पाककृती
मेथीचे पौष्टिक लाडु.
Primary tabs
साहित्य:
मेथीचे पिठ – ५०० ग्रॅम
तेल-१किलो
गुळ-१किलो
अहळीव-१००ग्रॅम
सुक खोबरे (किसलेले)-२५०ग्रॅम
खारिक-२५०ग्रॅम
काजू-१००ग्रॅम
बदाम-१००ग्रॅम
डिंक-१००ग्रॅम
कृति:
१) प्रथम पातेल्यात तेल घेऊन डिंक तळुन घेणे.
२)गुळ बारीक करुन गरम तेलात टाकने.गुळ तेलात पूर्ण विरघळुन घेणे.
३) सर्व सुका मेवा मिक्सरंमधे जाडसर दळुन घेणे. मोठया भांडयात सुका मेवा, खारिक,सुक खोबरे,अहळीव,डिंक,मेथिचे पिठ हे सर्व जिन्नस एकत्र करावे. त्यात गरम तेलात विरघळलेला गुळ टाकने.
४)सर्व मिश्रण एकजीव करावे. थोड़े गार झाल्यावर लाड़ू वळावे.

वा... पौष्टिक जिवाणू !!! सॉरी सॉरी लाडू. ;)
जिवाणूंचे लाडू. :-)
मस्त!
http://mejwani.wordpress.com/
पण लाडूत तेल का बरे ?
आयला हो की.. आणि ते ही १ किलो! :O
पौष्टीक कसे तर हे? फाऊल फाऊल.
पण लाडूत तेल का बरे ?
हेच म्हणतो ??
जिवाणू ह्या लाडवा मध्ये साजुक तुप वापरायचे.
हं! थंडी आली नाही का? मग अस पौष्टीक पौष्टीक हवच खायला नाही का?
जिवाणु जागुताई म्हणाल्या ना तसा लाडु तुपात हवा. फार नाही लगत तुप डिंक तळायला . हळु हळु चमचा चमचा भर अॅड करत सारा डिंक तळुन घ्या.
अन हो वर लाडु अगदी छान दिसताहेत.
अभिनंदन !
शक्यता नाकारता येत नाहि.
- कोतिल
सुदंर झाले आहे लाडु
मेथीचे पिठ एवढ्ढे..................कडु होतिल न लाडु.
कडु नाहि होत लाडु. ऑनलाइन सोय असती तर तुम्हाला नक्की खायला दिले असते. :)
आणी लाडूला तेल नाही वापरायचे.....साजूक तुपच हवे ...
निवेदिता मेथिचे लाडु सुंदर लाग्तात....
माझे सगळ्यात आवडते लाडु!...
मस्त मस्त लाग्तात..
हं पण साजुक तुपच हवं..
मस्त ....
मी पण करते!
ते जिवाणूंचे लाडू असल्याने वेगळ्या प्रकाराच असावेत.
तेलासोबत हिंगाची चरचरीत फोडणी दिली असतीत तर अजुन मजा आली असती.
विषाणू
माझे सर्वात आवड्ते लाडू,जरा डाउनलोड करुन घेते.
आता कुणाकडं बातमी ब्वॉ? ;)
पुर्वी खजुराचे पौष्टिक लाडू येऊन गेले होते. ;)
>>>पुर्वी खजुराचे पौष्टिक लाडू येऊन गेले होते
त्याला "सहा महिने" होऊन गेले
अहो, विचारलंय काय ते पहा नं...आता कुणाकडे गोग्गोड?
शक्यता नाकारता येत नाहि.
:)
शक्यता नाकारता येत नाहि.
- पुरिल