पाककृती
मिरची लोणचे..
Primary tabs
साहित्य-- एक पावशेर हिरव्या, ताज्या मिरच्या, एक केप्र किंवा इतर कोणतेही मिरची लोणचे मसाला पाकीट.
एक वाटी मीठ, एक वाटी तेल, फोडणीचे साहित्य.लिंबे सहा -सात.
From
कॄती-- मिरच्यांचे बारीक तुकडे करुन घ्या, त्यात मिरची लोणचे मसाला घाला , मिठ घाला, सर्व एकत्र मिसळून घ्या, चांगल्या स्वच्छ बरणीत भरा, नंतर त्यात लिंबाचा रस घाला ,थोडे पुन्हा मिसळून घ्या.
तेलाची फोडणी करुन ठेवा. गार झाल्यावर लोणच्यामधे घाला.बाजूला ठेवुन द्या. साधारण तीन-चार दिवसांनी
पुन्हा एकदा लोणचे बरणी हलवून ठेवा. आठ-दहा दिवसात लोणचे तयार होईल.
तोंडाला आत्ताच पाणी सुट्ले आहे.
मस्त.
आहा! काय चव येते जेवणाला या लोणच्यान !
अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
या वयात झेपेल की नाही ही गोष्ट वेगळी!
गुंडोपंत....................थोडे खा हो लोणचे...मग झेपेल....
:) :-) :smile:
निवेदिता ताई, हे लोणचे जबराच लागते आणि आपण दिलेली पद्धत सोपी आहे. अतिशय धन्यवाद.
@श्री. गुंडोपंत - हे लोणचे करताना थोडे काम वाढवुन कोणत्याही वयाला झेपेल असे लोणचे करता येते. मिरच्या बारीक न चिरता त्या उभ्या चिरायच्या आणि शक्य तेवढ्या बिया काढुन घ्यायच्या, पण अगदी सगळ्याच नको. आणि थोड्या लोणच्यात नेहमीप्रमाणे लिंबाचा रस पिळा.
थोडे लोणचे पुर्ण न पिकलेले पण फार आंबट नाही, संत्रे पिळुन करा, हे लोणचे खुप जास्त दिवस टिकत नाही. २-३ दिवस टिकते पण याची सुद्धा चव प्रचंड जबरा असते.
हर्षद.
निवेदीता ताई मस्तच.
मी कालच एक मिरचीच लोणच खाल्ल गणपतीपुळेवरुन आणलेल होत ते. त्यात लसुणही ठेचुन टाकलेला होता खुप छान लागल ते पण.
फोडणीच्या दहीभातासोबत हे खाण्याच्या कल्पनेने तोंडाला रुमाल लावून पाणी आवरावे लागले.
तयार लोणच्याचा फोटो दिसत नाही तो?
तो असता तर वाट लागली असती..कामातून मन उडालं असतं..
झक्क आणि चटकदार.
:)
किंवा अगदी तुपात कालवून पोळीशी खायलाही अव्वल!!
(सहमत)बेसनलाडू
थांब देते उद्या तयार लोणच्याचा फोटो..
हा घ्या लोणच्याचा फोटो...आजच खाण्यासाठी काढले होते...लगेच फोटू काढला.
हाSSSSSSSSSSSSSSSSSह !!
आम्ही याच्यात आल्याचे बारीक तुकडे टाकतो. व थोडी आंबे हळद. ( अगदी थोडी)
सही... मला तर मिरची लोणचे आणि भाकरी खायला प्रचंड आवडतं.. आता घरून येताना हे घेउन येतोच..
- (लोणच्यापायी लोचा करणारा) पिंगू
तयार लोणाच्याचा फोटो येईपर्यंत प्रतिक्रियेसाठी जागा राखून ठेवत आहे.. ;)
मिरची लोणचे झकास
मला कढी भाताबरोबर आवडते खायला
मिरची लोणचे झकास
मला कढी भाताबरोबर आवडते खायला
माझी आई कारले व मिरची चे मिक्स लोणचे बनवते . लिब पण घालते त्यात छान लागतो
कृती सोपी आहे. लोणचे आवडते.
पण
हाय हाय मिर्ची ऊह ऊह मिर्ची
उफ़ उफ़ मिर्ची फ़ूह फ़ूह मिर्ची
मिरचीच्या लोणच्याने जेवणाला मस्त रंगत येते. माझी फर्माईश आहे आवळ्याच्या मोहरी फेसलेल्या लोणचाची पाकृ. बाजारात सध्या छान आवळे आहेत. बोल कधी देतेस?