वाचून आता आम्ही बनवून खाणारच.

मत बदलले.

गवि

बादवे:

श्री बेसनलाडू यांची काय प्रतिक्रिया आहे या पोस्टवर..?