पाककृती
आवळ्याचे लोणचे----
Primary tabs
साहित्य :- वीस-पंचवीस मोठे आवळे, एक वाटी मीठ, एक वाटी तेल, पाव वाटी मोहरीची डाळ, अर्धी वाटी मिरची पावडर, तीन टे.स्पुन जिरे, तीन टे. स्पुन ओवा, दोन टे. स्पुन पांदेलोण.
कॄती :- प्रथम आवळे चाळणीवर ठेवुन सात-आठ मिनिटे वाफ़वून घ्या, नंतर त्यातील बिया काढून टाका,
प्रत्येक आवळ्याच्या चार फ़ोडी हलक्या हाताने करा, नाहितर लगदा कराल, मोहरीची डाळ थोडावेळ उन्हात
ठेवावी, व नंतर त्याची पुड बनवा, पुड खुप बारीक नको. त्यात थोडे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालुन ती चांगली फ़ेसुन घ्यावी.ओवा-जिरे न भाजता पूड बनवा,आता हे सगळे एकत्र करा. एक स्वच्छ बरणी घेउन त्यात् तळाला थोडे मीठ पसरवा, व त्यात सर्व एकत्र कालविलेले आवळे फ़ोडी सह भरा. तेल चांगले गरम करुन गार करा, त्यावर तेल घाला. ही बरणी रोज सकाळपासून दुपारपर्यंत उन्हात ठेवा ..आठ-दहा दिवस ठेवा.
आठ- दहा दिवसानंतर मस्त आवळा लोणचे तय्यार.
आताच तोंडाला पाणी सुटलंय. मी काल आवळे आणलेत. पण मोहरी फेसून पाकृ कुठे मिळत नव्हती. उद्या करतेच!
कर ग उद्याच...आणी दे इकडे पाठवुन...चव घेउन सांगीन कसे झालेय ते..
तोंपासु... :) लगेच करावेसे वाटतेय पण.... इतक्या स्नोमध्ये आता कुठून आणावे.... :(
फोटो दिला आहेस का गं बरोबर... ( का फक्त मलाच दिसत नाहीये?? )
डाळ फ़ेसुन घ्यावी म्हणजे नक्की काय? आणि मग पाण्यासहीत घालायची का लोणच्यात?
हो थोडे पाणी घेउन चांगली गुळगुळीत होईपर्यंत फ़ेसायची..मोहरी डाळ..त्यामूळेच चविष्ट होते लोणचे.
लहानपणी फार खायचो.
एका मित्राच्या घरी मिळायचे म्हणून दर उन्हाळात त्यांच्या कडे सारखा जायचो.
आवडले आता करून पाहतो.
फोटु ??
धाग्याचा निषेध !!
पण मी कालच केलंय म्हणून अजून खार नाही सुटला.